- ४ पैकी ३ जनरेशन झेड उद्योजकांकडे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत आहेत, ज्यामधून पारंपारिक करिअरच्या वाटेकडून ‘पोर्टफोलिओ युगा’कडे होत असलेला बदल दिसून येतो.
- ८० टक्के संस्थापकांच्या मते, कोणत्याही पार्श्वभूमीचे व्यक्ती आता उद्योजकतेकडे वळू शकतात, कारण एआयमुळे व्यवसाय सुरू करण्यातील अडथळे कमी झाले आहेत.
भारत, १२ मे २०२६: जागतिक स्तरावर उद्योजकता बदलत आहे, याचे भारत एक प्रमुख उदाहरण म्हणून समोर येत आहे. लिंक्डइनच्या डेटामधून निदर्शनास येते की, भारतात आपल्या प्रोफाइलमध्ये ‘फाउंडर’ (संस्थापक) हा शब्द जोडणाऱ्या सदस्यांच्या संख्येत वार्षिक १०४ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक आहे, तसेच उद्योजकीय उपक्रम आणि महत्त्वाकांक्षेमध्ये मोठी लाट दिसून येत आहे. एआयमुळे व्यवसाय सुरू करण्यातील अडथळे कमी होत आहेत, करिअरच्या प्राधान्यक्रमात होणारा बदल आणि यशाच्या बदलत्या व्याख्यांमुळे ही नवीन पिढी उद्योजक म्हणून उदयास येत आहे.
जनरेशन झेड कामाच्या अधिक स्थिर पद्धतींकडे वळत आहे, त्यांचे नेतृत्व करत आहे. ४ पैकी ३ (७५ टक्के) जनरेशन झेड उद्योजकांनी उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत असल्याचे सांगितले आहे, तर जनरेशन एक्स मध्ये हे प्रमाण ६२ टक्के आहे. यामधून पोर्टफोलिओ करिअरकडे होत असलेला कल दिसून येतो, ज्याचा कामात स्थिरता निर्माण करण्याचा आणि काम व उत्पन्नावर अधिक नियंत्रण मिळवण्याचा मनसुबा आहे.
एआयमुळे उद्योजकतेच्या संधी खुल्या होत आहेत
एआय आणि डिजिटल टूल्समुळे उद्योजकता अधिक सुलभ होत आहे, ज्यामुळे खर्च, ओळखी आणि विशेष नैपुण्य यांसारखे पारंपारिक अडथळे आता कमी झाले आहेत. भारतातील पाचपैकी चार (८० टक्के) संस्थापक म्हणतात की, कोणतीही पार्श्वभूमी असली तरी आता उद्योजकता सर्वांसाठी खुली आहे, तर ८१ टक्के संस्थापकांच्या मते, आज उद्योजक होणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे.
तरुण उद्योजक या परिवर्तनाला चालना देत आहेत. ८५ टक्के जनरेशन झेड उद्योजक म्हणतात की, त्यांच्या व्यवसायासाठी एआय व डिजिटल टूल्स अत्यंत महत्त्वाची आहेत आणि अनेकांनी मान्य केले आहे की या तंत्रज्ञानामुळेच व्यवसाय सुरू करणे त्यांना शक्य वाटले.
समान प्रेरणा, नवीन दृष्टिकोन
आर्थिक स्वावलंबीत्व मिळवण्याची प्रेरणा सर्व पिढ्यांमध्ये समान असली, तरी तरुण उद्योजक यशाची व्याख्या नव्याने करत आहेत. भारतातील जनरेशन झेड उद्योजकांसाठी यशाचा अर्थ स्वातंत्र्य व स्थिरता (६४ टक्के), वैयक्तिक प्रगती (५६ टक्के) आणि आर्थिक संपत्ती (५५ टक्के) असा आहे आणि हे साध्य करण्यासाठी ते जोखीम पत्करण्यास अधिक तयार आहेत. तसेच, मागील पिढ्यांच्या तुलनेत तरुण संस्थापक नवनवीन प्रयोग करण्यास आणि उद्योजकतेच्या विविध वाटा शोधण्यास अधिक उत्सुक आहेत.
