इंस्टाग्रामने १३ वर्षांहून अधिक वयोगटासाठी कंटेंट रेटिंग्‍जमधून प्रेरित होऊन टीन अकाउंट्सचा विस्तार केला

News Service

महत्त्वाचे मुद्दे

  • इंस्टाग्राम चित्रपट क्षेत्रातील १३+ रेटिंग निकष आणि पालकांच्या अभिप्रायातून प्रेरणा घेऊन आपल्या नवीन आणि सुधारित टीन अकाउंट्सचा विस्तार करत आहे.
  • आमचे ध्येय आहे की, भारतातील किशोरवयीन मुलांना इंस्टाग्रामवर डीफॉल्टनुसार असा कंटेंट दिसावा, जो त्यांच्या वयोगटासाठी योग्य असेल.
  • • ज्या पालकांना अतिरिक्त नियंत्रणे हवी आहेत, ते लिमिटेड कंटेंट नावाचा नवीन आणि अधिक कडक पर्याय निवडू शकतात. यामुळे त्यांच्या पाल्याने इंस्टाग्रामवर काय पाहावे, यावर पालकांना अधिक नियंत्रण मिळेल.

आज आम्ही इंस्टाग्रामच्या वयोगट-योग्य १३+ कंटेंट रेटिंग आणि लिमिटेड कंटेंट सेटिंगचा भारतात विस्तार करत असल्याची घोषणा करत आहोत. याचा अर्थ असा की, किशोरवयीन मुलांना इंस्टाग्रामवर डीफॉल्टनुसार असा कंटेंट दिसावा, जो त्यांच्या वयोगटासाठी योग्य असेल. १८ वर्षांखालील सर्व मुलांना आपोआप या नवीन ‘१३+’ सेटिंगमध्ये समाविष्ट केले जाईल आणि पालकांच्या परवानगीशिवाय त्यांना या सेटिंगमधून बाहेर पडता येणार नाही.

ज्याप्रमाणे १३+ रेटिंग असलेल्या चित्रपटामध्ये तुम्हाला काही सूचक कंटेंट किंवा कठोर भाषा ऐकायला मिळू शकते, तसेच इंस्टाग्रामवरही कधी-कधी अशा गोष्टी किशोरवयीन मुलांच्या समोर येऊ शकतात. पण, अशा घटना दुर्मिळ राहतील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्‍न करत राहू. कोणतीही यंत्रणा परिपूर्ण नसते, हे आम्ही मान्य करतो आणि काळानुसार त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला आशा आहे की, या अपडेटमुळे पालकांना विश्वास मिळेल की आम्ही त्यांच्या मुलांना डीफॉल्टनुसार सुरक्षित आणि वयाला साजेसे कंटेंट दाखवण्यासाठी प्रयत्‍न करत आहोत, तसेच त्यांना त्यांच्या मुलांचा ऑनलाइन अनुभव ठरवण्यासाठी अधिक पर्यायही देत आहोत.

मूव्‍ही रेटिंग्‍ज निकष आणि पालकांच्या अभिप्रायानुसार किशोरवयीन मुलांसाठी कंटेंट धोरण अपडेट करणे
किशोरवयीन मुलांना अयोग्य कंटेंटपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मुळात टीन अकाउंट्सची रचना करण्यात आली होती. आता, सुधारित ‘डीफॉल्ट १३+’ सेटिंगमध्ये जास्तीत-जास्त संभाव्य अयोग्य कंटेंट लपवण्यासाठी आम्ही आमच्या वयोगट-योग्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहोत.
आम्ही आमची धोरणे स्वतंत्र मानकाशी सुसंगत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याबाबत पालकांना आधीच माहित आहे. म्हणून, आम्ही आमच्या वयोगट-योग्य मार्गदर्शक तत्त्वांची १३+ वयोगटासाठीच्या चित्रपट रेटिंगशी तुलना केली आणि त्यानुसार त्यात सुधारणा केल्या. चित्रपट आणि सोशल मीडिया यामध्ये अर्थातच फरक आहे, तरीही आम्ही हे बदल अशा प्रकारे केले आहेत की, ज्‍यामुळे १३+ सेटिंगमधील किशोरवयीन मुलांचा अनुभव हा १३+ रेटिंग असलेला चित्रपट पाहण्याइतकाच सुरक्षित आणि साजेसा वाटेल.

आमच्या जुन्या धोरणांमध्ये आधीपासून किशोरवयीन मुलांपासून लैंगिक सुचवणारा कंटेंट, हिंसक किंवा विचलित करणारी चित्रे आणि तंबाखू किंवा अल्कोहोल विक्रीसारखा प्रौढ कंटेंट लपवला जातो किंवा तो न सुचवण्यावर भर दिला जातो. आता आमची अद्ययावत धोरणे याही पलीकडे जातील. यामध्ये कठोर भाषा असलेले पोस्ट, काही धोकादायक स्टंट्स आणि संभाव्य हानिकारक वर्तणुकीला प्रोत्साहन देणारा अतिरिक्त कंटेंट, उदा. गांजाशी संबंधित साहित्य/साधने दर्शविणाऱ्या पोस्ट लपवणे किंवा शिफारस न करणे याचा समावेश आहे.

