- दैनंदिन परस्परसंवाद अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी अचूक रचना आणि शक्तिशाली कार्यक्षमतेचे संयोजन असलेला गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आतपर्यंतचा सर्वात सडपातळ व वजनाने हलका स्मार्टफोन आहे.
- गॅलॅक्सी झेड फ्लिप७ अधिक सडपातळ करण्यासोबत सुधारण्यात आला आहे आणि आता अधिक कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये सर्वात मोठी बॅटरी आणि अधिक मोठा डिस्प्ले आहे.
- गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि झेड फ्लिप७ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२,००० रूपयांचे प्री-ऑर्डेर फायदे, तसेच २४ महिने नो कॉस्ट ईएमआय सुविधा मिळेल.
नवी दिल्ली – जुलै १०, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज घोषणा केली की त्यांनी आतापर्यंतची सर्वात प्रगत गॅलॅक्सी झेड सिरीज – गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ साठी प्री-ऑर्डर्सची सुरूवात केली आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये सर्वोत्तम गॅलॅक्सी डिझाइन, कॅमेरा कार्यक्षमता आणि एआय नाविन्यता आहे. ही आतापर्यंतची सर्वात सडपातळ आणि वजनाने हलकी गॅलॅक्सी झेड फोल्ड सिरीज आहे. या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-स्मार्टफोनची प्रीमियम कार्यक्षमता व अनुभव आहे, तसेच कार्यक्षमता व उत्पादकतेच्या नवीन स्तरांसह फोल्ड केल्यानंतर मोठा व आकर्षक डिस्प्ले आहे.
आतापर्यंतचा सर्वात सडपातळ, वजनाने हलका गॅलॅक्सी झेड फोल्ड
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ समकालीन स्मार्टफोनची दैनंदिन पोर्टेबिलिटी व आकर्षकता, तसेच एकाच डिवाईसमध्ये मोठा, अनफोल्ड केलेल्या डिस्प्लेची सुधारित क्षमता व स्थिरता पाहिजे असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. अत्यंत सडपातळ व हलकी डिझाइन आणि मोठ्या डिस्प्लेसह गॅलॅक्सी झेड फोल्ड७ चालता-फिरता विनासायास अनुभव देतो, जो फोल्ड असताना देखील टाइपिंग व ब्राऊजिंगची सुविधा देतो.
• फक्त २१५ ग्रॅम वजन असलेला गॅलॅक्सी झेड फोल्ड७ गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रापेक्षा वजनाने हलका आहे.
• फोल्ड केल्यानंतर या स्मार्टफोनची जाडी फक्त ८.९ मिमी आणि अनफोल्ड केल्यानंतर ४.२ मिमी मिमी आहे.
• या डिवाईसमध्ये ६.५-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २x कव्हर डिस्प्ले, मोठी स्क्रिनसह नवीन २१:९ अॅस्पेक्ट रेशिओ आहे.
गॅलॅक्सी स्मार्टफोनमध्ये सर्वात मोठी स्क्रिन
अनफोल्ड असताना गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ची स्क्रिन सर्वात मोठी आहे, ज्यामुळे एडिटिंग, मल्टीटास्किंग सहजपणे करता येते आणि मनोरंजनाचा आनंद घेता येतो. ज्यामध्ये गॅलॅक्सी एआयचा अधिक फायदा घेता येतो. गॅलॅक्सी झेड फोल्ड७ वरील मुख्य डिस्प्ले मागील जनरेशनच्या तुलनेत ११ टक्के मोठा आहे, जो विविध अॅप्समध्ये कन्टेन्ट एडिटिंग आणि मल्टीटास्किंगसाठी मोठी स्क्रिन देतो.
• ८-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २x मुख्य डिस्प्ले संपन्न कॉन्ट्रास्ट आणि आकर्षक रंगसंगती देतो, ज्यासह चित्रपट पाहण्याचा आनंद घेण्यासोबत मल्टीटास्किंग करता येते.
• व्हिजन बूस्टर आणि जवळपास २,६०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेससह गॅलॅक्सी झेड फोल्ड७ च्या डिस्प्लेवरील चित्र प्रखर सूर्यप्रकाशात देखील सुस्पष्टपणे दिसते.
