३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल

News Service

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीमधील कामगिरी व स्वतंत्र ऑपरेशन्सची ठळक वैशिष्ट्ये
पश्चिम आशियातील संघर्षांनंतरही महसूल आणि ऑपरेटींग नफ्यात दोन-अंकी वाढ
स्वतंत्र आधारावर २५ टक्‍क्‍यांहून अधिक आणि एकत्रित आधारावर २९ टक्‍क्‍यांहून अधिक वाढीसह करोत्तर नफ्यामध्ये (पीएटी) प्रबळ वाढ
डेकोरेटिव्ह आणि ऑटोमोटिव्ह विभागांनी या तिमाहीतील वाढीचे नेतृत्व केले

एकत्रित निकालांची ठळक वैशिष्ट्ये:
अ. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल ३,५८३.८ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ३,२००.८ कोटी रूपयांच्या तुलनेत १२.० टक्‍के वाढ झाली.

ब. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए (इतर उत्पन्न वगळून) ६०७.४ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ५२८.४ कोटी रूपयांच्या तुलनेत १५.० टक्‍के वाढ झाली.

क. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी निव्वळ नफा ४०५.० कोटी रूपये होता, ज्यामध्‍ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ३१५.० कोटी रूपयांच्या तुलनेत २८.६ टक्‍के वाढ झाली.


स्वतंत्र निकालांची ठळक वैशिष्ट्ये:
अ. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल ३,२२६.७ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील २,८६२.६ कोटी रूपयांच्या तुलनेत १२.७ टक्‍के वाढ झाली.
ब. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए (इतर उत्पन्न वगळून) ५६२.२ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४९९.५ कोटी रूपयांच्या तुलनेत १२.६ टक्‍के वाढ झाली.
क. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी निव्वळ नफा ३६८.७ कोटी रूपये होता, ज्यामध्‍ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील २९३.८ कोटी रूपयांच्या तुलनेत २५.५ टक्‍के वाढ झाली.

“मागील तिमाहीत दिसून आलेली मागणीतील टप्प्याटप्प्याने झालेली सुधारणा वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील कायम राहिली, ज्यामुळे या तिमाहीत स्वतंत्र आधारावर १२.७ टक्‍के मूल्यात्मक वाढ साध्य करणे शक्य झाले. किमतीतील वाढीमुळे मूल्यात्मक वाढ प्रमाणातील (व्हॉल्यूम) वाढीपेक्षा अधिक राहिली, ज्याचा पूर्ण फायदा पुढे मिळत राहील. या तिमाहीतील आमची कामगिरी ऑटोमोटिव्ह आणि डेकोरेटिव्ह या दोन्ही विभागांमधील प्रबळ वाढीमुळे झाली आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणामुळे क्रूड तेल आणि क्रूडवर आधारित कच्च्या मालाच्या उपलब्धतेत आणि किमतींमध्ये अडथळे निर्माण झाले असूनही ही नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात होती. क्रूड आधारित साहित्यातील महागाईमुळे आमच्या ग्रॉस मार्जिनमध्ये काही प्रमाणात घट झाली. पण, योग्य आर्थिक नियंत्रण आणि सुधारित कार्यक्षमतेमुळे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मार्गदर्शक श्रेणीच्या थोडे पुढे राहिले आणि करोत्तर नफ्यामध्ये (पीएटी) स्वतंत्र आधारावर २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आणि एकत्रित आधारावर २९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रबळ वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button