यामाहा YZF-R2 चे भारतात जागतिक पदार्पण, भारतात Rs. 2,30,500 किमतीत लाँच

News Service
  • YZF-R2 भारतात Rs. 2,30,500 किमतीत लाँच; ३ व्हेरियंट्स आणि ५ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
  • वजनाने हलक्या चेसिससह श्रेणीतील सर्वोत्तम कार्यक्षमता देते
  • श्रेणीतील पहिल्या ‘बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टर’ची सुविधा

चेन्नई, २७ ऑगस्ट २०२६: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रायव्हेट लिमिटेडने आज भारतात जागतिक स्तरावर पहिल्यांदाच सादर होत असलेल्या ऑल-न्यू YZF-R2 च्या लाँचची घोषणा केली, ज्यामुळे देशातील कंपनीचा प्रतिष्ठित आर-सिरीज पोर्टफोलिओ अधिक दृढ झाला आहे. Rs. 2,30,500 (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली YZF-R2 यामाहाची आपली प्रीमियम मोटरसायकल श्रेणी वाढवण्याची आणि भारतातील रायडर्सच्या बदलत्या आकांक्षा पूर्ण करणारी उत्पादने देण्याची कटिबद्धता अधोरेखित करते.

ऑल-न्यू YZF-R2 अत्यंत स्पर्धात्मक २००सीसी सेगमेंटमध्ये यामाहाची पहिली ऑफर आहे, जी प्युअर सुपर स्पोर्ट परफॉर्मन्स, प्रगत तंत्रज्ञान आणि दैनंदिन वैविध्‍यततेचा शोध घेणाऱ्या नवीन पिढीच्या रायडर्ससाठी डिझाइन करण्यता आली आहे. संपूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केलेली आणि जपानमध्ये भारतातील टीम्ससोबत सहयोगाने विकसित व इंजिनिअर केलेल्या नवीन इंजिनद्वारे समर्थित YZF-R2 उत्तम कार्यक्षमता, आत्मविश्वास देणारे हँडलिंग आणि यामाहाच्या रेसिंग इंजिनिअरिंगचा मेळ साधते.

वाढत्या आकांक्षा, बदलती जीवनशैली आणि प्रीमियम मोबिलिटी उपायांना मिळणारी पसंती यामुळे भारतातील प्रीमियम मोटरसायकल बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. २००सीसी सेगमेंट सर्वात वेगाने वाढणारी श्रेणी म्हणून उदयास आली आहे, जी उच्च पातळीवरील कार्यक्षमता आणि मालकीहक्क अनुभवाकडे वळू इच्छिणाऱ्या रायडर्सना आकर्षित करत आहे. हा बदल यामाहासाठी आपला संपूर्ण मोटरसायकल व्यवसाय अधिक दृढ करण्याची आणि देशातील अत्यंत आशादायक बाजारपेठेत आपला विस्तार करण्याची मोठी संधी निर्माण करतो. या विकसित होत असलेल्या श्रेणीसाठी खास तयार केलेली YZF-R2 पॉवर, चपळता आणि दैनंदिन रायडिंगमध्ये उत्तम संतुलन साधते, ज्यामुळे ही मोटरसायकल ट्रॅक, महामार्ग आणि रोजच्या प्रवासासाठी तितकीच सक्षम ठरते.

ऑल-न्यू YZF-R2 तीन व्हेरियंट्स आणि पाच आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या रायडिंग शैलीला आणि व्यक्तिमत्त्वाला साजेशी मोटरसायकल निवडता येईल. YZF-R2 चे बेस व्हेरियंट मेटलिक ब्लॅक आणि डार्क ब्लुइश ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये ऑल-ब्लॅक फ्रंट व रिअर व्हील्ससह मॅट-फिनिश सीट देण्यात आली आहे, जी या मोटरसायकलला आकर्षक लुक देते. यापुढील, YZF-R2 चे दुसरे व्हेरियंट तिसऱ्या जनरेशनच्या बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टरने सज्ज आहे आणि मॅट व्हाईट पर्ल व रेसिंग ब्लू या रंग पर्यायांमध्ये सादर केले आहे. यामध्ये बॉडी-कलर अलॉय व्हील्स, मॉडेल-विशेष ग्राफिक्स आणि प्रीमियम फिनिशिंग समाविष्ट आहे, जे या मोटरसायकलच्या स्पोर्टी लूकला अधिक अधोरेखित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button