सडपातळ, पण प्रबळ रचना
सतत फोल्डिंग करण्यापासून हातामध्ये सहजपणे सामावून जाण्यापर्यंत हा स्मार्टफोन दैनंदिन टिकाऊपणाची खात्री देतो आणि पुन्हा संरचित हिंज व फोल्डेबल डिस्प्लेसह दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
• आर्मर फ्लेक्सहिंज सडपातळ व हलके आहे, ज्याचे श्रेय सुधारित वॉटर ड्रॉपलेट डिझाइन आणि नवीन वापरण्यात आलेली मल्टी-रेल रचनेला जाते, जे दृश्यमानतेमध्ये येणारे व्यत्यय कमी करतात आणि टिकाऊपणा मजबूत करतात.
• कव्हर डिस्प्ले कॉर्निंग® गोरिला® ग्लास सिरॅमिक २ या नवीन काचेच्या सिरॅमिकसह बनवण्यात आले आहे, जेथे ग्लास मॅट्रिक्समध्ये बारकाईने क्रिस्टल्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे स्क्रिन सुरक्षित राहते आणि स्क्रिनवर ओरखडे देखील येत नाहीत. यासह अत्यंत सडपातळ फॉर्म फॅक्टरमध्ये अधिक सुरक्षिततेची खात्री मिळते.
• फ्रेम व हिंज हाऊसिंगमधील अॅडवान्स्ड आर्मर अॅल्युमिनिअम क्षमता व मजबूतपणा १० टक्क्यांनी वाढवते.
• मुख्य डिस्प्ले अधिक सडपातळ व हलका असण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, पण शक्तिशाली देखील आहे. टायटॅनिअम प्लेट स्तराचा वापर करण्यात आला आहे. तसेच, अल्ट्रा-थिन ग्लास (यूटीजी)ची जाडी ५० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे हा सर्वात शक्तिशाली डिस्प्ले आहे.
गॅलॅक्सीसाठी सानुकूल करण्यात आलेले सर्वात शक्तिशाली प्रोसेसर
हडूअंतर्गत, गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाइट फॉर गॅलॅक्सीची शक्ती आहे, जे पूर्वीच्या जनरेशनच्या तुलनेत एनपीयूमध्ये ४१ टक्के, सीपीयूमध्ये ३८ टक्के आणि जीपीयूमध्ये २६ टक्के अधिक कार्यक्षमता देते. यामुळे गॅलॅक्सी झेड फोल्ड७च्या तडजोड न करता डिवाईसेवर अधिक एआय अनुभव देण्याची क्षमता वाढते.
अल्ट्रा २०० मेगापिक्सल कॅमेरा
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये फोल्डेबलमधील सर्वोत्तम गॅलॅक्सीचे प्रो-ग्रेड कॅमेरा वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये सतत आकर्षक निष्पत्तींसाठी प्रगत हार्डवेअर व इंटेलिजण्ट प्रोसेसिंगचे संयोजन आहे. एआय-सुधारित इमेजिंग आपोआपपणे प्रकाश, सुस्पष्टता आणि वास्तविकतेला सानुकूल करते, ज्यामुळे फोटो व व्हिडिओज आकर्षक आणि लक्षवेधकपणे कॅप्चर होतात.
• गॅलॅक्सी झेड सिरीजमध्ये पहिल्यांदाच २०० मेगापिक्सल वाइड-अँगल कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन ४ पट अधिक सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर करतो, जे ४४ टक्के तेजस्वी असतात.
• मुख्य डिस्प्लेवरील १० मेगापिक्सल १००० कॅमेरा फ्रेम वाढवतो, म्हणून फोन अनफोल्ड केल्यानंतर सहजपणे ग्रुप सेल्फीज, बहुमूल्य क्षण आणि विश्वातील आकर्षक गोष्टी कॅप्चर करता येतात.
• सॅमसंगचे नेक्स्ट जनरेशन प्रोव्हिज्युअल इंजिन जलदपणे फोटोंची प्रक्रिया करते, ज्यामुळे प्रत्येक फोटो व व्हिडिओ अधिक सुस्पष्ट, आकर्षकपणे कॅप्चर होतो.
• नाइट व्हिडिओसह सर्वोत्तम मोशन डिटेक्शन आवाज कमी करण्यासाठी स्थिर पार्श्वभूमीमधून हालचाल करणाऱ्या वस्तूंना वेगळे करते.
• १०-बीट एचडीआर अधिक आकर्षक रंगसंगती देते. ज्यामुळे दिवसातून कोणतीही वेळ असो आकर्षक रंग, सखोल कॉन्ट्रास्ट आणि अधिक वास्तविक स्वरूपात व्हिडिओज कॅप्चर होतात.