टीन अकाउंट्ससाठी सुरक्षितता विस्तारत आहे
आमच्या अद्ययावत वयोगट-योग्य मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जाणारा कंटेंट स्वतःहून ओळखण्यासाठी आम्ही आमचे तंत्रज्ञान अधिक प्रगत आणि अचूक केले आहे. आम्ही या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर इंस्टाग्रामवर करत आहोत, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • अकाउंट्स: किशोरवयीन मुले आता अशा अकाउंट्सना फॉलो करू शकणार नाहीत, जे नियमितपणे वयाला न साजेसा कंटेंट शेअर करतात, किंवा ज्यांचे नाव किंवा बायो किशोरवयीन मुलांसाठी अयोग्य असल्याचे आढळते. मुले आधीपासून अशा अकाउंट्सना फॉलो करत असतील, तर त्यांना यापुढे त्या अकाउंट्सचा कंटेंट दिसणार नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधता येणार नाही. त्यांना डीएम (DM) पाठवता येणार नाहीत किंवा इतरांच्या पोस्टखालील त्यांच्या कमेंट्सही दिसणार नाहीत. आम्ही किशोरवयीन मुलांना अशा अकाउंट्सची शिफारस करणार नाही आणि सर्चमध्ये अशी अकाउंट्स शोधणे कठीण करू. ही सुरक्षा दोन्ही बाजूंनी लागू असेल, म्हणजेच ही अकाउंट्स देखील किशोरवयीन मुलांना फॉलो करू शकणार नाहीत, त्यांना मेसेज पाठवू शकणार नाहीत किंवा त्यांच्या पोस्टवर कमेंट करू शकणार नाहीत.
  • सर्च: आत्महत्या, स्वतःला दुखापत करून घेणे आणि खाण्याच्या विकारांशी संबंधित शोध संज्ञांवर आम्ही आधीच बंदी घातली आहे. आता आम्ही ‘अल्कोहोल’ किंवा ‘गोअर’ (हिंसक दृश्ये) यांसारख्या प्रौढ स्वरूपाच्या शोध संज्ञांसाठी निकाल पाहण्याची मुलांची क्षमता ब्लॉक करू. तसेच, या संज्ञांचे स्पेलिंग चुकले असेल, तरीही त्या ब्लॉक राहतील याची आम्ही खात्री घेत आहोत.
  • कंटेंट अनुभव: किशोरवयीन मुलांना आमच्या अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जाणाऱ्या कंटेंट शिफारसींमध्ये (एक्‍सप्‍लोअर, रील्‍स व इन-फीड), फीडमध्ये आणि स्टोरीजमध्ये दिसणार नाही. अगदी त्यांच्या ओळखीच्‍या व्यक्तीने शेअर केला असला तरीही ते किंवा त्यावरील कमेंट्स दिसणार नाहीत. एखाद्याने अशा कंटेंटची लिंक मुलांना थेट मेसेज (डीएम) द्वारे पाठवली, तर त्यांना ती लिंक उघडता येणार नाही.
  • एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स): चित्रपट क्षेत्रातील १३+ वयोगटाच्या रेटिंगनुसार आम्ही किशोरवयीन मुलांसाठी आमचा एआय अनुभव देखील अद्ययावत केला आहे. याचा अर्थ असा की, १३+ रेटिंग असलेल्या चित्रपटामध्ये जो कंटेंट अयोग्य वाटू शकतो, अशा कंटेंटकरिता उत्तरे किंवा प्रतिसाद एआयकडून मुलांना दिले जाणार नाहीत.

सादर करत आहोत लिमिटेड कंटेंट: अतिरिक्त नियंत्रण इच्छिणाऱ्या पालकांसाठी नवीन आणि अधिक कडक सेटिंग
प्रत्येक कुटुंब वेगळे असते आणि काही पालकांसाठी १३+ वयोगटासाठी रेट केलेले चित्रपट देखील त्यांच्या मुलांसाठी अधिक प्रौढ वाटू शकतात. म्हणून, आम्ही ‘लिमिटेड कंटेंट’ नावाचे नवीन आणि अधिक कडक सेटिंग आणत आहोत, जे टीन अकाउंटच्या अनुभवातून आणखी जास्त कंटेंट दूर करेल. तसेच, यामुळे किशोरवयीन मुलांची पोस्टखालील कमेंट्स पाहण्याची, कमेंट्स करण्याची किंवा प्राप्त करण्याची क्षमता देखील काढून टाकली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button