नेस्ले इंडियाकडून गेल्या दशकभरात सर्वात प्रबळ तिमाही वाढीची नोंदविक्रीच्‍या प्रमाणात दोन-अंकी वाढीमुळे मिळाली गती

News Service

नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल (स्वतंत्र आणि एकत्रित) आज मंजूर केले. स्वतंत्र निकालांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

स्वतंत्र निकालांबाबत मत व्‍यक्त करत नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. मनीष तिवारी म्हणाले, “मला सांगताना आनंद होत आहे की, या तिमाहीत नेस्ले इंडियाने उच्‍च दोन अंकी वाढ नोंदवली आहे आणि ६,४४५ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वोच्‍च देशांतर्गत विक्री साध्य केली आहे. ही कामगिरी विक्रीच्‍या प्रमाणात दोन-अंकी वाढीमुळे शक्य झाली आहे आणि यासाठी जाहिरातींवरील खर्चात ५० टक्‍क्यांहून अधिक वाढ करण्यात आली होती. तसेच कंपनीने २६.३ टक्‍क्‍यांचे उत्तम ईबीआयटीडीए मार्जिन देखील राखले आहे.

या तिमाहीत एकूण विक्री आणि देशांतर्गत विक्रीत अनुक्रमे २३.४ टक्‍के व २३.१ टक्‍के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सर्व उत्पादन गटांनी या कामगिरीत योगदान दिले आहे. आव्हानात्मक बाह्य वातावरणातही ग्राहकांची सेवा करताना आमच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले टीमवर्क आणि जिद्द याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. बाजारपेठेतील व्याप्ती आणि प्रीमियम उत्पादनांवर भर, तसेच शिस्तबद्ध संसाधनांचे वाटप आणि प्रभावी अंमलबजावणी ही आमच्या वाढीची मुख्य सूत्रे राहिली आहेत.

३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आम्ही आमच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित केले आणि चिकाटीने अंमलबजावणी केली. यामुळे आम्ही बाजारपेठेतील प्रबळ हिश्‍श्‍यासह दोन अंकी आणि विक्रीच्या प्रमाणावर आधारित वाढ साध्य करू शकलो. गेल्या पाच वर्षांत, आमच्या पॉवर ब्रँड्सपैकी मॅग्‍गी नूडल्सने बाजारपेठेत आपले अग्रस्थान सातत्याने टिकवून ठेवले आहे, तर किट कॅट आणि नेस्कॅफे यांच्या बाजारपेठेतील हिश्‍श्‍यामध्‍ये वेगाने वाढ झाली आहे.
आम्ही आमच्या रचनात्मक खर्च-कार्यक्षमता अजेंड्यावर प्रगती केली आणि ऑपरेशनल खर्चामध्‍ये आतापर्यंतची सर्वाधिक बचत केली. यामुळे आम्हाला ब्रँड्समध्ये अधिक गुंतवणूक करणे आणि विक्री व ऑपरेशन्समध्ये डिजिटल व तंत्रज्ञान-सक्षम क्षमता वाढवणे शक्य झाले. आम्ही नफा आणि रोख निर्मितीवर कडक शिस्त पाळली आहे, तसेच ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील प्रगतीसाठी आमच्या क्षमतांचा विचारपूर्वक विस्तार केला आहे. ग्राहकांना कोणताही फायदा होत नसलेला खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या बचतीमुळे आम्हाला ब्रँड गुंतवणूक, जाहिराती, ग्राहक उपक्रम आणि वितरण व्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध झाला.

आमच्या प्रबळ ब्रँड्सच्या व्यवहारांमध्ये झालेल्या व्‍यापक वाढीमुळे कन्‍फेक्‍शनरी उत्पादन समूहाने मूल्य आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत उच्‍च दोन-अंकी विकास दर गाठला आहे. वितरणातील वाढ, व्हिसिकूलर उपक्रमाद्वारे उत्पादनांमध्ये टिकवून ठेवलेला ताजेपणा आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या मालिकेमुळे हा वेग कायम राखण्यास मदत झाली.

