इंद्रियाकडून ‘फेस्टिव्हल ऑफ लव्ह’ लाँच, या दिवाळी मोहिमेमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचा सहभाग

News Service

ही फेस्टिव्ह मोहीम प्रेम, जिव्हाळा आणि एकोप्याचे क्षण साजरे करते, जे दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी बनवतात.

मुंबई, ऑक्टोबर २०२६: दरवर्षी आपण आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत जल्लोषात दिवाळी सण साजरा करतो. यादरम्यान घराची सजावट, धार्मिक विधींची तयारी ते भेटवस्तूंची निवड करणे आणि कुटुंब व मित्रांचे स्वागत करण्यापर्यंत प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची ठरते. तरीही, या उत्सवाच्या गडबडीत, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींबद्दल साधे आणि मनापासून प्रेम व्यक्त करणे अनेकदा मागे पडते. ‘आम्ही मध्ये आपण’ (‘Us in We’) शोधण्याच्या इंद्रियाच्या तत्त्वज्ञानावर आधारित फेस्टिव्हल ऑफ लव्ह उपक्रम प्रत्येक उत्सवामध्ये नाती आणि आपुलकीचे बंध साजरे करतो. यंदा दिवाळीत, आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रिया अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचा सहभाग असलेल्या आपल्या नवीन मोहिमेच्या माध्यमातून हाच विचार प्रत्यक्षात साकारत आहे.

ही मोहीम जल्लोषात साजरा केल्या जाणाऱ्या दिवाळी सणादरम्यान दोन व्यक्तींमधील जिव्हाळा, आपुलकी आणि जवळीक प्रत्यक्षात साकारते. सणानिमित्त मित्रांचे स्वागत करण्याची तयारी करणाऱ्या अदिती आणि सिद्धार्थ यांच्याभोवती फिरणारी जाहिरात सणासुदीच्या धावपळीत अनेकदा मागे पडणारा त्यांचा सहज संवाद आणि एकत्र राहण्याची शांत ओढ टिपते. दिवाळीच्या तयारीच्या धावपळीतून वाट काढत असताना एक विचारपूर्वक केलेली कृती केंद्रस्थानी येते, ज्यामुळे निर्माण झालेला भावूक क्षण पाहून त्यांचे मित्र मिश्कीलपणे विचारतात, “आज दिवाली है या व्हॅलेंटाईन्स डे?”

प्रत्येक उत्सव व्यक्तींमधील नात्यामुळे अर्थपूर्ण बनतो, हा विचार फेस्टिव्हल ऑफ लव्हच्या मुळाशी आहे. दिवाळी सण एकोपा आणि सामायिक आनंदाचे प्रतीक असला, तरी आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी केलेल्या वैयक्तिक गोष्टी मनावर सर्वात खोल ठसा उमटवतात. या मोहिमेद्वारे, इंद्रिया आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या क्षणांवर प्रकाश टाकते, जिथे दागिने केवळ आभूषण न राहता प्रेम, कृतज्ञता आणि एकोप्याची अर्थपूर्ण अभिव्यक्ती बनतात.

इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, “उत्सव, भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि शुभ खरेदीच्या चिरंतन परंपरांमुळे सणासुदीचा काळ ज्वेलरी उद्योगासाठी सर्वात महत्त्वाचा राहिला आहे. इंद्रिया संपूर्ण भारतात आपली उपस्थिती वाढवत असताना आजच्या ग्राहकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धतीशी सुसंगत कथांच्या माध्यमातून त्यांच्याशी अधिक खोल भावनिक नाते निर्माण करण्याची ही उत्तम संधी म्हणून आम्ही पाहतो. फेस्टिव्हल ऑफ लव्हच्या माध्यमातून आम्हाला सणांचा काळ अर्थपूर्ण बनवणाऱ्या नात्यांवर आणि त्या क्षणांवर प्रकाश टाकायचा होता, तर पद्मिका कलेक्शन समृद्धी, आशीर्वाद आणि नवीन सुरुवातीपासून प्रेरित दागिन्यांच्या माध्यमातून ही भावना प्रत्यक्षात आणते. एकत्र विचार केल्यास, यामधून भारतीय संस्कृतीत मुळे असलेले, पण आधुनिक ग्राहकांसाठी तितकेच समर्पक दागिने तयार करण्याचा आमचा दृष्टिकोन दिसून येतो.”

