बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट” हे AB सिरीजचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या नव्या सिरीजमध्ये क्लास 0 दर्जाची ऑइल-फ्री एअर, कमी ऊर्जा वापर, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणारी क्लोज्ड-लूप प्रणाली, स्मार्ट पद्धतीने काम करण्याची सुविधा आणि दीर्घकाळ टिकणारे तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. गुणवत्तेला महत्त्व देणाऱ्या उद्योगांसाठी ही सिरीज उपयुक्त आहे.
मुंबई, भारत, 28 ऑक्टोबर 2026: जागतिक स्तरावर एअर कंप्रेसर तयार करणाऱ्या ELGi इक्विपमेंट्स लिमिटेड या कंपनीने आज ड्रिंकटेक इंडिया 2026 या प्रदर्शनात आपल्या AB सिरीज ऑइल-फ्री स्क्रू एअर कंप्रेसरची नवीन आवृत्ती सादर केली. हा कार्यक्रम 28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या नवीन AB सिरीजचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे “बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट.” म्हणजेच अधिक कार्यक्षमता आणि पर्यावरणासाठी अधिक चांगले.

ELGi च्या मते, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
बेटर एफिशियन्सी (अधिक कार्यक्षमता) म्हणजे ग्राहकांना आवश्यक असलेली कॉम्प्रेस्ड एअर (दाबाखालील हवा) तयार करताना ऊर्जेचा आणि इतर साधनसंपत्तीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येणे. यामुळे कंप्रेसरचा दीर्घकालीन खर्च कमी होण्यास आणि उत्पादन प्रक्रिया विश्वासार्हपणे सुरू ठेवण्यास मदत होते.
बेटर प्लॅनेट (पर्यावरणासाठी अधिक चांगले) म्हणजे पाणी आणि ऊर्जेचा जबाबदारीने वापर करणे. यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारी व्यवस्था, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, दीर्घकाळ टिकणारे सुटे भाग आणि कंप्रेसरच्या संपूर्ण वापराच्या कालावधीत संसाधनांची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
बेटर इंजिनिअरिंग → बेटर एफिशियन्सी → बेटर रिसोर्स युटिलायझेशन → बेटर प्लॅनेट
इंजिनिअरिंग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामगिरीचा वारसा पुढे नेणारी कंपनी
ELGi च्या AB सिरीज ची ही नवीन आवृत्ती कंपनीच्या कॉम्प्रेस्ड एअर तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर आधारित आहे.
2002 मध्ये ELGi ने जगातील सर्वात लहान स्क्रू एअर कंप्रेसर विकसित केला. यामुळे कंप्रेसरची रचना आणि निर्मिती करण्याची कंपनीची स्वतःची क्षमता जगभरातील उद्योगासमोर आली. 2019 मध्ये ELGi ने जगातील सर्वात लहान वॉटर-इंजेक्टेड स्क्रू एअर कंप्रेसर सादर केला. या कंप्रेसरच्या माध्यमातून कंपनीने आपले इंजिनिअरिंग कौशल्य आणि तंत्रज्ञानातील क्षमता दाखवून दिली. 2019 हे वर्ष ELGi साठी आणखी एका महत्त्वाच्या कामगिरीसाठी ओळखले जाते. कंपनीला टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमधील (TQM) उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित डेमिंग पुरस्कार मिळाला. सहा दशकांहून अधिक काळात जपानबाहेरील जागतिक स्तरावर स्थापित औद्योगिक एअर कंप्रेसर उत्पादक कंपनीला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. अलीकडेच कंपनीने पेटंट मिळालेली डिमांड=मॅच सिस्टीम ही प्रणाली सादर केली. या तंत्रज्ञानामुळे कारखान्यातील हवेची गरज वेळोवेळी बदलत असताना त्यानुसार कॉम्प्रेस्ड एअरचा पुरवठा आपोआप नियंत्रित करता येतो. त्यामुळे आवश्यक तेवढा हवेचा पुरवठा कायम ठेवून अनावश्यक ऊर्जा वापर कमी करण्यास मदत होते आणि कामकाज सुरळीत सुरू राहते.
AB सिरीज जागतिक स्तरावर सादर केल्यानंतर सात वर्षांनी, ELGi कंपनी अभियांत्रिकी तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा करण्याच्या या सर्व तत्त्वांना “बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट.” या संकल्पनेअंतर्गत एकत्र आणत आहे.