पावडर आणि द्रव पेये उत्पादन समूहाने सलग दुसऱ्या वर्षी उच्‍च दोन-अंकी वाढ साध्य केली आहे. कॉफीचा वाढता वापर, प्रीमियम उत्पादनांकडे ग्राहकांचा कल आणि ग्राहक वर्गातील वाढती सुसंगतता यांमुळे ही प्रगती झाली आहे. याला मजबूत ब्रँड इक्विटी आणि विस्तारित वितरण जाळ्याचा मोठा आधार मिळाला.

तयार डिशेस् आणि कुकिंग एड्स उत्पादन समूहाने विक्रीच्या प्रमाणात प्रबळ वाढ नोंदवली आहे. शहरी ग्राहकांना आकर्षित करून आणि ग्रामीण भागात पोहोच वाढवून हे यश मिळाले, ज्यामुळे मार्केट शेअर आणि बाजारपेठेतील व्याप्ती या दोन्हीमध्ये वाढ झाली आहे.

दुग्धजन्य पदार्थ आणि पोषण उत्पादन समूहाने स्थिरता दाखवत स्थिर वाढ नोंदवली आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही विविध उत्पादनांचे नवीन आणि मोठे पॅक बाजारात आणले, ज्यामुळे आमच्या पोर्टफोलिओची सुलभता आणि मूल्य वाढण्यास मदत झाली.

पाळीव प्राणी खाद्याच्या व्यवसायाने उच्‍च दोन-अंकी वाढ नोंदवली आहे. उत्पादनांची व्याप्ती आणि चाचणी वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची साखळी, वितरणाचा विस्तार आणि पाळीव प्राणी व त्यांचे मालक यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यावर दिलेला विशेष भर यामुळे ही प्रगती साध्य झाली.

नेस्प्रेसोने आपला प्रगतीचा मार्ग कायम राखला आहे, तसेच गुरुग्राममध्ये भारतातील दुसरे बुटीक सुरू केले आहे. कॉफीप्रेमींनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
मला सांगताना आनंद होत आहे की, आमच्या सर्व व्‍यवसाय चॅनेल्‍सनी प्रबळ दोन-अंकी वाढ नोंदवली आहे.

नेस्ले प्रोफेशनलने (आऊट-ऑफ-होम) बाजारपेठेतील व्याप्ती आणि विक्रीच्या प्रमाणावर आधारित सतत वाढ साध्य केली आहे. यामुळे नेस्ले इंडियाच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे.

आम्ही बदलत्या किरकोळ विक्री परिसंस्थेशी सुसंगत असे ओम्नी-चॅनेल धोरण राबवत आहोत. यामध्ये ई-कॉमर्स व क्विक कॉमर्सचा विस्तार करणे, मॉडर्न ट्रेड व फार्मसी साखळी मजबूत करणे आणि निमशहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्ये जनरल ट्रेडच्या माध्यमातून वाढ टिकवून ठेवण्यावर भर दिला आहे. मालाची उपलब्धता सुधारणे, पुरवठ्यासाठी लागणारा वेळ कमी करणे आणि चॅनेलनुसार उत्पादनांची अचूक मांडणी व पॅकच्या ठराविक भूमिकांद्वारे अंमलबजावणीमध्ये सातत्य राखणे, यांना आम्‍ही प्राधान्‍य दिले आहे. तसेच, आम्‍ही व्यावसायिक भागीदारांमधील वाढते सहकार्य आणि तंत्रज्ञानावर आधारित मालाचा पुनर्पुरवठा याद्वारे कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आम्ही ग्रामीण बाजारपेठांमध्ये आमची रूट-टू-मार्केट व्यवस्था अधिक प्रबळ केली आहे. पायाभूत सुविधा, उत्पादन पोर्टफोलिओ, तंत्रज्ञान, दृश्यमानता, ग्राहक संवाद आणि मनुष्यबळ या सहा प्रमुख स्तंभांवर आधारित दृष्टिकोनामुळे आम्ही आमची पोहोच वेगाने वाढवली आहे. या एकात्मिक पद्धतीमुळे सर्वच क्षेत्रांत आमची व्याप्ती मोठी झाली आहे, उद्योगातील इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक पोहोच वाढवली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सुमारे २,१६,००० गावांपर्यंत आमचे अस्तित्व विस्तारले आहे. आता आमचा भर फक्त नवीन दुकाने जोडण्यावर नसून त्या भागातील कव्हरेजची प्रभावीता आणि अंमलबजावणीची गुणवत्ता सुधारण्यावर आहे.

