मेडट्रॉनिक आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्‍याकडून हैदराबादमध्ये अत्याधुनिक अॅडव्हान्स्ड आयसीयू व्यवस्था करण्यासाठी धोरणात्मक सहयोगाची घोषणा

News Service

अपोलो जुबली हिल्स येथील नवीन ११-बेड सुविधेत एकात्मिक अॅक्युट केअर अँड मॉनिटरिंग तंत्रज्ञान असेल आणि ते मेडट्रॉनिक आरअँडडीसाठी प्रत्यक्ष क्लिनिकल इनोव्हेशन हब म्हणून काम करेल

हैदराबाद, १६ जुलै २०२६: मेडट्रॉनिक ही हेल्थकेअर तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीची कंपनी आणि अपोलो हॉस्पिटल्सने आज अपोलो हॉस्पिटल्स, जुबली हिल्स येथे “आयसीयू ऑफ द फ्युचर” या ११-बेड अत्याधुनिक अतिदक्षता विभागाच्‍या (आयसीयू) उद्घाटनाची घोषणा केली. ही नवीन सुविधा मेडट्रॉनिकच्या प्रगत अॅक्युट केअर अँड मॉनिटरिंग (एसीएम) तंत्रज्ञान आणि उपायांसह पूर्णपणे एकात्मिक असेल, जी सहयोगी आरोग्यसेवा नाविन्‍यतेमधील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

जुबली हिल्स कॅम्पसमध्ये आयोजित औपचारिक उद्घाटन समारंभादरम्यान अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संगीता रेड्डी, अपोलो हेल्थअॅक्सिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनप्रीत सिंग आणि मेडट्रॉनिकचे भारतीय उपखंड देशांमधील व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष मनदीप सिंग कुमार यांनी सामंजस्य करारावर (एमओयू) अधिकृतपणे स्वाक्षरी केली.

मेडट्रॉनिकच्या एसीएम टीमच्या सहयोगाने विकसित केलेला हा उपक्रम अतिदक्षता सेवा पायाभूत सुविधा दृढ करण्यासाठी आणि सहयोगी आरोग्यसेवा नाविन्‍यतेला गती देण्यासाठी पुढचे पाऊल आहे. हे एकात्मिक आयसीयू वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या गरजांना पाठबळ देण्यासाठी, तसेच चिकित्सक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये अधिक जवळचा सहयोग वाढवण्यासाठी डिझाइन केले आहे. वैद्यकीय नैपुण्य आणि प्रगत तंत्रज्ञान एकत्र आणून या सहयोगाचे उद्दिष्ट अधिक माहितीपूर्ण आरोग्यसेवा वितरण सक्षम करणे आणि रुग्णांच्या उपचारातील परिणाम सुधारण्यासाठी योगदान देणे हे आहे.

“मेडट्रॉनिकमध्ये आमचा विश्वास आहे की, अर्थपूर्ण आरोग्यसेवा नाविन्‍यता प्रबळ वैद्यकीय सहयोग आणि उपचार वितरणाच्या सखोल आकलनावर आधारित असते,” असे मेडट्रॉनिकचे भारतीय उपखंड देशांमधील उपाध्यक्ष मनदीप सिंग कुमार म्हणाले. “अपोलो हॉस्पिटल्समधील या अॅडव्हान्स्ड आयसीयूमधून रुग्णांची काळजी आणि वैद्यकीय उत्कृष्टतेप्रती सामायिक कटिबद्धता दिसून येते. या सहयोगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष वैद्यकीय वातावरणातून मौल्यवान माहिती मिळवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जे डॉक्टरांना पाठबळ देण्यासाठी आणि भारत व जगभरातील रुग्णांच्या उपचारात सुधारणा करण्यासाठी डिझाइन केलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासास मदत करू शकेल.”