इंद्रियाचे मार्केटिंग आणि व्हिज्युअल मर्चेंडायझिंगचे प्रमुख शांतिस्वरूप पांडा म्हणाले, ‘फेस्टिव्हल ऑफ लव्ह आमच्या ‘आम्ही मध्ये आपण’ (Us in We’) तत्त्वज्ञानाचा स्वाभाविक विस्तार आहे, जो आपल्या आयुष्याला अर्थ देणारी नाती साजरी करतो. यंदा दिवाळीत, उत्सवाच्या मोठ्या झगमगाटाच्या पलीकडे जाऊन आम्हाला सणाचा आनंद घेताना शांतपणे घडणाऱ्या आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करायचे होते. अदिती आणि सिद्धार्थ यांनी हा विचार अगदी सहजतेने प्रत्यक्षात आणला. एक जोडपे म्हणून, ते त्या क्षणांमधील उत्साहीपणा, खोडकरपणा आणि खरी मैत्री दर्शवतात, जी ही मोहीम साजरी करते, ज्यामुळे ही कथा अधिक खरी आणि स्वतःशी जुडणारी वाटते.”
या मोहिमेच्या संकल्पनेबाबत मत व्यक्त करत ओगिल्वी वेस्टच्या ब्युटी अँड लक्झरी कलेक्टिव्हच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह हेड तनुजा भट म्हणाल्या, “दिवाळी म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करणे असले, तरी आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तींसोबत व्यतित केलेले छोटे क्षण देखील महत्त्वाचे असतात. ‘फेस्टिव्हल ऑफ लव्ह’च्या माध्यमातून आमची उत्सवाच्या झगमगाटापलीकडे जाऊन त्यातील जवळीक अनुभवण्याची इच्छा होती. आम्ही एका जोडप्याच्या माध्यमातून हे मांडण्याचे आणि सहज संवाद, छोट्या कृती व अनपेक्षित प्रेमाच्या क्षणांसह परिपक्व नाते टिपण्याचे ठरवले. कारण सर्व तयारी आणि उत्सवाच्या गडबडीत, आपल्या प्रियजनांसोबत हे वरवर छोटे वाटणारे क्षण सणाला खऱ्या अर्थाने अधिक उत्साहवर्धक बनवतात. आमच्यासाठी ‘फेस्टिव्हल ऑफ लव्ह’चा हाच खरा अर्थ आहे.”

ही मोहीम पद्मिकाचे अनावरण देखील करते, जे २२ कॅरेट सोन्यात तयार केलेला आणि देवी लक्ष्मी, समृद्धी व शुभ सुरुवातीच्या प्रतीकांपासून प्रेरित असलेला इंद्रियाचा नवीन फेस्टिव्ह कलेक्शन आहे. सणासुदीच्या काळासाठी डिझाइन केलेले हे कलेक्शन पारंपारिक संकल्पनांना समकालीन डिझाइनच्या दृष्टिकोनातून नव्याने मांडते, तसेच अर्थपूर्ण आणि आधुनिक दागिने सादर करते. पद्मिकाच्या केंद्रस्थानी गुलाबी मीनाकारीचे पुनरुज्जीवन आहे, जे पारंपारिक गुलाबी इनॅमल क्राफ्ट आहे, तसेच पवित्रता, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असलेले कमळ आणि देवी लक्ष्मी यांसारख्या शुभ प्रतीकांची जोड दिली आहे. सणासुदीच्या दागिन्यांच्या परंपरेचे वैशिष्ट्य असलेल्या चमकदार २२ कॅरेट पिवळ्या सोन्यामध्ये तयार केलेल्या या कलेक्शनमध्ये नेकलेस, कानातले, बांगड्या आणि स्टेटमेंट पीसेसचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button