नेस्प्रेसोचा मुंबईत विस्तार; जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये पहिले पॅव्हेलियन सुरू

News Service

नेस्प्रेसोने आपल्या किरकोळ विक्री विस्ताराचा पुढचा टप्पा गाठत मुंबईतील पहिल्या-वहिल्या स्टोअरच्या लाँचची घोषणा केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे पॅव्हेलियन आता ग्राहकांसाठी खुले झाले आहे. भारताचे महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या मुंबईत नेस्प्रेसोचा हा अधिकृत प्रवेश आहे.

घरी बसूनच प्रीमियम कॉफी अनुभवांची वाढती मागणी आणि ग्राहकांची चोखंदळ निवड लक्षात घेता ब्रँडच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी मुंबई महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे. जिओ वर्ल्ड ड्राईव्हमधील या विस्तारामुळे नेस्प्रेसोची उपलब्धता वाढली असून आता अधिक ग्राहक नेस्प्रेसोची वैशिष्ट्यपूर्ण कारागिरी, नाविन्‍यता आणि अनोखा कॉफी अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतील. नेस्प्रेसोची कॉफी, मशीन्स आणि अॅक्सेसरीजची विस्तृत श्रेणी भारतातील सर्व माध्यमांतून त्यांची भागीदार कंपनी मेसर्स ठकराल इनोव्‍हेशन्‍स प्रायव्‍हे‍ट लिमिटेडद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. केवळ वितरणापुरते मर्यादित न राहता, भारतातील बाजारपेठेत नेस्प्रेसोचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर विनासायास अनुभव मिळेल, याची खात्री करण्यासाठी ठकराल इनोव्हेशन्सची भूमिका मोलाची ठरली आहे.

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. मनिष तिवारी म्हणाले, “मुंबई नेहमी उत्कृष्टतेचा स्वीकार करणारे शहर राहिले आहे आणि आम्हाला नेस्प्रेसोचे जागतिक दर्जाचे विश्व येथील चोखंदळ कॉफी प्रेमींसाठी आणताना अभिमान वाटतोय. हे पॅव्हेलियन उत्कृष्ट कॉफी शोधण्यासाठी, त्याची चव चाखण्यासाठी आणि कॉफीशी एका संपूर्णपणे नवीन पद्धतीने जोडले जाण्यासाठी दिलेले आमंत्रण आहे. आम्ही भारतभर नेस्प्रेसोचा विस्तार करत असताना त्या प्रवासातील मुंबई हे स्वाभाविक आणि उत्साहवर्धक पुढचे पाऊल आहे.”

नेस्प्रेसोचे आशिया पॅसिफिक विभागाचे प्रमुख श्री. रेनॉड टिनेल म्हणाले, “भारत नेस्प्रेसोसाठी केवळ एक वाढती बाजारपेठ नसून आमचे धोरणात्मक प्राधान्य आहे. भारतातील ग्राहकांनी या ब्रँडबद्दल जे प्रेम आणि ओढ दाखवली आहे, ते खरोखरंच भारावून टाकणारे आहे आणि यामुळे आमचा दर्जा अधिक उंचावण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे. आम्ही निर्माण करत असलेल्या प्रत्येक नवीन केंद्राद्वारे आमची उपस्थिती अधिक विस्तारत आहोत आणि नेस्प्रेसोचे जग सर्वांसाठी अधिक सुलभ बनवत आहोत. या विलक्षण बाजारपेठेतील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेस्प्रेसोची ओळख असलेल्या उत्कृष्टतेसह कटिबद्ध आहोत. मुंबई हा या प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा आहे, जो भविष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या घडामोडींचे संकेत देतो.”

गुरुग्राममधील अलीकडील विस्तारानंतर मिळालेल्या प्रतिसादावर आधारित मुंबईतील हे पॅव्हेलियन भारतातील नेस्प्रेसोचे तिसरे स्टोअर आहे. यामधून देशातील ब्रँडची वेगाने वाढणारी उपस्थिती दिसून येते. हे पॅव्हेलियन एका अधिक गतिमान आणि शहराला साजेशा अशा रिटेल दृष्टिकोनाची ओळख करून देते. एखाद्या कॅफेपेक्षा वेगळे असलेले हे पॅव्हेलियन एका खुल्या जागेत तयार करण्यात आले आहे, जिथे ग्राहकांना कॉफीच्या संस्कृतीचा सखोल अनुभव घेता येईल. हे स्टोअर नवीन आणि जुन्या ग्राहकांना कॉफीचा शोध, त्याबद्दलचे शिक्षण आणि इंद्रियांना सुखावणारा अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे. तसेच, येथे तज्ज्ञांकडून वैयक्तिक सल्ला दिला जाईल, जो ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांना योग्य कॉफी निवडण्यास मदत करेल.
कॉफीप्रेमींना नेस्प्रेसोचे जग अनुभवण्यासाठी आणि उत्कृष्ट चवीच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्हमधील नवीन नेस्प्रेसो पॅव्हेलियनला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात येत आहे. तसेच, ग्राहक त्यांच्या ऑनलाइन बुटीकला देखील भेट देऊ शकतात: https://www.nespresso.com/in/en/.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button