एलटीएम आणि सर्व्हिसनाऊ यांनी एजेंटिक AI चा विस्तार करण्यासाठी भागीदारी केली

News Service
  • सर्व्हिसनाऊ AI प्लॅटफॉर्म आणि एलटीएम चे तांत्रिक ज्ञान व अनुभव यांच्या मदतीने मोठ्या कंपन्यांना सुरक्षित आणि योग्य नियंत्रणासह एजेंटिक AI वापरता येणार आहे.
  • 700 हून अधिक सामायिक ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करणार आहेत. यासाठी एलटीएम स्वतःच्या कामातील बदलांचा अनुभव इतर कंपन्यांसमोर उदाहरण म्हणून मांडणार आहे.

क्लारा, कॅलिफोर्निया – 5 नोव्हेंबर 2026 – सर्व्हिसनाऊ आणि एलटीएम यांनी एजेंटिक AI चा वापर वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना एकत्रितपणे अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी आपली भागीदारी वाढवण्याची घोषणा केली.
सर्व्हिसनाऊ हे व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी AI आधारित व्यासपीठ उपलब्ध करून देते, तर एलटीएम कडे विविध उद्योगांचे ज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि व्यवसायातील बदल घडवण्याचा अनुभव आहे. या दोन्ही कंपन्या आपले अनुभव एकत्र आणून मोठ्या कंपन्यांना एजेंटिक AI चा वापर संपूर्ण व्यवसायात करण्यास मदत करणार आहेत. यामुळे AI चा वापर अधिक सुरक्षित आणि योग्य नियंत्रणाखाली होईल. तसेच व्यवसायात होणारे फायदे मोजता येतील.



सर्व्हिसनाऊ ची अधिकृत भागीदार असलेल्या एलटीएम चे 700 हून अधिक सामायिक ग्राहक आहेत. एलटीएम आपल्या कंपनीमध्ये केलेल्या AI वापराचा अनुभव इतर ग्राहकांसाठी उदाहरण म्हणून वापरणार आहे. याला ‘क्लायंट-झिरो’ असे म्हटले जाते.

एलटीएम ने आपल्या कंपनीच्या कामकाजात 1,500 सर्व्हिसनाऊ AI एजंट्स वापरण्यास सुरुवात केली आहे. हे AI एजंट्स कर्मचाऱ्यांसोबत काम करून त्यांना दैनंदिन कामांमध्ये मदत करतात. त्यामुळे कंपनीमध्ये एक डिजिटल कार्यशक्ती तयार झाली आहे.

यासोबतच, सर्व्हिसनाऊ चे सुपर इंटेलिजन्स कंट्रोल टॉवर कंपनीमध्ये किती AI साधने वापरली जात आहेत, त्यांचे व्यवस्थापन कसे केले जात आहे आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम काय आहेत, यावर लक्ष ठेवण्यास मदत करते. यामुळे AI साधनांचे व्यवस्थापन आणि कामातील कार्यक्षमता 80 टक्क्यांपर्यंत सुधारेल, अशी अपेक्षा एलटीएम ने व्यक्त केली आहे.

लटीएम ला स्वतःच्या कंपनीमध्ये सर्व्हिसनाऊ वापरताना मिळालेला अनुभव आता दोन्ही कंपन्या एकत्रितपणे तयार करणाऱ्या नवीन सेवा आणि उपाययोजनांसाठी उपयोगी पडणार आहे. यामुळे ग्राहकांना एजेंटिक AI लवकर स्वीकारता येईल, त्यावर योग्य नियंत्रण ठेवता येईल आणि संपूर्ण व्यवसायात त्याचा वापर वाढवता येईल.

सर्व्हिसनाऊ AI प्लॅटफॉर्म मुळे एलटीएम ला सायबर सुरक्षा, मानव संसाधन (HR), माहिती तंत्रज्ञान (IT) आणि प्रकल्प व्यवस्थापन या विभागांमध्ये आधीपासूनच फायदे मिळत आहेत.
सर्व्हिसनाऊ च्या उपायांमुळे सुरक्षा विभागातील कामे अधिक सोपी आणि जलद होत आहेत. IT संबंधित तक्रारींची संख्या कमी होत आहे. तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कामांचा आढावा घेण्यासाठी लागणारा वेळ 87 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button