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संगीता रेड्डी म्हणाल्या, “अतिदक्षता सेवा हे असे क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक निर्णय, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक उपचार हा जीवन आणि मृत्यू मधील फरक ठरवू शकतो. वैद्यकीय क्षेत्र वाढत्या प्रमाणात डेटा-चालित होत आहे, तसतसे आमची जबाबदारी केवळ भारतात सर्वोत्तम तंत्रज्ञान आणण्याचीच नाही, तर ते वैद्यकीय निर्णय आणि रुग्णांच्या उपचारांचे परिणाम अर्थपूर्णरित्या सुधारेल, याची खात्री करण्याची देखील आहे. मेडट्रॉनिकसोबत आमचा सहयोग प्रगत मॉनिटरिंग तंत्रज्ञान, आमच्या डॉक्टरांचे नैपुण्य आणि डिजिटल नाविन्‍यतेची क्षमता एकत्र आणून अतिदक्षता सेवेच्या भविष्याची नव्याने मांडणी करण्याच्या सामायिक कटिबद्धतेला सादर करतो. आम्ही एकत्रितपणे आयसीयू तयार करत आहोत, जे अधिक जोडलेले, अधिक बुद्धिमान आणि रुग्णाची तब्येत खालावण्याचा अंदाज घेण्यास, वेळेवर उपचार करण्यास व खऱ्या अर्थाने वैयक्तिकृत सेवा प्रदान करण्यास अधिक सक्षम असतील. अपोलोच्या आरोग्यसेवा परिसंस्थेच्या निर्मितीच्या प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे, जिथे तंत्रज्ञान मानवी कौशल्याला अधिक सक्षम करते, ज्यामुळे डॉक्टरांना अधिक व्यक्तींचे प्राण वाचवण्यास मदत होते आणि रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या अत्यंत कठीण प्रसंगात अधिक आत्मविश्वास मिळतो.”

मेडट्रॉनिकच्या अॅक्युट केअर मॉनिटरिंग विभागाचे आरअँडडी उपाध्यक्ष जेसन केस म्हणाले, “नाविन्‍यता डॉक्टरांसाठी नाही तर डॉक्टरांच्या सोबत विकसित केले जाते, तेव्हा ते सर्वात जास्त प्रभावी ठरते. अपोलो हॉस्पिटल्समधील हा डिजिटलदृष्ट्या सक्षम आयसीयू प्रत्यक्ष अनुभवांचे इनोव्हेशन हब म्हणून काम करेल, जिथे तंत्रज्ञान विकासक आणि आरोग्य सेवा व्यावसायिक अतिदक्षता सेवेतील आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एकत्रितपणे काम करू शकतात. आम्ही एकत्रितपणे अधिक स्मार्ट आणि एकमेकांशी जोडलेले उपाय प्रदान करण्याची आशा करतो, ज्यामुळे डॉक्टरांना रुग्णांची वैयक्तिकृत काळजी घेणे शक्य होईल.”

उद्घाटनप्रसंगी या सहयोगाचा आनंद साजरा करण्यासाठी दोन्ही संस्थांमधील प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक प्रमुख एकत्र आले होते. स्वाक्षरी करणाऱ्या मान्यवरांशिवाय या इव्हेण्‍टला मेडट्रॉनिकच्या जागतिक नेतृत्वाची उपस्थिती होती, ज्यामध्ये अॅक्युट केअर मॉनिटरिंगच्या एसव्हीपी आणि अध्यक्षा केट बेनेडिक्ट, अॅक्युट केअर मॉनिटरिंगचे आरअँडडी उपाध्यक्ष जेसन केस, डिजिटल हेल्थचे वरिष्ठ संचालक देव जोशुआ, पोर्टफोलिओ आरअँडडी आणि पीएमओ – इनोव्हेशन डिलिव्हरीच्या वरिष्ठ संचालक गौरी जोगळेकर आणि मेडट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन सेंटरच्‍या (एमईआयसी) इंजिनिअरिंग उपाध्यक्ष व बोर्ड सदस्य दिव्या प्रकाश जोशी यांचा समावेश होता. या प्रसंगाचे औचित्य साधण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सचे प्रमुख लीडर्स, ज्यात अपोलो हेल्थअॅक्सिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनप्रीत सिंग, मुख्य चिकित्सक आणि इनोव्हेशन अधिकारी, तेजस्वी राव, मुख्य कार्यकारी अधिकारी – अपोलो हॉस्पिटल्स (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), डॉ. साई प्रविण हरनाथ आणि पार्टनरशीप्स व क्लायंट सोल्यूशनिंगचे उपाध्यक्ष डॉ. राहुल खंडेलवाल उपस्थित होते.

येथे दिलेली सर्व माहिती केवळ सामान्य जागरूकतेच्या उद्देशाने आहे आणि यातील कोणत्याही बाबीचा वैद्यकीय सल्ला किंवा शिफारस म्हणून अर्थ लावला जाऊ नये. रुग्णांनी त्यांच्या आजारांबद्दल चर्चा करण्यासाठी आणि संबंधित वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. वैद्यकीय परिस्थितीनुसार उपचारांचे परिणाम भिन्‍न असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button