पुढील वाटचालीसाठी आम्ही चार महत्त्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित करू: १) ग्राहक केंद्रित दृष्टिकोन, २) बाजारपेठेतील व्याप्ती वाढवून विक्रीचे प्रमाण वाढवणे, ३) ब्रँड्स आणि उत्पादन क्षमतेमध्ये पुन्‍हा गुंतवणूक करणे, आणि ४) तंत्रज्ञान-आधारित विक्री व कामकाजाला गती देणे.

या सर्व प्राथमिकतेच्या केंद्रस्थानी आमचे कर्मचारी आहेत. आम्ही उत्तम वातावरण निर्माण करत आहोत, जिथे त्यांना जलद निर्णय घेण्याचे, एकाग्र व स्थिर राहण्याचे स्वातंत्र्य आहे; ज्यामुळे मोठ्या आणि दर्जेदार नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळेल. आम्ही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी, महत्त्वाच्या कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि व्यवसायावर मोठा प्रभाव पाडण्यासाठी क्षमता वाढवत आहोत. ग्राहक व ग्राहकांच्या सेवेसाठी सर्जनशीलता आणि अचूक निर्णयक्षमता वापरणारे आमचे कर्मचारी आजही व्यवसायाचा मुख्य कणा आहेत.

सकारात्मक व अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याच्या आमच्या कटिबद्धतेशी बांधील राहत आम्ही ग्रामीण विकास, शिक्षण आणि उपजीविका वाढ अधिक प्रबळ करत आहोत. तसेच पोषण आहार उपक्रम वाढवणे आणि पाणी व स्वच्छतेच्या सोयींमध्ये सुधारणा करणे यांसारखे आमचे सामाजिक उपक्रम सातत्याने पुढे नेत आहोत. हरियाणातील नुह जिल्ह्याच्या माझ्या एका भेटीदरम्यान मी आमच्या गाव दत्तक उपक्रमांतर्गत आठवीत शिकणाऱ्या पायल नावाच्या १२ वर्षीय विद्यार्थिनीला भेटलो. तिने भविष्यात आयपीएस अधिकारी बनण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेबद्दल सांगितले. अशा प्रकारचे प्रसंग भारतातील अफाट शक्यतांवरील माझा विश्वास अधिक दृढ करतात. हे क्षण आम्हाला जाणीव करून देतात की, गाव दत्तक घेण्यासारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत, कारण अशा उपक्रमांमुळेच पायलसारख्या तरुण पिढीला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि जिद्दीने पूर्ण करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.

आम्ही आमच्या ध्येयाने प्रेरित होऊन जबाबदारपणे ग्राहकांची सेवा करत सामायिक मूल्‍य निर्माण करत आहोत. संपूर्ण नेस्ले इंडियामध्ये आमच्‍या टीम्‍स ‘गुड फॉर प्लॅनेट’ आराखड्यावर प्रभावी प्रशासन आणि काटेकोर अंमलबजावणीद्वारे काम करत आहेत. यामध्ये जबाबदार स्रोत शोधणे, संसाधन-कार्यक्षम कारखाने आणि आमच्या कामकाजात जलसंधारण अधिक प्रबळ करण्यावर आमचा भर आहे.

मी नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आमचे ग्राहक, पुरवठादार, वितरक आणि किरकोळ विक्रेते यांनी दिलेल्या निरंतर सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आमच्या भागधारकांनी दाखवलेला विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यासाठी मोलाचा आहे. आम्ही शाश्वत, दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी सदैव सज्ज राहण्यास कटिबद्ध आहोत.