Elgi इक्विपमेंट्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि ग्लोबल प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख विकास यांनी सांगितले. “AB सिरीजमध्ये सातत्याने अभियांत्रिकी सुधारणा करून बदल घडवून आणले आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही मोटरची कार्यक्षमता, एअरएंडची कार्यक्षमता आणि संपूर्ण कंप्रेसरच्या रचनेत सुधारणा केली आहे. तसेच, कंप्रेसरचे नियंत्रण आणि रिमोट मॉनिटरिंग सुविधाही अधिक चांगली केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने क्लास 0 दर्जाची ऑइल-फ्री कॉम्प्रेस्ड हवा मिळते. तसेच, साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन करता येते आणि कंप्रेसरच्या कामकाजावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येते. ‘बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट.’ ही संकल्पना AB सिरीजमध्ये झालेल्या सुधारणांचे प्रतीक आहे. योग्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योगांमध्ये कार्यक्षमता वाढवणे आणि साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर करणे शक्य आहे, असा आमचा विश्वास आहे.”
बेटर एफिशियन्सी: अभियांत्रिकी तंत्रज्ञानातून ग्राहकांना फायदा
2019 मध्ये AB सिरीज सादर केल्यापासून ELGi ने मोटर, एअरएंड आणि कंप्रेसरच्या संपूर्ण रचनेत वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. यासोबतच स्मार्ट कंप्रेसर व्यवस्थापन आणि जोडलेल्या उपकरणांद्वारे देखरेख करण्याची सुविधाही विकसित केली आहे. ELGi ने केलेल्या तुलनेनुसार, AB सिरीजमध्ये (स्पेसिफिक पॉवर कन्झ्युमशन– SPC) म्हणजेच ठरावीक प्रमाणात कॉम्प्रेस्ड हवा तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या वापरामध्ये 5 ते 6 टक्के सुधारणा दिसून येते. त्यामुळे ठरावीक कामकाजाच्या परिस्थितीत कॉम्प्रेस्ड एअर तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी करण्यास मदत होते. या सिरीजचा फायदा केवळ ऊर्जेची बचत करण्यापुरता मर्यादित नाही. ELGi च्या तुलनात्मक मूल्यांकनानुसार, 40,000 तासांच्या वापराच्या कालावधीत कंप्रेसर खरेदीचा खर्च, वीज खर्च आणि देखभाल खर्च विचारात घेतल्यास एकूण खर्चात 13 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. हा अंदाज कंपनीने नमूद केलेल्या तुलनेसाठीच्या अटींवर आधारित आहे.
नवीन AB सिरीज मध्ये पुढील सुविधांचाही समावेश आहे:
- ELGi मोटर: कंपनीने स्वतः विकसित केलेली ही मोटर विविध क्षमतांमध्ये आणि कामाच्या वेगवेगळ्या कामकाजाच्या परिस्थितींमध्ये कार्यक्षमतेने व विश्वासार्हपणे काम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
- न्यूरॉन 4 कंट्रोलर: कंप्रेसरचे काम सुरळीत ठेवणे, अनेक कंप्रेसरचे काम योग्य क्रमाने नियंत्रित करणे आणि संपूर्ण प्रणालीचे व्यवस्थापन करणे यासाठी हा आधुनिक कंट्रोलर तयार करण्यात आला आहे.
- एअर-अलर्ट: ELGi ची IoT- तंत्रज्ञानावर आधारित रिमोट मॉनिटरिंग प्रणाली. यामुळे कंप्रेसरची काम करण्याची स्थिती, कार्यक्षमता आणि देखभालीची गरज यावर दूरून लक्ष ठेवता येते.
- पाच वर्षांची वॉरंटी: AB सिरीजमधील महत्त्वाच्या घटकांवर पाच वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. यासाठी कंपनीच्या लागू असलेल्या वॉरंटीच्या अटी व शर्ती लागू राहतील.
सतत उत्पादन सुरू ठेवणाऱ्या आणि उत्पादनाच्या गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या उद्योगांसाठी ही सर्व वैशिष्ट्ये उपयुक्त आहेत. यामुळे ऊर्जेचा योग्य वापर, कंप्रेसरच्या कामकाजावर अधिक चांगले नियंत्रण, विश्वासार्ह कार्यक्षमता आणि दीर्घकालीन खर्चाचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.
