या विजयादशमीसाठी भव्य उत्सवानिमित्त इंद्रियाचे फेस्टिव्ह कलेक्शन पद्मिकामधील अप्रतिम ज्वेलरी डिझाइनचे रूपांतर भव्य रंगावल्लीमध्ये करण्यात आले.
बेंगळुरू, २६ ऑक्टोबर २०२६: इंद्रिया या आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँडने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि सणांच्या चिरंतन परंपरांना अनोखा सलाम म्हणून आज बेंगळुरू येथील ओरियन मॉल आणि श्री सत्य गणपती शिर्डी साईबाबा मंदिरात धान्यांपासून साकारलेली भारतामधील सर्वात मोठी शाश्वत ज्वेलरी रंगावल्ली (रांगोळी) सादर केली. १६०० चौरस फुटांमध्ये पसरलेली ही भव्य कलाकृती नवीन फेस्टिव्ह कलेक्शन ‘पद्मिका’मधील अप्रतिम ज्वेलरी डिझाइनवरून प्रेरित आहे. या रंगावल्लीने उत्कृष्ट दागिन्यांच्या कारागिरीचे रूपांतर विहंगम रांगोळीमध्ये करत भक्ती, कलाकुसर आणि सामूहिक भावनेने नटलेल्या लोकप्रिय सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा केला.
२२ कॅरेट सोन्यामध्ये साकारलेल्या पद्मिका कलेक्शनने दुर्मिळ गुलाबी मीनाकारीच्या पुनरुज्जीवनाचा उत्सव साजरा केला. यातील नेकलेसवर नक्षीदार फुलांचे बारीक कोरीव काम असून समृद्धी, संपन्नता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असलेल्या कमळावर विराजमान देवी लक्ष्मीचे शुभ रूप रेखाटण्यात आले होते. तांदूळ, भरडधान्य (मिलेट्स) आणि बियाण्यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारलेली ही भव्य रंगावल्ली नेकलेसच्या नाजूक कलाकुसरीला मोठ्या कलाकृतीद्वारे आपल्या सांस्कृतिक वारशाला मानवंदना म्हणून सादर करण्यात आली. हजारो बारकाव्यांना एकत्र गुंफणा-या या कलाकृतीमधून दागिने घडवणे आणि रांगोळी साकारणे या दोन्हींमध्ये लागणारी अचूकता, संयम व कारागिरी दिसून आले. विविध प्रकारची धान्ये, बाजरी-ज्वारीसारखी भरडधान्ये आणि बियाण्यांपासून तयार केलेल्या या कलाकृतीने पारंपारिक कलांचे चिरंतन सौंदर्य दाखवून देण्यासोबत येणाऱ्या भाविकांना व दर्शकांना आगळावेगळा आणि मनमोहक उत्सवी अनुभव दिला.
सांस्कृतिक अस्मितेमध्ये रुजलेला हा उपक्रम ‘३डी रांगोळी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आणि विक्रम प्रस्थापित करणाऱ्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार शिखा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला. एका देखण्या टेम्पल ज्वेलरी डिझाइनचे रांगोळीमध्ये रूपांतर करून इंद्रियाने दोन कलाप्रकारांचा सन्मान केला, जे नाजूक डिझाइन, उत्कृष्ट कारागिरी आणि वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून काहीतरी अद्भुत घडवण्याच्या समान मूल्यांवर आधारलेले होते.
शाश्वतता या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग होता आणि या कलाकृतीने केवळ सणापुरती मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन मोठा उद्देश साध्य केला. विजयादशमीच्या उत्सवानंतर या रांगोळीसाठी वापरण्यात आलेले तांदूळ, भरडधान्ये आणि बियाणे अखिल कर्नाटक प्राणी दया संघ गोशाळा यांच्या सहयोगाने पक्षी आणि प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी जबाबदारीने वापरण्यात आले.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत इंद्रियाचे मार्केटिंग अँड व्हिज्युअल मर्चेंडायझिंगचे प्रमुख शांतिस्वरूप पांडा म्हणाले, “इंद्रियामध्ये अर्थपूर्ण आणि आधुनिक अभिव्यक्तींच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणे आणि साजरा करणे हाच आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ही ज्वेलरी रंगावल्ली त्याच दृष्टिकोनाचा भाग आहे, ज्याद्वारे आमच्या ग्राहकांच्या मनाशी जोडल्या गेलेल्या लोकप्रिय सणाच्या परंपरेतून पद्मिकाच्या अप्रतिम डिझाइनला नव्याने सादर करण्यात आले आहे. संस्कृती आणि कारागिरीपासून प्रेरणा घेणारा ब्रँड म्हणून, आम्हाला सर्वोत्तम अनुभव निर्माण करायचा होता, जो केवळ आमच्या दागिन्यांमागील कलाकुसर दाखवणार नाही, तर ग्राहकांनाही त्यासोबत संस्मरणीय पद्धतीने जोडेल. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विजयादशमीच्या केंद्रस्थानी असलेला सांस्कृतिक वारसा, कारागिरी आणि एकात्मतेची भावना साजरी करत आहोत.”