नेटवर्क आणि दृश्यमानता प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण
प्रबळ नेटवर्क आणि वैयक्तिक ब्रँड तयार करणे हे व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतातील ५ पैकी ४ (८० टक्के) उद्योजक म्हणतात की, त्यांचे प्रोफेशनल नेटवर्क व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच, दहामध्ये सहापेक्षा जास्त (६७ टक्के) उद्योजक स्वतःला कंटेंट क्रिएटर मानतात, ज्यामधून आजच्या व्यावसायिक क्षेत्रात वैयक्तिक ब्रँडिंग आणि प्रेक्षकवर्ग तयार करण्याचे महत्त्व निदर्शनास येते.
लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाभिरमन म्हणाले: “भारतात नेहमी प्रबळ उद्योजकीय भावना राहिली आहे, पण आता बदललेली गोष्ट म्हणजे व्यक्ती त्यावर वेगाने कृती करू शकतात. एआयमुळे अडथळे दूर होत आहेत, ज्यामुळे पूर्वी व्यवसाय सुरू करणे आवाक्याबाहेर वाटत असे. यामुळे नवीन पिढीतील संस्थापकांना अधिक आत्मविश्वासाने प्रयोग करण्यास आणि व्यवसाय उभारण्यास मदत होत आहे. आम्ही ‘पोर्टफोलिओ युगा’चा उदय देखील पाहत आहोत, जिथे अधिक प्रोफेशनल्स उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करत आहेत आणि करिअरच्या पारंपारिक व्याख्येत बदल घडवून आणत आहेत. या बदलामुळे उद्योजकता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाली आहे.”
उद्योजकांना प्रगतीसाठी मदत करणारी लिंक्डइन टूल्स:
● तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी टूल्स: प्रीमियम बिझनेसद्वारे तुमची अनोखी कथा सांगणारे संस्थापक-नेतृत्वित प्रोफाइल तयार करा. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी डायनॅमिक कव्हर इमेजेस आणि कस्टम बटनद्वारे तुमच्या वेबसाइटची लिंक यांसारखे कॉल टू अॅक्शनची भर करा, ज्यामुळे तुमचे प्रोफाइल एका ऑलवेज-ऑन बिझनेस कार्डसारखे काम करेल. आम्ही अॅडव्हाइस सेशन्स देखील सुरू करत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर सशुल्क सेशन्स देऊ शकाल.
● पहिल्याच वेळी योग्य व्यक्तीची निवड करा: हायरींग प्रोमधील नवीन एआय-संचालित चॅट अनुभव तुम्हाला लिंक्डइनच्या हायरींग एजंटसोबत साध्या भाषेत संवाद साधण्याची सुविधा देतो. यामुळे उमेदवारांचे निकष निश्चित करणे, अभिप्राय शेअर करणे आणि वेळेची बचत करणे सोपे होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य व्यक्ती मिळेल.
● तुमच्या व्यवसायाच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी: प्रीमियम ऑल-इन-वनसह, लघु उद्योजक एकाच विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरून ग्राहक शोधू शकतात, त्यांच्या सेवांचे मार्केटिंग करू शकतात आणि टॅलेंटची नियुक्ती करू शकतात. यासंदर्भात सुरुवातीचे वापरकर्ते लिंक्डइनवर अधिक दृश्यमानता अनुभवत आहेत, ज्यामध्ये फॉलोअर्समध्ये ५७ टक्के आणि प्रोफाइल व्ह्यूजमध्ये ४० टक्के वाढ दिसून आली आहे.
● तुमच्या कंपनीची दृश्यमानता वाढवा: प्रीमियम कंपनी पेजमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवू शकता आणि अधिक संभाव्य ग्राहकांना आकर्षित करू शकता. प्रीमियम कंपनी पेजेसना ७.५ पट जास्त एंगेजमेंट आणि ५.८ पट जास्त पेज व्ह्यूज मिळतात. यामध्ये [न्यू] कॉम्पिटिटर अॅनालिटिक्सचा समावेश आहे, जो तुम्हाला तुमच्या कंपनीच्या निकालांची तुलना इतर ९ कंपन्यांशी करण्यास मदत करतो.
उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी आणि एआयचा प्रभावी वापर करण्यास मदत व्हावी म्हणून लिंक्डइन आपल्या लिंक्डइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे काही कोर्सेस मोफत उपलब्ध करून देत आहे. हे कोर्सेस २०२६ च्या अखेरपर्यंत मोफत उपलब्ध असतील.