आर्थिक ठळक वैशिष्ट्ये: ३१ मार्च २०२६ रोजी संपलेले आर्थिक वर्ष (स्वतंत्र)
 एकूण विक्री: २३,०७१.५ कोटी रूपये
 ईबीआयटीडीए विक्रीच्या २३.० टक्‍के
 निव्वळ नफा: ३,५४४.६ कोटी रूपये
 कामकाजातून निर्माण झालेली रोख रक्‍कम: ५,०४७.६ कोटी रूपये
 प्रति शेअर उत्‍पन्न: १८.३८ रूपये
 शिफारस केलेला अंतिम लाभांश: प्रति इक्विटी शेअर ५ रूपये

व्यावसायिक टिप्पणी – ३१ मार्च २०२६ रोजी संपलेले आर्थिक वर्ष:
 ई-कॉमर्स: ई-कॉमर्समधील वाढीचा वेग कायम राहिला, ज्यामध्ये क्विक कॉमर्सच्या उत्कृष्ट कामगिरीचा मोठा वाटा आहे. मालाची सुधारित उपलब्धता, संबंधित श्रेणींमधील प्लॅटफॉर्म-विशिष्ट उत्पादनांची मांडणी, प्लॅटफॉर्मवर आणि प्लॅटफॉर्मबाहेरील लक्ष्यित जाहिराती आणि वर्षभरातील सणासुदीच्या काळात घेतलेला सक्रिय सहभाग यांमुळे ही प्रगती साध्य झाली.

 संघटित व्यापार: प्रमुख उत्पादन श्रेणींमध्ये दोन-अंकी वाढ नोंदवण्यात आली. स्टोअर्समधील प्रभावी उपक्रम, उत्पादनांची सुधारित दृश्यमानता आणि स्टोअर्सच्या संख्येत झालेली वाढ यामुळे हे यश मिळाले आहे.

 आऊट-ऑफ-होम (ओओएच): विविध उत्पादन श्रेणींमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग आणि प्रीमियमायझेशनमुळे नवीन ग्राहक जोडण्यात मोठे यश मिळाले आहे. यामध्ये नेस्कॅफे ड्युओ गस्टो (गरम आणि थंड पेये) सह पेयांच्या पोर्टफोलिओचा विस्तार आणि कमी साखर व शून्य-साखर असलेल्या पेयांच्या पर्यायांचा समावेश आहे. रेसिपी-आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये मॅग्‍गी कोकोनट मिल्क पावडरचा किनारपट्टीच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विस्तार करणे आणि मिल्कमेडचा वाढत्या कॅफे व बेकरी व्यवसायांसाठी उपयोग करणे यांवर भर देण्यात आला.

 निर्यात: मालदीव आणि पापुआ न्यू गिनी यांसारख्या नवीन बाजारपेठांमध्ये निर्यातीचा विस्तार करण्यात आला, ज्यामुळे नेस्ले इंडियाचे निर्यातीचे जाळे आता २८ देशांपर्यंत पोहोचले आहे. यूएई, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि न्यूझीलंडमध्ये नेस्कॅफे सनराईज लाँच करण्यात आले. तसेच, जीसीसी देशांमध्ये विक्री होणाऱ्या ३-इन-१ कॉफीसाठी लागणारी नेस्कॅफे बल्क कॉफी यूएईला निर्यात करण्यास सुरुवात केली. यूके, यूएस आणि यूएईमध्ये मॅग्‍गी मसाला-ए-मॅजिकच्या श्रेणीचा विस्तार केला; सिंगापूरमध्ये किटकॅट श्रेणी लाँच केली आणि श्रीलंकेत मिल्कमेड डॉयपॅक उपलब्ध करून दिले.

उत्पादन समूहांची कामगिरी (देशार्गत) – ३१ मार्च २०२६ रोजी संपलेले आर्थिक वर्ष:

 तयार डिशेस् आणि कुकिंग एड्स: ‘मॅग्‍गी डबल मसाला’ आणि विस्तारित ‘स्पायसी रेंज’ यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रयोगांवर दिलेला भर, तसेच मुख्य ब्रँड्ससाठी जाहिरातींमधील वाढीव गुंतवणूक यांमुळे वाढीचा वेग कायम राखण्यास आणि वाढवण्यास मदत झाली.