अल्ट्रा एआय एक्स्पेरिअन्स
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये एआयची क्षमता व सोयीसुविधा वाढवण्यासाठी फोल्डेबल डिस्प्लेची क्षमता आहे, ज्यामधून विशिष्ट, अनुकूल आणि प्रभावीपणे कार्यक्षम अनुभव मिळतो. नवीन वन यूआय ८ संदर्भाबाबत जागरूक आणि नैसर्गिकरित्या प्रतिसादात्मक असून गॅलॅक्सी झेड फोल्ड७च्या स्थिर फॉर्मेट व विस्तृत स्क्रिनसाठी सानुकूल करण्यात आले आहे, जे एआयसोबत परस्परसंवाद साधण्याचा सर्वोत्तम मार्ग देते. स्क्रिनवर एका अॅपवरून दुसऱ्या अॅपमध्ये सहजपणे जाता येते, तसेच एकाच ठिकाणी सर्जनशीलता व उत्पादकता मिळते.
• वास्तविक मल्टीमोडल एजंट म्हणून डिझाइन करण्यात आलेले वन यूआय ८ मोठ्या स्क्रिनवरील मल्टीटास्किंगसाठी सर्वोत्तम टूल्स देते, जे वापरकर्ते काय टाइप करतात, काय म्हणतात आणि काय पाहता हे समजून घेते. प्रत्येक स्तरामध्ये एआय-पॉवर्ड कॅमेरा व गोपनीयतेसह गॅलॅक्सी झेड फोल्ड७ स्मार्ट व सुरक्षित वैयक्तिक सहाय्यक बनला आहे, जो कधीही, कुठेही मदत करण्यास सज्ज असतो.
• अँडॉइड १६ वर नवीन वन यूआय ८ लाँच करत गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये फोल्डेबल्समधील सॅमसंगचा नवीन एआय-पॉवर्ड प्लॅटफॉर्म समाविष्ट करण्यात आला आहे, जो आधुनिक अँड्रॉइड अनुभव देतो.
• मल्टीमोडल एआयसह जेमिनी लाइव्ह आता सुधारण्यात आले आहे, जे वापरकर्ते काय पाहतात, काय म्हणतात आणि करतात हे समजून घेते, ज्यामुळे संदर्भित प्रश्न विनासायासपणे टाइप किंवा बोलता येतात आणि अॅप्समधून बाहेर न पडता उत्तरे मिळवता येतात.
• सर्कल टू सर्चसह गरज असताना गेमिंग टिप्स मिळतात.
• मोठ्या स्क्रिन्ससाठी ऑप्टिमाइज करण्यात आलेल्या गॅलॅक्सी एआयसह गॅलॅक्सी झेड फोल्ड७ अनुभव देतो, जे उत्पादकता वाढवण्यासाठी व्यापक फोल्डेबल डिस्प्लेचे फायदे देतात. एआय रिझल्ट्स व्ह्यू डिस्प्ले एआय वैशिष्ट्यांमुळे स्वतंत्र स्प्लिट व्ह्यूमध्ये किंवा फ्लोटिंग व्ह्यूमध्ये पाहायला मिळते, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या ओरिजिनल कन्टेन्टमध्ये कोणताच व्यत्यय येत नाही. वापरर्ते ड्रॅग अँड ड्रॉप एआय-निर्मित कन्टेन्टसह अधिक कार्यक्षमपणे कार्य करू शकतात, जेथे मल्टी विंडोमध्ये फोटो व मजकूर पाहायला मिळते. ड्रॉईंग असिस्ट किंवा राइटिंग असिस्ट अशा टूल्ससह संकल्पना व व्हिज्युअल्सना एकत्र आणता येते, ज्यामुळे सर्जनशील प्रक्रिया सहजपणे करता येते.
