स्पॉटिफायचा ‘प्रोजेक्ट इको’ शिलाँग चेंबर कॉयरसोबत भागीदारी

News Service

कॉयरच्या २५ वर्षांच्या संगीतप्रवासाचा गौरव आणि दिवंगत संस्थापक पद्मश्री नील नोंगकिनरिह यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. या माध्यमातून कॉयरचा नवीन अल्बम स्पॉटिफाय वर उपलब्ध करून देण्यात आला असून, ‘प्रोजेक्ट इको’च्या विशेष हबवरही त्याला स्थान देण्यात आले आहे.
शिलाँग, 19 नोव्हेंबर 2026: भारतातील लोकसंगीत आणि प्रादेशिक संगीत परंपरांचा गौरव करून ते जगभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या स्पॉटिफाय च्या ‘प्रोजेक्ट इको’ या उपक्रमाने आज शिलाँग चेंबर कॉयरसोबत एका महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली.
या भागीदारीच्या माध्यमातून कॉयरचा ‘अंकल नील – आमची गाणी, आमची कहाणी’ हा विशेष अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. कॉयरचे दिवंगत संस्थापक नील नोंगकिनरिह यांच्या स्मृतींना समर्पित असलेला हा अल्बम भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध संगीत समूहांपैकी एक असलेल्या शिलाँग चेंबर कॉयरच्या २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे प्रतीक आहे. हा अल्बम आता Spotify वर उपलब्ध असून, तो ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच, स्पॉटिफाय च्या विशेष ‘प्रोजेक्ट इको’ हबवरही या कॉयरला विशेष स्थान देण्यात आले आहे.
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी शिलाँग येथे या सोहळ्याचे नेतृत्व केले. यावेळी सरकारी प्रतिनिधी आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून ‘अंकल नील’ यांच्या संगीतवारशाला आदरांजली वाहण्यात आली. अनेक तरुण गायकांना घडवणाऱ्या आणि शिलाँगला जागतिक संगीतविश्वाच्या नकाशावर स्थान मिळवून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी आणि त्यांच्याशी संबंधित वैयक्तिक अनुभव यावेळी उपस्थितांनी सांगितले.
४० हून अधिक भाषांमध्ये गाण्याची क्षमता असलेल्या या कॉयरने प्रथमच या अल्बममधील गाणी थेट सादर केली. इबारिशा लिंगडोह, विल्यम रिचमंड बसायावमोईत आणि रियूबँकिट लिंडेम यांनी शिलाँगमध्ये या गाण्यांचे सादरीकरण केले. याच शहरातून या संगीतप्रवासाची सुरुवात झाली होती.

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा म्हणाले, अंकल नील आणि माझे संगीताच्या माध्यमातून एक विशेष नाते निर्माण झाले होते. मी स्वतः एक संगीतकार असल्यामुळे त्यांची दूरदृष्टी आणि शिलाँग चेंबर कॉयरला त्यांनी दिलेले मार्गदर्शन यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. तरुण गायकांना संधी उपलब्ध करून देत त्यांनी अनेक नव्या आवाजांना घडवले.
त्यांच्या स्मृतींना समर्पित हा विशेष अल्बम म्हणजे त्यांच्या योगदानाला आणि कॉयरच्या २५ वर्षांच्या प्रवासाला दिलेली अत्यंत समर्पक आदरांजली आहे. स्पॉटिफाय आपल्या ‘प्रोजेक्ट इको’ या उपक्रमाच्या माध्यमातून मेघालयचा समृद्ध संगीतवारसा आणि त्यामागील कथा आपल्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडे असलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button