 दुग्धजन्य पदार्थ आणि पोषण: एव्हरीडे डेअरी व्हाइटनरने दक्षिण आणि पूर्व भारतात आपली पकड मजबूत करत पोर्टफोलिओला अधिक प्रबळ केले. विज्ञानावर आधारित नॅन एक्सलाप्रो (५एचएमओ + प्रोबायोटिक्स)द्वारे आम्ही बाल पोषण श्रेणीत प्रगती केली. सेरेलॅकच्या नो रिफाइंड शुगर श्रेणीचा विस्तार केला आणि विविध माध्यमांद्वारे केलेल्या प्रभावी संवादामुळे टॉडलर (लहान मुलांच्या) पोर्टफोलिओला मोठी चालना दिली.

 कन्‍फेक्‍शनरी: वितरणात मोठी वाढ झाली, तर ग्राहकांशी संबंधित ब्रँड उपक्रमांमुळे बाजारपेठेतील व्याप्ती वाढली. आम्ही किटकॅट पॉप्स लाँच केले; मिल्कीबार बटरस्कॉच टॅबलेट्ससह श्रेणीचा विस्तार केला; आणि मंच मॅक्स क्रंचीजच्या लाँचसह मंच मॅक्सचा विस्तार केला. तसेच, सॉल्टेड कॅरामेल आणि हेझलनट या चवींमध्ये नवीन किटकॅट लाँच करून प्रीमियम किटकॅट पोर्टफोलिओ अधिक समृद्ध केला.

 पावडर आणि द्रव पेये समूहाने कॉफी पोर्टफोलिओमधील निरंतर दोन-अंकी वाढीमुळे प्रबळ आणि स्थिर कामगिरी केली. बाजारपेठेतील व्याप्ती आणि प्रीमियमायझेशन यावर आधारित स्पष्ट धोरणामुळे शाश्वत मूल्य निर्मिती झाली. व्हिएतनामी लट्टे आणि आइस कॅपुचिनो यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रकारांच्या लाँचसह रेडी टू ड्रिंक (आरटीडी) प्रवासाला गती दिली, ज्यामुळे भविष्यातील वाढीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून आरटीडी अधिक दृढ झाले आहे.

३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे ठळक मुद्दे:
या तिमाहीत एकूण विक्री व देशांतर्गत विक्रीत अनुक्रमे २३.४ टक्‍के आणि २३.१ टक्‍के वाढ झाली आहे. देशांतर्गत विक्रीतील ही वाढ सर्व क्षेत्रांत दिसून आली. देशांतर्गत विक्रीने ६,४४५ कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. ईबीआयटीडीए मार्जिन २६.३ टक्‍के राहिले.

कमोडिटी आउटलुक:
व्हिएतनाममधील अनुकूल पीक आणि ब्राझीलमधील आगामी हंगामामुळे कॉफीच्या किमतीतील घसरणीचा कल कायम आहे. सुधारलेला पुरवठा आणि मर्यादित मागणीमुळे कोकोचे दर सध्या कमी आहेत, तर साखरेच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि बायोडीझेलसाठी वापर वाढल्याने खाद्यतेलाचे दर वधारले आहेत. गव्हाच्या बाबतीत, एप्रिलमधील अवकाळी पावसामुळे पिकाला फटका बसला आहे, परिणामी कापणी लांबणीवर पडली आहे आणि उत्पादनाच्या दर्जासह प्रमाणातही घट झाली आहे. तसेच, दुधाच्या किमती वाढल्या असून उन्हाळ्यातील कमी उत्पादनाच्या काळामुळे पुढील काळातही अधिक राहण्याची शक्यता आहे.

सतर्कतेचा इशारा:
या प्रसिद्धीपत्रकातील विधाने, विशेषतः कंपनीचा भविष्यातील अंदाज, अंदाजपत्रके आणि अपेक्षांशी संबंधित माहिती, लागू असलेले कायदे आणि नियमांनुसार ‘भविष्यसूचक विधाने’ असू शकतात. परिस्थितीनुसार प्रत्यक्ष निकाल हे या विधानांमध्ये व्यक्त केलेल्या किंवा सूचित केलेल्या अंदाजांपेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button