इंद्रियाचे हिऱ्यांच्या उत्कृष्ट चमकण्यवर विशेष लक्ष, ज्यामुळे हिरे खरेदीमध्ये आनंद आणि विश्वास निर्माण होईल; केवळ ५ पैकी १ नैसर्गिक हिराच निकषांवर उतरतो खरा, रिटेल क्षेत्रातील खास संपादन मिळवले
मुंबई, २५ जून २०२६: आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने नैसर्गिक हिऱ्यांच्या निवडीमध्ये उद्योगातील पहिलाच मापदंड स्थापित केला आहे, यामुळे हिरे खरेदीचा अनुभव अधिक आनंददायी आणि विश्वासार्ह होणार आहे. उत्कृष्ट चमक हीच हिऱ्याच्या गुणवत्तेची सर्वात स्पष्ट अभिव्यक्ती आहे या विश्वासावर आधारित हा दृष्टिकोन ब्रँडच्या सर्वोत्तम निवड मानकांवर तयार करण्यात आला आहे. पारंपारिक ग्रेडिंग मानकांच्या पलीकडे जाऊन हिऱ्याची कटिंग आणि निवडीबाबत इंद्रियाचा दृष्टिकोन हा हिरा किती प्रभावीपणे प्रकाश परावर्तित करतो आणि उत्कृष्ट चमक (ब्रिलियन्स, फायर आणि सिंटिलेशन) देतो, याचे मूल्यांकन करतो. या कठोर मानकांवर ५ पैकी केवळ १ नैसर्गिक हिरा पात्र ठरतो.
हा बदल या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. जागतिक हिरे उद्योगात भारत हा मुख्य केंद्रस्थानी असून जगातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त हिऱ्यांचे कटिंग व पॉलिशिंग सुरत आणि मुंबईसारख्या भागांत होते. ही सखोल कौशल्ये असूनही भारतात हिऱ्यांच्या दागिन्यांचा वापर अद्याप १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. योग्य प्रमाण आणि उत्कृष्ट प्रकाश परावर्तन असणाऱ्या हिऱ्यांना प्राधान्य देऊन इंद्रिया देशातील सर्वात चमकदार हिरे समोर आणत आहे, तसेच पारंपारिक 4Cs च्या पलीकडे जाऊन भारतातील ग्राहकांच्या हिऱ्यांचे मूल्यांकन आणि निवड करण्याच्या पद्धती बदलण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
चमकण्यामागील विज्ञान (द सायन्स बिहाइंड द स्पार्कल)
हिऱ्याची स्पष्टता, रंग आणि कॅरेट हे भौतिक गुणधर्म निसर्गाकडून मिळतात, पण त्याची कटिंग ही मानवी कलाकुसर आणि अचूकतेचा परिणाम आहे. हिऱ्यामध्ये प्रकाश कसा प्रवेश करतो, तो आत कसा परावर्तित होतो आणि बाहेर कसा पडतो हे कटिंग ठरवते; ज्यामुळे हिऱ्याची खरी चमक वाढते. उत्तम प्रकारे कट केलेला हिरा प्रकाश परावर्तन जास्तीत जास्त वाढवतो, तर सामान्य कटिंगमुळे प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे हिऱ्याच्या चमकेमध्ये स्पष्ट फरक दिसून येतो.
इंद्रियामध्ये, प्रकाशाच्या कामगिरीच्या (लाईट परफॉर्मन्स) तीन मुख्य पैलूंद्वारे कटिंग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतली जाते: ब्रिलियन्स, फायर आणि सिंटिलेशन. हिरा परिधान केल्यानंतर खरोखर कसा दिसतो, हे या तीन गोष्टींवरून स्पष्ट होते:
• ब्रिलियन्स: हिऱ्याच्या पैलूंवरून परावर्तित होणारा पांढरा प्रकाश.
• फायर: प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगपटांमध्ये होणारे विघटन.
• सिंटिलेशन: प्रकाशाच्या हालचालीमुळे हिऱ्यामध्ये दिसणारी व चमकणारी चमक
या पॅरामीटर्सवर केवळ इंद्रियाच्या कडक मानकांची पूर्तता करणारे, अचूक प्रमाण असलेले, उत्कृष्ट प्रकाश परावर्तन देणारे आणि कमीत-कमी लाईट लिकेज असणारे हिरे निवडले जातात. जवळपास रंगहीन असणारे F–H–G श्रेणीतील हिरे आणि उच्च स्पष्टतेचे टेबल हिऱ्याचे परावर्तन आणखी वाढवतात, ज्यामुळे हिरा परिधान केल्यावर प्रत्येक क्षणी अपवादात्मक चमक मिळते.
ग्राहक आणि भागधारकांना हा फरक प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी इंद्रियाने स्पार्कलस्कोप हे इन-स्टोअर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर केले आहे, जे ग्राहकांना हिऱ्याच्या चमकण्याचे मूल्यमापन करण्यास सक्षम करते. चमक डोळ्यांना दिसेल अशा पद्धतीने मोजण्यायोग्य बनवून हा अनुभव खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणतो, ज्यामुळे ग्राहकांना इंद्रिया हिऱ्यांचे वेगळेपण पाहणे, समजून घेणे आणि त्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते.