RBI UPI Vision चा खुलासा: 83% वापरकर्ते रिवॉर्ड्ससाठी बदलतात UPI प्लॅटफॉर्म

News Service
  • भारतातील यूपीआय अॅप निवडीसाठी रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक हे सर्वात मोठे कारण म्हणून समोर आले आहे.
  • अॅमेझॉन पेने सर्वात जास्त समाधान नोंदवले, त्यापाठोपाठ गुगल पे आणि पेटीएमचा क्रमांक लागतो.
  • यूपीआयच्या वाढीची दुसरी लाट केवळ वापरकर्ते जोडण्यावर नाही, तर त्यांना टिकवून ठेवण्यावर अवलंबून असेल.

भारत, २३ जुलै २०२६: दररोज ६६ कोटींपेक्षा जास्त व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या भारतातील यूपीआय परिसंस्थेमध्ये ग्राहकांच्‍या निष्ठेला चालना देणाऱ्या घटकांच्‍या बाबतीत मुलभूत बदल दिसून येत आहे. एम्पॉवर इंडियाच्या प्राथमिक आणि दुय्यम संशोधनावरील निष्कर्षांनुसार, ८९ टक्‍के युपीआय वापरकर्ते पेमेंट अॅप निवडताना रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकचा विचार करतात, तर ८३ टक्‍के वापरकर्ते चांगल्या रिवॉर्ड्ससाठी अॅप बदलण्यास तयार असतात. तसेच, ९४ टक्‍के वापरकर्ते अॅप बदलताना रिवॉर्ड्सना महत्त्वाचे मानतात आणि ८८ टक्‍के वापरकर्ते चांगल्या पर्यायासाठी यूपीआय अॅप्सची सक्रियपणे तुलना करतात. यावरून स्पष्ट होते की, रिवॉर्ड्स आता केवळ जाहिराती पुरते मर्यादित नसून पेमेंटविषयक निर्णय प्रभावित करणारे मुख्य घटक बनले आहेत.

अॅप बदलणाऱ्या वापरकर्त्यांपैकी ५९ टक्‍के वापरकर्त्यांनी आधीचा प्लॅटफॉर्म सोडण्याचे मुख्य कारण कमी रिवॉर्ड्स आणि फायदे हे सांगितले, तर वापरण्यास सोपे असणे (६४ टक्‍के), विश्वास आणि सहकार्य (६१ टक्‍के) आणि पेमेंटची सोय (२८ टक्‍के) अशी कारणे इतर वापरकर्त्यांनी दिली. यावरून दिसून येते की, रिवॉर्ड्स केवळ नवीन ग्राहक जोडण्याचे साधन उरले नसून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मसाठी ग्राहकांना टिकवून ठेवण्याचे एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहेत.

या निष्कर्षांबाबत मत व्यक्त करत एम्पॉवर इंडियाचे डायरेक्टर जनरल के. गिरी म्हणाले, “भारताने जगातील सर्वात अत्याधुनिक रिअल-टाइम पेमेंट पायाभूत सुविधा यशस्वीपणे उभी केली आहे. पण, यूपीआयच्या वाढीचा पुढचा टप्पा हा केवळ वापरकर्ते जोडण्यावर नव्हे, तर त्यांच्या सहभागावर अधिक अवलंबून असेल. आमच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, ग्राहक प्रत्येक व्यवहारातून प्रत्यक्ष फायद्याची अपेक्षा करतात, ज्यामुळे रिवॉर्ड्स मार्केटिंगचा भाग न राहता डिजिटल पेमेंट अनुभवाचा अविभाज्य भाग बनले आहेत. स्पर्धा वाढेल तसतसे ग्राहकांना टिकवून ठेवण्याचे काम तेच प्लॅटफॉर्म करू शकतील, जे विश्वासार्ह पेमेंट अनुभवांसोबत रोजच्या व्यवहारात अर्थपूर्ण मूल्य प्रदान करतील.”

या निष्कर्षांमध्ये प्रमुख युपीआय प्लॅटफॉर्म्सवर मिळणाऱ्या रिवॉर्ड्सबाबत ग्राहकांच्या समाधानाचे मूल्यमापन देखील करण्यात आले आहे.

• अॅमेझॉन पे हा सर्वाधिक रेटिंग मिळवणारा प्लॅटफॉर्म म्हणून समोर आला आहे, ज्यातील ७४ टक्‍के वापरकर्त्यांनी त्यांना मिळणाऱ्या रिवॉर्ड्सवर ‘अत्यंत समाधानी’ असल्याचे म्हटले आहे.
• तुलनेत, फोनपे आणि गुगल पे यांनी विश्वास आणि सुरक्षिततेच्या बाबतीत उत्तम कामगिरी केली आहे.
• पेटीएमने वापरण्याच्या सोयीच्या बाबतीत उच्च गुण मिळवले आहेत.
• अॅमेझॉन पे च्या ८७ टक्‍के वापरकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी या प्लॅटफॉर्मला रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकच्या माध्यमातून मिळणाऱ्या दैनंदिन मूल्यामुळे निवडले आहे, तर गुगल पे साठी हे प्रमाण ७३ टक्‍के होते.
• अॅमेझॉन पे च्या ५० टक्‍के वापरकर्त्यांनी रोजच्या पेमेंटवर मिळणारा कॅशबॅक अॅप वापरण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले, तर फोनपे साठी हे प्रमाण ३८ टक्‍के आणि गुगल पे साठी ३५ टक्‍के होते.
• रिवॉर्ड्स रिडीम करण्याच्या सोयीच्या बाबतीत फोनपे आणि अॅमेझॉन पे यांची कामगिरी समान (६८ टक्‍के) राहिली, जी गुगल पे च्या ७० टक्क्यांच्या अगदी जवळ आहे. यावरून दिसून येते की, रिडीम करण्याची सोय या संपूर्ण परिसंस्थेमध्ये महत्त्वाचा स्पर्धात्मक दुवा बनत आहे.

प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेव्यतिरिक्त या निष्कर्षांमधून निदर्शनास येते की, भारतातील यूपीआय परिसंस्था परिपक्वतेच्या नवीन टप्प्यात पोहोचली आहे. वेग, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि व्यापारी स्वीकारार्हता यांसारख्या मुख्य क्षमता आता स्पर्धात्मक फायद्याचे स्त्रोत नसून मुलभूत अपेक्षा बनल्या आहेत. या कार्यात्मक फरकांमधील अंतर कमी होत आहे, तसतसे ग्राहकांची पसंती प्लॅटफॉर्म्सच्या सतत, सुसंगत आणि वापरण्यास सोपे रिवॉर्ड्स देण्याच्या क्षमतेवर आधारित ठरत आहे, जी रोजच्या व्यवहारात प्रत्यक्ष फायदा निर्माण करतात.

या संशोधनामधून निदर्शनास येते की, यूपीआयच्या वाढीचा पुढचा टप्पा नवीन वापरकर्ते जोडण्याऐवजी असलेल्या वापरकर्त्यांना टिकवून ठेवण्यावर आधारित असेल, ज्यामुळे परिपक्व आणि सर्वसमावेशक डिजिटल पेमेंट परिसंस्था असण्‍याप्रती आरबीआयच्या दृष्टिकोनाला पाठबळ मिळेल. स्पर्धा अधिक तीव्र होत असताना प्लॅटफॉर्म्स केवळ पेमेंट वैशिष्ट्यांच्या आधारे नव्हे, तर अर्थपूर्ण रिवॉर्ड्स आणि उत्कृष्ट वापरकर्ता अनुभवाच्या माध्यमातून ग्राहकांशी अधिक दृढ नाते निर्माण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील. ज्या परिसंस्थेमध्ये प्लॅटफॉर्म बदलण्याचा खर्च नगण्य असतो, तिथे दीर्घकाळ टिकणारी निष्ठा प्लॅटफॉर्म्सना मिळेल, जे व्यवहाराच्या पलीकडे जाऊन सातत्याने मूल्य प्रदान करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button