• फोटो असिस्टसह फोटो अधिक आकर्षक दिसतात, जे वस्तूंना दुसऱ्या जागी नेते, दूर करते किंवा मोठे करते आणि अँगल्स समायोजित करते आणि एआय-पॉवर्ड अचूकतेसह पार्श्वभूमींना आकर्षक करते. वापरकर्ते विविध अभिव्यक्तींचा वापर करू शकतात, जसे पोर्ट्रेट स्टुडिओसह पेट प्रोफाइल्स आणि गॅलॅक्सीच्या सुधारित जनरेटिव्ह एडिटचा वापर करत फोटोंमध्ये सुधारणा करू शकतात. नवीन सजेस्ट इरेजेससह सक्रिय सूचना मिळू शकतात. साइड-बाय-साइड एडिटिंग आणि शो ओरिजिनल मोठ्या स्क्रिनवर मूळ फोटो आणि एडिट केलेल्या व्हर्जनमधील तुलना दाखवतात, ज्यामुळे काय सुधारणा करायची आहे आणि कोणते घटक ठेवले पाहिजे हे सहजपणे ठरवता येते. ऑडिओ इरेजर देखील अधिक सर्वोत्तम व सोईस्कर असण्यासाठी अपग्रेड करण्यात आले आहे.
गॅलॅक्सी झेड फ्लिप७ मल्टीमोडल क्षमता असलेला सुसंगत एआय फोन आहे, ज्यामध्ये नवीन फ्लेक्सविंडो आहे. हा स्मार्टफोन सहजपणे खिशामध्ये मावतो, पण शक्तिशाली आहे. या स्मार्टफोनमध्ये गॅलॅक्सी एआयसह एज-टू-एज फ्लेक्सविंडा, प्रमुख स्तरीय कॅमेरा आणि अत्यंत सुसंगत व प्रख्यात डिझाइन आहे. सर्वोत्तम वॉइस एआयपासून सर्वोत्तम सेल्फी क्षमतांपर्यंत गॅलॅक्सी झेड फ्लिप७ खिशाला परवडणारा सर्वोत्तम सोबती आहे, जो विनासायास परस्परसंवाद आणि दैनंदिन विश्वसनीयतेसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
• ४.१-इंच सुपर एएमओएलईडी फ्लेक्सविंडो आतापर्यंत गॅलॅक्सी झेड फ्लिपमधील सर्वात मोठी आहे, तसेच एज-टू-एज उपयुक्तता वापरकर्त्यांना कव्हर स्क्रिनवर चित्रे पाहण्याची आणि टास्क करण्याची सुविधा देते.
• मुख्य डिस्प्ले आणि फ्लेक्सविंडोवर २,६०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस व सुलभ १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह गॅलॅक्सी झेड फ्लिप७ सहजपणे स्क्रॉलिंग, स्ट्रीमिंग आणि गेमिंगचा आनंद देतो. तसेच, फ्लेक्सविंडोला व्हिजन बूस्टरसह अपग्रेड करण्यात आले आहे, ज्यामुळे आऊटडोअर व्हिजिबिलिटी वाढली आहे आणि वापरकर्ते कुठेही कनेक्टेड राहू शकतात.
• मुख्य डिस्प्ले ६.९-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X आहे, जो अत्यंत सुलभ, सर्वोत्तम अनुभवासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
• फक्त १८८ ग्रॅम वजन आणि फोल्ड केला असताना जाडी फक्त १३.७ मिमी असलेला गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आतापर्यंतचा सर्वात स्लिम गॅलॅक्सी झेड फ्लिप आहे.
• कव्हर आणि मागील बाजूचे कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टस® २ द्वारे संरक्षण करण्यात आले आहे.
• आर्मर फ्लेक्सहिंज मागील जनरेशनवरील हिंजच्या तुलनेत सडपातळ आहे आणि सहजपणे फोल्ड करता येण्यासाठी, तसेच दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणासाठी पुन्हा रचण्यात आलेली डिझाइन आणि अत्यंत शक्तिशाली साहित्य आहेत.
• शक्तिशाली आर्मर अॅल्युमिनिअम फ्रेम स्थिरतेसाठी बाहेरून मजबूतपणा देते.
क्षमता, जी दीर्घकाळापर्यंत टिकते आणि स्मार्टपणे काम करते
गॅलॅक्सी झेड फ्लिप७ स्लिम व संपूर्ण सुधारण्यात आला असला तरी या स्मार्टफोनमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले आहे, जो सर्वात अधिक कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये आहे.
• ४,३०० एमएएच बॅटरी गॅलॅक्सी झेड फ्लिपवरील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे, जी सिंगल चार्जमध्ये जवळपास ३१ तासांपर्यंत व्हिडिओ प्ले टाइम देते.
• गॅलॅक्सी झेड फ्लिप७ मध्ये आधुनिक ३ एनएम प्रोसेसरची शक्ती आहे, जे गॅलॅक्सीसाठी सानुकूल करण्यात आले आहे आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ च्या तुलनेत अधिक शक्तिशाली सीपीयू, जीपीयू व एनपीयूसह आजच्या जीवनशैलीसाठी अनुकूल आहे.
