टाटा मोटर्सकडून स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप्‍सवर सर्वात मोठ्या बोनान्‍झाची घोषणा

News Service

जीएसटी कपातीसोबत ब्‍लॉकबस्‍टर मोहिम ‘इस त्‍योहार पे उपहार’ लाँच
एस प्रोची किंमत आता फक्‍त Rs. 3.67 लाख रूपयांपासून सुरू होते!

मुंबई, १२ सप्‍टेंबर २०२५: टाटा मोटर्स ही भारतातील पहिल्‍या क्रमांकाची कमर्शियल वेईकल उत्‍पादक कंपनी आपल्‍या स्‍मॉल क‍मर्शियल वेईकल व पिक-अप (SCVPU) ग्राहकांसाठी उत्‍सवी उत्‍साह घेऊन येत आहे. संपूर्ण जीएसटी कपातीचे फायदे देण्‍याच्‍या घोषणेनंतर कंपनी आता डिलला अधिक उत्‍साहित करत आहे, जेथे कंपनीचे सर्व लोकप्रिय ब्रँड्स एस, एस प्रो, इण्‍ट्रा आणि योधाच्‍या डिझेल, पेट्रोल व बाय-फ्यूइल व्‍हेरिएण्‍ट्सवर ३२-इंच एलईडी टीव्‍ही आणि जवळपास ६५,००० रूपयांचे अतिरिक्‍त फायदे देत आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर २२ सप्‍टेंबर २०२५ पर्यंत करण्‍यात येणाऱ्या बुकिंग्‍जवर वैध आहे, तसेच ३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत वेईकल डिलिव्‍हरी करण्‍यात येईल. अधिक उत्‍साहाची बाब म्‍हणजे, नवीन लाँच करण्‍यात आलेली एस प्रो आता फक्‍त Rs. 3.67 लाख रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीसह येते, ज्‍यामुळे उद्योजकांना विश्वसनीय टाटा वेईकलसोबत त्‍यांचा व्‍यवसाय सुरू करणे किंवा विस्‍तारित करणे अधिक सोपे झाले आहे.

*ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या व्हेईकल व्‍हेरिएण्‍टची अचूक किंमत अधिकृत टाटा मोटर्स शोरूममधून निश्चित करण्‍याचे आणि ऑफर कालावधीदरम्यान डिलिव्हरीसाठी लवकर बुकिंग करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button