बेटर प्लॅनेट: साधनसंपत्तीचा योग्य वापर
AB सिरीज मध्ये ELGi चे बंदिस्त जलचक्रावर-आधारित वॉटर-इंजेक्टेड कॉम्प्रेशन तंत्रज्ञान हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या तंत्रज्ञानात कॉम्प्रेशन चेंबरमध्ये तेलाऐवजी पाण्याचा वापर केला जातो. यामुळे क्लास 0 ऑइल-फ्री कॉम्प्रेस्ड एअर मिळते. कॉम्प्रेशन प्रक्रियेत वापरलेले पाणी यंत्रणेच्या आतच फिरवून पुन्हा वापरले जाते. तसेच, जमा झालेले कंडेन्सेट (पाणी) वापरून पाण्याची पातळी आपोआप भरून काढली जाते. यामुळे सतत बाहेरून पाणीपुरवठा करण्याची गरज कमी होते. तसेच, कंप्रेसरच्या या बंदिस्त जलप्रणालीसाठी स्वतंत्र आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस) प्रणाली आणि बाह्य वॉटर पंपची आवश्यकता राहत नाही. या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा अधिक योग्य वापर करता येतो. त्याचबरोबर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त यंत्रणेचा खर्च, देखभालीची गरज आणि पूरक उपकरणांसाठी लागणारा वीजवापर कमी करण्यास मदत होते.
ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा, स्मार्ट कार्यप्रणाली आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या भागांच्या रचनेसह हे बंदिस्त तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षणाबाबत ELGi चा दृष्टिकोन स्पष्ट करते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी केवळ पर्यावरणपूरक असल्याचा दावा करण्याऐवजी, अभियांत्रिकी तंत्रज्ञानात सुधारणा करून आणि साधनसंपत्तीचा योग्य वापर करून पर्यावरणाप्रती जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ELGi चे मत आहे.
ELGi इक्विपमेंट्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष – ISAAME (इंडिया, साउथ एशिया, अफ्रीका और मिडिल ईस्ट) आणि SEA (साउथ ईस्ट एशिया) विभागाचे भावेश कारिया यांनी सांगितले. “अन्नपदार्थ, पेय आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी ‘बेटर एफिशियन्सी’ आणि ‘बेटर प्लॅनेट’ हे दोन्ही मुद्दे आता व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहेत. ग्राहकांना हवेची गुणवत्ता कायम राखून विश्वासार्ह उत्पादन करायचे आहे. त्याचबरोबर ऊर्जा वापर, पाण्याचा वापर, यंत्रणा किती वेळ विनाअडथळा सुरू राहते आणि उपकरणांच्या संपूर्ण वापराच्या कालावधीत कारखाना चालवण्यासाठी किती खर्च येतो, याकडेही त्यांचे लक्ष आहे. AB सिरीज या सर्व गरजा एकत्रितपणे पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे ग्राहकांना उत्पादन प्रक्रिया विश्वासार्हपणे आणि कार्यक्षमतेने सुरू ठेवता येते. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या साधनसंपत्तीचा अधिक योग्य वापर करता येतो.”
भारतातील वाढत्या अन्न आणि पेय उद्योगाला सहाय्य
ज्या उद्योगांमध्ये उत्पादनाचा दर्जा महत्त्वाचा असतो, अशा अनेक उद्योगांमध्ये सध्या मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर AB सिरीज सादर केली जात आहे. या उद्योगांमध्ये उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि इतर कामांसाठी कॉम्प्रेस्ड एअर महत्त्वाची भूमिका बजावते.
भारताच्या अन्नप्रक्रिया उद्योगाची बाजारपेठ आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुमारे 382 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. 2034 पर्यंत ती वाढून सुमारे 689 अब्ज अमेरिकी डॉलर होण्याचा अंदाज आहे. यावरून देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचा विस्तार होत असल्याचे दिसून येते. भारतातील दुग्धव्यवसायाची बाजारपेठ 2025 मध्ये सुमारे 246.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. देशातील मोठ्या दूध उत्पादन क्षमतेमुळे आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांवर अधिक प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे 2034 पर्यंत ही बाजारपेठ सुमारे 659.8 अब्ज अमेरिकी डॉलर होण्याचा अंदाज आहे. भारताची बिअर बाजारपेठ 2024 मध्ये सुमारे 7.8 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. 2030 पर्यंत ती वाढून सुमारे 15.1 अब्ज अमेरिकी डॉलर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठीही उच्च दर्जाची कॉम्प्रेस्ड एअर वापरण्याची गरज वाढत आहे.