• पहिल्यांदाच गॅलॅक्सी झेड फ्लिप७ मध्ये सॅमसंग डीईएक्सचा समावेश करण्यात आला आहे, जे उपयुक्त वर्कस्टेशनमध्ये त्वरित हस्तांतरण करते, ज्यामुळे वापरकर्ते फ्लिप करत स्मार्टफोन ओपन करू शकतात, स्क्रिनशी कनेक्ट होऊ शकतात आणि अधिक मल्टीटास्किंगसाठी त्वरित पीसी-सारखे टूल्स मिळवू शकतात.
• नवीन वन यूआय ८ आणि आऊट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड १६ ची शक्ती असलेला हा स्मार्टफोन फ्लिपच्या आयकॉनिक डिझाइनसाठी सानुकूल केलेला वास्तविक मल्टीमोडल एआय अनुभव देतो, जेथे अनेक टास्क्स आता कव्हर स्क्रिनवरून हाताळता येतात.
• जेमिनी लाइव्ह आता प्रत्यक्ष फ्लेक्सविंडोवर उपलब्ध आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या आवाजासह माहिती शोधण्याची आणि हँड्स-फ्री टास्क्स पूर्ण करण्याची सुविधा देते. वापरकर्ते परदेशातील ट्रिपसाठी सज्ज राहू शकतात, ज्यासाठी फक्त जेमिनीला काय आवश्यक आहे ते सांगावे लागेल. त्यानंतर सॅमसंग वॉलेटमधून फ्लाइटबाबत सविस्तर माहिती मिळू शकते, विमानतळावर जाण्यासाठी कधी निघावे यासाठी रिमाइंडर स्थापित करते आणि वापरकर्त्यांच्या गंतव्यानुसार उच्च प्रमाणित रेस्टॉरंट्स देखील शोधते. तसेच सहजपणे उपलब्ध होण्यासाठी ही सर्व माहिती सॅमसंग नोट्समध्ये स्टोअर करता येऊ शकते. हे कव्हर स्क्रिनवर वैयक्तिक सहाय्यक सारखे आहे.
• जेमिनी लाइव्हवरील कॅमेरा शेअरिंगसह कॅमेराकडे बोट दाखवण्याप्रमाणे रिअल-टाइम मदत सहजपणे मिळवता येते. ट्रिपसाठी पॅकिंग करायची असो किंवा आऊटफिट निवडायचे असो वापरकर्त्यांना फक्त जेमिनीला ते काय शोधत आहेत हे सांगावे लागेल. प्रश्ने विचारा जसे ‘सेऊलमध्ये हवामानासाठी कोणते आऊटफिट्स अनुकूल आहेत?’ जेमिनी उपयुक्त मित्राप्रमाणे त्वरित प्रतिसाद देईल.
• नाऊ बार आता रिअल-टाइम अॅप अॅक्टिव्हीटी, पॉडकास्ट प्रोग्रेस दाखवते आणि कव्हर स्क्रिनवर दक्ष करते. हे वैशिष्ट्य आता अधिक थर्ड-पार्टी अॅप्समध्ये देखील एकीकृत आहे. फ्लेक्सविंडो वापरकर्त्यांना त्यांच्या राइड-शेअरबाबत ईटीए तपासण्याची, सुरू असलेले गाणे पाहण्याची, फूटबॉल सामन्यातील स्कोअर जाणून घेण्याची आणि अशा अनेक सुविधा देते.
• नाऊ ब्रिफ वाहतूक, रिमाइंडर्स, कॅलेंडर इव्हेण्ट्स व फिटनेस सारांश अशा वैयक्तिकृत दैनंदिन अपडेट्सबाबत माहिती देते. वापरकर्ते सबस्क्रिप्शन्स व आवडीच्या आधारावर वैयक्तिकृत संगीत व व्हिडिओ शिफारशी मिळवू शकतात, तसेच सॅमसंग हेल्थ व गॅलॅक्सी वॉचमधून आरोग्य व स्वास्थ्यासंदर्भात डेटा मिळवू शकतात.
• फ्लेक्सविंडोचा क्लॉक वापरकर्त्याच्या वॉलपेपरशी जुळून जातो, फोटोमधील चेहरे किंवा वस्तूंच्या पुढे राहतो, ज्यामुळे वेळ स्पष्टपणे दिसते. क्लोज-अप सेल्फी किंवा नयनरम्य स्कायलाइन असो लॉक स्क्रिन फोटोमध्ये व्यत्यय न आणता क्लॉक दिसण्याची खात्री देते.
लहान आकाराचा सेल्फी स्टुडिओ
गॅलॅक्सी झेड फ्लिप७ मध्ये प्रमुख स्तरीय फोटोग्राफी व सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सेल्फी कॅमेरा, तसेच सॅमसंगचे प्रगत प्रोव्हिज्युअल इंजिन आहे.
• ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टममध्ये ५० मेगापिक्सल वाइड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आहे, जे कोणत्याही प्रकाश स्थितीमध्ये प्रमुख स्तरीय सुस्पष्टता देतात. तसेच प्रत्यक्ष कव्हर स्क्रिनवरून नयनरम्य दृश्य किंवा उच्च दर्जाचे सेल्फीज कॅप्चर करता येतात.
• सुधारित नाइटोग्राफीसह वापरकर्ते अंधुक प्रकाशात देखील सुधारित लायटिंग अॅडजस्टमेंट्ससह आणि आवाज व ब्लर फ्रेम्स दूर करत आकर्षक फोटो कॅप्चर करू शकतात.
• १०-बीट एचडीआर कोणतीही वेळ असो आकर्षक रंग, सखोल कॉन्ट्रास्ट आणि अधिक वास्तविक स्वरूपात व्हिडिओज कॅप्चर करते.
• गॅलॅक्सी झेड फ्लिप७ फ्लेक्सविंडोसह सेल्फीजना नव्या उंचीवर घेऊन जातो. रिअल-टाइम फिल्टर्स वापरकर्त्यांना त्वरित फ्लेक्सकॅम शॉट्सचे प्रीव्ह्यू पाहण्याची आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची सुविधा देते. नवीन झूम स्लाइडरसह वापरकर्ते फक्त स्वाइपसह झूम इन किंवा झूम आऊट करू शकतात, ज्यामुळे परिपूर्णपणे फोटो कॅप्चर करता येतात किंवा आकर्षक ग्रुप सेल्फीजसाठी फ्रेममध्ये सर्वजण सामावू शकतात.
• ड्युअल प्रीव्ह्यूसह फोटोग्राफर आणि सब्जेक्ट फ्लेक्सविंडोवर लाइव्ह संयोजन पाहू शकतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण फोटो काढण्यास मदत होते.
• उत्साही कार्ट्रन स्टाइल, विलक्षण फिशआय लुक किंवा आकर्षक, प्रोफेशनल फिनिश असो फोटो असिस्टमधील पोर्ट्रेट स्टुडिओसह पाळीव प्राण्यांसोबतचे क्षण सुरेखरित्या कॅप्चर करता येतात.
अधिकाधिक वापरकर्त्यांना फोल्डेबल अनुभव देत सॅमसंगने गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफईची देखील घोषणा केली आहे. फोल्ड केल्यानंतर सुसंगत आणि ओपन केल्यानंतर विशाल दिसणाऱ्या गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफईमध्ये ६.७-इंच मेन डिस्प्ले आहे, जे सर्वोत्तम व्युईंग अनुभव देते. ५० मेगापिक्सल फ्लेक्सकॅम फ्लेक्स मोडमध्ये उच्च दर्जाचे सेल्फीज व व्हिडिओ देते, ज्यासाठी डिवाईस ओपन करण्याची गरज भासत नाही. नाऊ ब्रिफ कव्हर स्क्रिनवर हवामान, दैनंदिन वेळापत्रक व प्रवासाबाबत अलर्ट्स असे उपयुक्त अपडेट्स देते, जे गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफईच्या कॉम्पॅक्ट फॉर्मसाठी सानुकूल करण्यात आले आहे.
