टाटा मोटर्स आणि युको बँकेची व्यावसायिक वाहन फायनान्ससाठी भागीदारी

News Service

देशभरातील ग्राहकांना व्यावसायिक वाहनांसाठी संघटित फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स उपलब्ध करून देणार

मुंबई, १४ जुलै २०२६ – टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने देशभरातील ग्राहकांना व्यावसायिक वाहनांसाठी संघटित फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स उपलब्ध करून देण्यासाठी युको बँकेसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. युको बँक भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची देशभरात उपस्थिती असण्‍यासोबत व्‍यापक शाखा नेटवर्क आहे. हा सहयोग युको बँकेची व्‍यापक आर्थिक पोहोच आणि टाटा मोटर्सचा अद्वितीय व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ यांना एकत्र आणतो, ज्याचा सामायिक उद्देश देशभरातील ग्राहक आणि व्यवसायांसाठी वाहन मालकी अधिक सुलभ व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनवणे हा आहे.

या सहयोगांतर्गत, ग्राहकांना वाहन खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आकर्षक व्याजदर मिळतील, तसेच जलद कर्ज मंजूरी आणि वेगवान प्रक्रियेमुळे वाहनांची डिलिव्हरी लवकर मिळणे सुनिश्चित होईल. हा सहयोग खरेदीचा विनासायास अनुभव देण्यासाठी सोपी आणि ग्राहकांसाठी अनुकूल कागदपत्र प्रक्रिया, व्यवसायांसाठी सुरुवातीची भांडवली गरज कमी करणारे उच्च लोन-टू-व्हॅल्यू कर्ज पर्याय आणि फ्लीट ऑपरेटरच्या रोख प्रवाहाच्या गरजांनुसार तयार केलेले स्थिर व संरचित कर्ज परतफेडीचे कालावधी प्रदान करते. दोन्ही कंपन्‍या आपल्या शाखा, डीलरशिप आणि बाजारपेठीय संपर्काच्या माध्यमातून परस्परांशी ताळमेळ साधून काम करतील, ज्‍यामुळे ही स्पर्धात्मक फायनान्सिंग सेवा ग्राहकांपर्यंत, विशेषतः वंचित शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकेल.

या प्रसंगी मत व्यक्त करत युको बँकेचे जनरल मॅनेजर आणि झोनल हेड – मुंबई, श्री. शशिकांत कुमार म्हणाले, “टाटा मोटर्स लिमिटेडसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे हा नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स उपलब्ध करून देण्याच्या युको बँकेच्या कटिबद्धतेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या धोरणात्मक सहयोगाच्या माध्यमातून, टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांसाठी विनासायास, स्पर्धात्मक आणि वेळेवर फायनान्सिंग सेवा प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे उद्योजक, फ्लीट ऑपरेटर आणि व्यवसायांना आत्मविश्वासाने आपला विस्तार करण्यास मदत होईल.”
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडच्‍या ट्रक्स विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड श्री. राजेश कौल म्हणाले, “आमच्या व्यावसायिक वाहन ग्राहकांसाठी फायनान्सिंग परिसंस्‍था अधिक दृढ करण्यासाठी युको बँकेसोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. संघटित आणि स्पर्धात्मक फायनान्सिंगची उपलब्धता हा आमच्या ग्राहकांच्या वाढीचा मुख्य मार्ग आहे आणि युको बँकेची प्रबळ देशव्यापी उपस्थिती त्यांना या प्रयत्‍नातील आदर्श भागीदार बनवते. हा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या वाहनांपासून ते संघटित फायनान्सिंगपर्यंत सर्वसमावेशक सेवा देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला प्रबळ करतो, ज्यामुळे आमचे ग्राहक अधिक आत्मविश्वासाने आणि सुलभतेने आपला व्यवसाय वाढवू शकतील.”

टाटा मोटर्सचा १ टनापेक्षा कमी वजनाच्या वाहनांपासून ते ५५ टनाच्या मालवाहू वाहनांपर्यंत आणि १० आसनी ते ५१ आसनी प्रवासी वाहतूक पर्यायांपर्यंत सर्वात मोठा व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ आहे. या मजबूत वाहनांना कंपनीच्या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाद्वारे सर्वसमावेशक वाहन जीवनचक्र व्यवस्थापनासाठी मूल्यवर्धित सेवांची जोड दिली जाते. फ्लीट ऑपरेटरना वाहनांचा वापर वाढवण्यास आणि मालकीचा एकूण खर्च कमी करण्यास सक्षम करणारा टाटा मोटर्सचा कनेक्टेड वाहन प्लॅटफॉर्म फ्लीट एज, तसेच ४,५०० हून अधिक विक्री आणि सेवा केंद्रांच्या देशव्यापी नेटवर्ककडून मिळणारा २४×७ पाठिंबा याद्वारे टाटा मोटर्स सर्वसमावेशक वाहतूक उपायांमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button