टाटा मोटर्सने नवीन अल्ट्रा प्राइम आणि स्टारबस प्राइम श्रेणी लाँच केले

News Service
  • सुरक्षित आणि शाश्वत प्रवासी वाहतुकीसाठी एलपीओ १६२० सीएनजी, अल्ट्रा प्राइम एलपीओ ४१२ आणि अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्‍हीचे अनावरण केले.
  • भारतातील सर्वात पसंतीचे लास्ट-माइल पॅसेंजर मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे इलेक्ट्रिक रूप मॅजिक ईव्हीचे प्रदर्शन.
  • इंटरसिटी, शहरांतर्गत आणि संस्थात्मक मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा व्यापक पोर्टफोलिओ सादर केला.

गांधीनगर, ९ जुलै २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज प्रवास ५.० मध्ये आपल्या व्यावसायिक पॅसेंजर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा सर्वात प्रगत पोर्टफोलिओ प्रदर्शित केला. यामध्ये प्रामुख्याने ऑल-न्‍यू टाटा अल्ट्रा प्राइम आणि टाटा स्टारबस प्राइम या बस श्रेणी लाँच करण्यात आल्या. उत्तम आरामदायी प्रवास, अधिक सुरक्षितता आणि उच्च कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन केलेल्या या नेक्स्ट-जनरेशन बसेस संपूर्ण भारतातील प्रवासी वाहतुकीचे भविष्य घडवण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला सादर करतात.

कंपनीने एलपीओ १६२० सीएनजी, अल्ट्रा प्राइम एलपीओ ४१२, अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही, मॅजिक ईव्ही, विंगर प्लस व अल्ट्रा प्राइम आरई कॉन्सेप्टसह अनेक उपयोगांसाठी आणि पॉवरट्रेनसाठी आवश्यक असलेल्या मसेबिलिटी सोल्‍यूशन्‍सची सर्वसमावेशक श्रेणी सादर केली. या संपूर्ण पोर्टफोलिओमधून निदर्शनास येते की, टाटा मोटर्स शहरी, इंटरसिटी व संस्थात्मक वाहतुकीसाठी सुरक्षित, शाश्वत आणि ग्राहक-केंद्रित मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते.

या इव्‍हेण्‍टप्रसंगी मत व्‍यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडचे कमर्शियल पॅसेंजर वेईकल्सचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड श्री. आनंद एस. म्हणाले, ”प्रवास हे आमच्यासाठी फ्लीट ऑपरेटर्स व उद्योग क्षेत्रातील घटकांशी जोडले जाण्यासाठी आणि देशभरात प्रवासी वाहतुकीच्या गरजा कशा प्रकारे बदलत आहेत याबद्दल अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ राहिले आहे. या वर्षातील आमचे सादरीकरण हे कर्मचारी वाहतूक, पर्यटन, शाळा वाहतूक किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंतची वाहतूक असो विविध उपयोगांमधील ग्राहकांच्या गरजांबद्दलच्या आमच्या सखोल आकलनाला सादर करते. एलपीओ १६२० सीएनजीचा कमी खर्च, नवीन अल्ट्रा प्राइम श्रेणीची वाढलेली सुरक्षितता आणि आराम, तसेच अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही आणि मॅजिक ईव्हीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीचा झालेला विस्तार यांसह प्रत्येक सोल्‍यूशन ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आमच्या विस्तीर्ण सेवा नेटवर्क आणि सपोर्ट सिस्टमच्या बळावर ही उत्पादने ग्राहकांना वेईकचा जास्तीत जास्त वापर करण्यास, ऑपरेटिंग खर्च सुधारण्यास आणि उत्तम प्रवास अनुभव देण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय फायदेशीरपणे वाढवणे शक्य होते.”

प्रवास ५.० मध्ये टाटा मोटर्सने उद्योगातील सर्वात व्यापक पॅसेंजर मोबिलिटी पोर्टफोलिओ सादर केला, ज्यामध्ये शाळा, कर्मचारी, पर्यटन, इंटरसिटी, शहरांतर्गत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या वाहतुकीसाठी समकालीन व इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्‍सचा समावेश आहे. प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button