फ्यूचर-रेडी मोबाइल सिक्युरिटी
मोबाइल अनुभव अधिक इंटेलिजण्ट व इंटरकनेक्टेड होत असताना सॅमसंग त्यांचे संरक्षण करण्यासाठी पाया दृढ करत आहे, जेथे ऑन-डिवाईस एआयसाठी नवीन सुरक्षितता सादर करत आहे, क्रॉस-डिवाईस थ्रेट डिटेक्शन विस्तारित करत आहे आणि क्वॉन्टम-रोधक एन्क्रिप्शनसह नेटवर्क सुरक्षितता वाढवत आहे. वन यूआय ८ नवीन नॉक्स एन्हान्स्ड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन (केईईपी)सह वैयक्तिकृत एआय अनुभवांमध्ये सुधारित गोपनीयता देते. केईईपी डिवाईसेसच्या सुरक्षित स्टोरेज क्षेत्रामध्ये एन्क्रिप्टेड, अॅप-विशिष्ट स्टोरेज वातावरण तयार करते, ज्यामधून प्रत्येक अॅप त्यांच्या संवेदनशील माहितीसह उपलब्ध होण्याची खात्री मिळू शकते. वन यूआय ८ सह सॅमसंग गॅलॅक्सी परिसंस्थेमध्ये अधिक सक्रिय व युजर-अनुकूल संरक्षण देण्यासाठी नॉक्स मॅट्रिेक्स प्रगत करत आहे. तसेच, क्वॉन्टम-सेफ सुरक्षिततेप्रती विद्यमान कटिबद्धतेचा भाग म्हणून सॅमसंग सेक्युअर वाय-फायमध्ये पोस्ट-क्वॉन्टम क्रिप्टोग्राफीला एकीकृत करत आहे. ही सुधारणा मुलभूत एन्क्रिप्टेड कनेक्शन्समध्ये प्रमुख एक्स्चेंज प्रक्रियेला सुरक्षित करते, ज्यामुळे सार्वजनिक नेटवर्क्समध्ये प्रबळ गोपनीयतेची खात्री मिळते.
उपलब्धता, किंमत आणि ऑफर्स
गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई आजपाासून Samsung.com, Amazon.in, Flipkart.com वर आणि देशभरातील सर्व आघाडीच्या रिटेल आऊटलेट्समध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील.
मॉडेल मेमरी स्टोरेज रंग किंमत (रूपयांमध्ये)
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ १२ जीबी२५६ जीबी ब्ल्यू शॅडो, सिल्व्हर शॅडो, जेट ब्लॅक १७४,९९९ १२ जीबी५१२ जीबी १८६,९९९
१६ जीबी१ टीबी २१०,९९९ गॅलॅक्सी झेड फ्लिप७ १२ जीबी२५६ जीबी ब्ल्यू शॅडो, जेट ब्लॅक, कोरल रेड १०९,९९९
१२ जीबी५१२ जीबी १२१,९९९ गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई ८ जीबी१२८ जीबी ब्लॅक, व्हाइट ८९,९९९
८ जीबी_२५६ जीबी ९५,९९९
Samsung.com च्या माध्यमातून गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडण्यासाठी अतिरिक्त रंग पर्याय असेल, तो म्हणजे मिंट.
प्री-ऑर्डर ऑफर्स
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ प्री-ऑर्डर करणााऱ्या ग्राहकांना १२,००० रूपयांचे मोफत स्टोरेज अपग्रेड मिळेल. गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ६,००० रूपयांचे मोफत स्टोरेज स्टोरेज अपग्रेड मिळेल. तसेच, तिन्ही मॉडेल्सवर जवळपास २४-महिने नो कॉस्ट ईएमआय देखील उपलब्ध असेल. ग्राहक आजपासून https://www.samsung.com/in/live-offers येथे सॅमसंग लाइव्हवर देखील प्री-ऑर्डर करू शकतात.
मॉडेलचे नाव ऑफर्स नो कॉस्ट ईएमआय
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ १२ हजार रूपयांचे फायदे जवळपास २४ महिने
१२ हजार रूपयांचे स्टोरेज अपग्रेड (२५६ जीबी व्हेरिएण्ट प्री-ऑर्डर करा आणि मिळवा ५१२ जीबी व्हेरिएण्ट) गॅलॅक्सी झेड फ्लिप७ १२ हजार रूपयांचे फायदे जवळपास २४ महिने
१२ हजार रूपयांचे स्टोरेज अपग्रेड (२५६ जीबी व्हेरिएण्ट प्री-ऑर्डर करा आणि मिळवा ५१२ जीबी व्हेरिएण्ट) गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई ६ हजार रूपयांचे फायदे जवळपास २४ महिने
६ हजार रूपयांचे स्टोरेज अपग्रेड (१२८ जीबी व्हेरिएण्ट प्री-ऑर्डर करा आणि मिळवा २५६ जीबी व्हेरिएण्ट)