या वाढत्या उद्योगांमध्ये उत्पादकांसमोर उत्पादनाची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा कायम ठेवण्यासोबतच उत्पादन प्रक्रिया विनाअडथळा सुरू ठेवणे, ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणे, साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे, अशी अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अन्न, पेय, दुग्धजन्य पदार्थ आणि द्रवरूप खाद्यपदार्थ उद्योगांना एकत्र आणणारे ड्रिंकटेक इंडिया हे ELGi साठी आपल्या AB सिरीज च्या नवीन आवृत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
उच्च दर्जाच्या वापरासाठी क्लास 0 एअर आणि प्रमाणपत्रे
अन्नपदार्थ आणि पेय तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉम्प्रेस्ड एअरची गुणवत्ता महत्त्वाची असते. हवेच्या गुणवत्तेचा उत्पादन प्रक्रियेवर आणि उत्पादनाच्या विश्वासार्हतेवर थेट परिणाम होऊ शकतो. AB सिरीज मध्ये ISO 8573 क्लास 0 प्रमाणित ऑइल-फ्री कॉम्प्रेस्ड एअर मिळते. कॉम्प्रेशन प्रक्रियेतून हवेमध्ये तेलाचे दूषित घटक मिसळणे स्वीकारार्ह नसलेल्या कामांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. AB सिरीज तसेच ELGi च्या उत्पादन आणि व्यवस्थापन प्रणालींना विविध आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली आहेत. यामध्ये पुढील प्रमाणपत्रे आणि नियमांचा समावेश आहे.
- ISO 8573 क्लास 0 प्रमाणपत्र: महत्त्वाच्या औद्योगिक कामांसाठी उच्च दर्जाची ऑइल-फ्री कॉम्प्रेस्ड एअर शुद्धता सुनिश्चित करण्यास मदत करते.
- CE आणि UL प्रमाणपत्रे: आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सुरक्षा आणि विद्युतविषयक आवश्यकतांचे पालन करण्यास मदत करतात.
- CRN आणि DOSH प्रमाणपत्रे: संबंधित देशांतील लागू असलेल्या नियमांचे आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यास मदत करतात.
- ISO 22000:2018 अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र: ELGi इक्विपमेंट्स लिमिटेडला मिळालेल्या या प्रमाणपत्रामुळे अन्नसाखळीतील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या ग्राहकांना सहाय्य करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापन प्रणाली आणि प्रक्रियांना बळ मिळते.
AB सिरीज मध्ये हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी, उपकरणे अधिक काळ टिकण्यासाठी आणि कठीण परिस्थितीतही विश्वासार्हपणे काम करण्यासाठी योग्य सामग्रीची निवड आणि प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. - विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी उपयुक्त
AB सिरीज कंप्रेसर 11 ते 110 kW / 15 ते 150 hp क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. यामधून प्रति मिनिट 29 ते 560 घनफूट (cfm) किंवा 0.82 ते 15.85 घनमीटर कॉम्प्रेस्ड एअर मिळते. या कंप्रेसरचा कार्यरत हवेचा दाब 4.5 ते 12 बार किंवा 65 ते 174 psi इतका आहे.
ड्रिंकटेक इंडिया हे अन्नपदार्थ, पेय, दुग्धजन्य पदार्थ, बिअर, बेकरी आणि मिठाई उद्योगांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र, AB सिरीज चा वापर याशिवाय औषधनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, वाहननिर्मिती, ऊर्जा, धातू, तेल व वायू आणि कापड उद्योगांमध्येही करता येतो. या सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्रेस्ड एअरची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि कार्यक्षम वापर महत्त्वाचा असतो. नवीन AB सिरीज जगभरातील ELGi च्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या स्थापित विक्री आणि सेवा नेटवर्कद्वारे ग्राहकांना आवश्यक मदतही दिली जाईल.
ऑइल फ्रीपासून बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेटपर्यंतचा प्रवास
2019 मध्ये AB सिरीज जागतिक बाजारपेठेत दाखल झाली, तेव्हा “ऑइल फ्री. डिसरप्टेड.” या संकल्पनेतून ऑइल-फ्री कॉम्प्रेशन तंत्रज्ञानाबाबत प्रचलित पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्याचे ELGi चे उद्दिष्ट स्पष्ट झाले. सात वर्षांनंतर या तंत्रज्ञानात अनेक सुधारणा झाल्या आहेत आणि ग्राहकांच्या गरजाही बदलल्या आहेत. आजचा प्रश्न केवळ उद्योगांना क्लास 0 ऑइल-फ्री कॉम्प्रेस्ड एअर तयार करता येते का, एवढाच नाही. तर उपकरणांच्या संपूर्ण वापराच्या कालावधीत ही हवा किती कार्यक्षमतेने, विश्वासार्हपणे आणि पर्यावरणाचा विचार करून तयार करता येते, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.