कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी, हैदराबाद येथे बीडब्ल्यूएफ-मान्यताप्राप्त स्पर्धेत ८ देशांतील २२५ पेक्षा जास्त ज्युनियर खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार
हैदराबाद, ऑगस्ट २०, २०२६: कोटक महिंद्रा बँकेने (केएमबीएल) आज ‘इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल सिरीज २०२६’ या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)-मान्यताप्राप्त ज्युनियर स्पर्धेची घोषणा केली. ही स्पर्धा १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा भारतातील क्रीडा टॅलेंटला निपुण करण्याप्रती कोटक महिंद्रा बँकेच्या दीर्घकालीन कटिबद्धतेचा भाग आहे. पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाउंडेशनसोबत आपल्या सहयोगाच्या माध्यमातून कोटकने कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीच्या स्थापनेला पाठबळ दिले आहे, जी तज्ज्ञ कोचिंग, उच्च-कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरणाच्या माध्यमातून तरुण बॅडमिंटन टॅलेंटचा शोध घेण्यावर आणि त्यांना विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी जागतिक दर्जाची संस्था आहे.
आंतरराष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन कॅलेंडरमधील महत्त्वाचा भाग असलेली इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल सिरीज २०२६ तरुण खेळाडूंना जगभरातील आघाडीच्या ज्युनियर खेळाडूंविरुद्ध खेळण्याची आणि मौल्यवान बीडब्ल्यूएफ रँकिंग गुण मिळवण्याची संधी देईल. अनेक देशांतील खेळाडूंना एकत्र आणून ही स्पर्धा क्रीडा भावना, आंतरराष्ट्रीय बंधुभाव आणि आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाणीला देखील प्रोत्साहन देईल. भारतातील उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंना (शट्लर्स) त्यांच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक अनुभव यामुळे मिळेल.
क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंचा विकास आणि स्पर्धात्मक संधींमध्ये शाश्वत गुंतवणुकीच्या माध्यमातून आशादायक खेळाडूंना पाठबळ देणे, भारताची बॅडमिंटन परिसंस्था दृढ करणे आणि खेळाद्वारे सर्वसमावेशक विकास व राष्ट्र उभारणीचे आपले व्यापक सीएसआर दृष्टिकोन पुढे नेणे हे कोटकचे उद्दिष्ट आहे.
अकॅडमीद्वारे हैदराबादमध्ये या स्पर्धेचे सातत्याने होणारे आयोजन बॅडमिंटनसाठीचे प्रमुख केंद्र म्हणून शहराचे स्थान आणखी दृढ करते. यामुळे तेलंगणा आणि शेजारील राज्यांतील खेळाडूंना घरापासून जवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे या खेळात व्यापक सहभाग आणि मोठ्या आकांक्षांना प्रोत्साहन मिळते.
या प्रसंगी मत व्यक्त करत कोटक महिंद्रा बँकेचे सीएसआर व ईएसजी प्रमुख हिमांशू निवसरकर म्हणाले, “कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीने गेल्या काही वर्षांत तरुण बॅडमिंटन टॅलेंटला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्हाला नवोदित खेळाडूंना शिकण्यास, प्रगती करण्यास आणि त्यांची क्षमता ओळखण्यास मदत करणाऱ्या उपक्रमांना पाठबळ देण्याचा अभिमान आहे. इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल सिरीज तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची आणि त्यांच्या क्रीडा प्रवासाच्या सुरुवातीलाच मौल्यवान अनुभव मिळवण्याची संधी देते. ही स्पर्धा बॅडमिंटनपटूंच्या पुढील पिढीला प्रेरित करत राहील आणि भारतातील खेळाच्या विकासात योगदान देईल, अशी आम्हाला आशा आहे.”
भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक आणि पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाउंडेशनचे संस्थापक पुलेला गोपीचंद म्हणाले, “ज्युनियर स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळाडूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे तरुण खेळाडूंना वेगवेगळ्या खेळण्याच्या शैलींविरुद्ध त्यांच्या कौशल्यांची चाचणी घेता येते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि उच्च स्तरावर खेळण्याच्या गरजा समजून घेता येतात. भारत आणि इतर देशांतील तरुण खेळाडूंना एकत्र आणून इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल सिरीज शिकण्यासाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म प्रदान करते. मी भारतात बॅडमिंटनचे भविष्य घडवण्यास मदत करू शकतील अशा संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेचे आभार व्यक्त करतो.”
या वर्षीच्या स्पर्धेत इंग्लंड, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, फिलीपाइन्स, अमेरिका, युएई आणि भारतातील २२५ पेक्षा जास्त ज्युनियर खेळाडू एकेरी आणि दुहेरी श्रेणींमध्ये आमनेसामने येतील. उद्घाटनाचा सोहळा १९ ऑगस्ट रोजी होईल, तर अंतिम सामने २३ ऑगस्ट रोजी होतील आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला जाईल.