मुंबई, एप्रिल २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज पूर्णपणे नवीन टाटा इंट्रा ईव्ही पिकअप लाँच केली आहे, ज्यासह इलेक्ट्रिक व्यावसायिक मोबिलिटीमधील आपले नेतृत्व अधिक प्रबळ केले. आपल्या इलेक्ट्रिक छोट्या व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओचा विस्तार करताना या नवीन पिकअपमध्ये विश्वासार्ह इंट्रा प्लॅटफॉर्मची ताकद आणि खास डिझाइन केलेले इलेक्ट्रिक आर्किटेक्चर यांचे संयोजन करण्यात आले आहे. भारताच्या बदलत्या मालवाहतूक गरजांसाठी हे विश्वासार्ह आणि अधिक कमाई करून देणारे सोल्यूशन ठरेल. हे देशभरातील टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन डिलरशिप्समध्ये ११.९५ लाख रूपये (एक्स-शोरूम) या अद्वितीय सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल.

टाटा इंट्रा ईव्ही पिकअप लाँच करत टाटा मोटर्स लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. गिरीश वाघ म्हणाले, “हरित गतीशीलतेप्रती असलेली आमची कटिबद्धता भारतातील वैविध्यपूर्ण व्यावसायिक गरजांना अनुरूप आणि शाश्वत उपाय देण्यावर केंद्रित आहे. आमच्या इलेक्ट्रिक मिनी-ट्रकला मिळालेला उत्तम प्रतिसाद आणि देशभरातील १० शहरांमध्ये प्रवाशांच्या सेवेत असलेल्या आमच्या इलेक्ट्रिक बसच्या यशस्वी उपयोजनानंतर आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला आमचे नेक्स्ट-जनरेशन इलेक्ट्रिक ट्रक्स लाँच केले होते. आता इलेक्ट्रिक पिकअप लाँच करून आम्ही यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रगतीद्वारे टाटा मोटर्सने सर्व विभागांमध्ये देशातील सर्वात व्यापक इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ तयार केला आहे. सरकारच्या पुरोगामी धोरणांमुळे आणि ग्राहक, भागीदार व पुरवठादार यांच्यातील भक्कम सहकार्यामुळे या प्रवासाला गती मिळत आहे, तसेच भारताच्या स्वच्छ आणि अधिक शाश्वत गतीशीलतेकडे जाणाऱ्या प्रवासाला गती मिळत आहे.”
प्रत्यक्ष कामकाजातील सखोल अनुभवातून आणि आव्हानात्मक कामाच्या चक्रांसाठी डिझाइन केलेला हा इंट्रा ईव्ही पिकअप देशातील सर्वात वैविध्यपूर्ण पिकअपमध्ये आता इलेक्ट्रिक क्षमतेची जोड देत आहे. यामुळे वाहन चालकांना जड माल वाहून नेणे, लांबचे मार्ग पार करणे आणि अधिक आत्मविश्वासाने काम करणे शक्य होईल. तसेच, कमी देखभाल खर्च आणि पर्यावरणाचे रक्षण या फायद्यांचाही लाभ घेता येईल.
टाटा इंट्रा ईव्ही पिकअपबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स लि.च्या एसीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हेल्दर म्हणाले, “नवीन इंट्रा ईव्ही पिकअप प्रामुख्याने कमाईची क्षमता आणि दैनंदिन उपयुक्तता लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये या श्रेणीतील सर्वाधिक पेलोड क्षमतेसह उत्कृष्ट कामगिरी, लांब पल्ला आणि हाय अपटाइम यांचे संयोजन करण्यात आले आहे. ही सर्व वैशिष्ट्ये या श्रेणीतील सर्वोत्तम किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पिकअपमधील आरामदायी व क्रॅश-टेस्टेड केबिन, कारसारखे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि विचारपूर्वक दिलेली वैशिष्ट्ये थकवा कमी करण्यासाठी आणि कामाचे तास वाढवून उत्पादकता सुधारण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे, तसतसे उद्योगाचे निकष उंचावण्यासाठी आणि इलेक्ट्रिक मालवाहतूक व्यवसायांसाठी व्यावहारिक आणि खात्रीशीर पर्याय बनवण्यासाठी टाटा मोटर्स कटिबद्ध आहे.”
कमाईसाठी डिझाइन केलेले, टिकण्यासाठी बनवलेले
इंट्रा ईव्ही पिकअपच्या केंद्रस्थानी उत्पादकता आणि नफा मिळवून देण्यावर स्पष्ट भर देण्यात आला आहे. १,७५० किलोची पेलोड क्षमता आणि १० फूट २ इंचापर्यंतच्या लांब लोड बॉडीच्या पर्यायांसह, हे वाहन एफएमसीजी आणि ई-कॉमर्सपासून कोल्ड-चेन, कचरा व्यवस्थापन, एलपीजी आणि दुग्ध वितरणापर्यंतच्या विस्तृत क्षेत्रांसाठी उपयुक्त आहे. यामुळे प्रत्येक फेरीत अधिक माल वाहून नेणे आणि वाहनाचा सर्वोत्तम वापर करणे शक्य होते.
७२ केडब्ल्यू इलेक्ट्रिक मोटर २३० एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे पूर्ण भार असतानाही वाहनाला ओढण्याची जबरदस्त शक्ती मिळते. तसेच, २३ टक्के ग्रेडेबिलिटी (चढण चढण्याची क्षमता) आव्हानात्मक रस्त्यांवरही सुलभ कामकाजाची खात्री देते. भारतातील हवामान आणि वापराच्या परिस्थितीनुसार डिझाइन करण्यात आलेली २८.२ केडब्ल्यूएच, आयपी६७-प्रमाणित बॅटरी एका चार्जवर २११ किमीची प्रमाणित रेंज देते, ज्यामुळे दिवसभरातील मालवाहतुकीच्या अनेक फेऱ्या पूर्ण करणे शक्य होते. सीसीएस२ चार्जरसह असलेल्या फास्ट चार्जिंग सुविधेमुळे ही बॅटरी साधारण ५५ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते, ज्यामुळे अपटाइम वाढतो.
एचव्ही (हाय व्होल्टेज) बॅटरीवर ६ वर्षे किंवा २ लाख किमीच्या वॉरंटीसह इंट्रा ईव्ही पिकअप दीर्घकाळ विश्वासार्ह कामगिरी बजावण्यासाठी डिझाइन केला आहे, जो इलेक्ट्रिक वाहन मालकांना शाश्वतता आणि मनःशांती देतो.
सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम कामकाजासाठी स्मार्ट तंत्रज्ञान
इंट्रा ईव्हीच्या डिझाइनमध्ये सुरक्षिततेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. विशेष इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम वाहनाची स्थिरता आणि ब्रेकिंग कार्यक्षमता वाढवते, तर थ्री-लेव्हल रिजनरेटिव्ह ब्रेकिंग वेग कमी होत असताना ऊर्जा पुन्हा मिळवण्यास मदत करते, ज्यामुळे प्रत्यक्ष प्रवासाची रेंज वाढते.
इंट्रा ईव्हीसोबत टाटा मोटर्स फ्लीट एजची सुविधा मिळते, जी वाहनाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग, हेल्थ मॉनिटरिंग आणि आगाऊ देखभाल यांबद्दल माहिती देते. यामुळे ताफा मालकांना त्यांचा अपटाइम सुधारण्यास, खर्चाचे व्यवस्थापन करण्यास आणि अधिक पारदर्शकपणे काम करण्यास मदत होते.
उत्पादकतेस मदत करणारे आरामदायी डिझाइन
चालकाला स्टिअरिंगवर अनेक तास घालवावे लागतात हे ओळखून, इंट्रा ईव्ही पिकअपमध्ये वॉक-थ्रू केबिन, कारसारखे एर्गोनॉमिक्स आणि इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड स्टिअरिंग (ईपीएएस) देण्यात आले आहे, जे स्टिअरिंग फिरवण्याचे कष्ट लक्षणीयरित्या कमी करते. इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनमुळे होणारा कमी आवाज आणि व्हायब्रेशन्स केबिनमधील वातावरण शांत आणि कमी थकवा देणारे बनवते, ज्यामुळे चालकाचे लक्ष केंद्रित राहण्यास, आराम मिळण्यास आणि एकंदरीत स्वास्थ्यास मदत होते.
अडथळे दूर करणारी इकोसिस्टम
इंट्रा ईव्ही पिकअपला टाटा मोटर्सच्या विस्तारत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन परिसंस्थेचा प्रबळ पाठिंबा आहे. यामध्ये देशभरातील २५,००० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स, २०० पेक्षा जास्त समर्पित ईव्ही सर्विस सेंटर्स आणि घरगुती चार्जिंग सुविधेचा समावेश आहे. आघाडीच्या बँका आणि एनबीएफसी संस्थांसोबत सहयोगाच्या माध्यमातून टाटा मोटर्स सानुकूलित फायनान्सिंग पर्याय, स्थिर ईएमआय आणि त्वरित कर्ज मंजूरी देखील प्रदान करते, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचा प्रवास सुलभ आणि खात्रीशीर होतो.
एस ईव्ही १००० आणि एस प्रो ईव्हीच्या श्रेणीत आता इंट्रा ईव्ही पिकअप सामील झाल्यामुळे टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक छोट्या व्यावसायिक वाहनांचा पोर्टफोलिओ अधिक प्रबळ झाला आहे. हा पोर्टफोलिओ भारतातील उद्योजक, चालक व ताफा मालकांना अधिक कार्यक्षम व्यवसाय आणि अधिक शाश्वत भविष्य घडवण्याकरिता मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.