मुंबई, २३ जून २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन (कमर्शियल वेईकल्स) उत्पादक आणि सर्वसमावेशक मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज विविध क्षेत्रांतून ३,४०० हून अधिक इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल (ईसीव्ही) ऑर्डर्स मिळवल्याची घोषणा केली आहे. भारतातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीचा मुख्य प्रवाहातील स्वीकार वाढण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
या ऑर्डर्समध्ये जवळपास २,००० एससीव्ही (स्मॉल कमर्शियल वेईकल्स) व पिक-अप्स, जवळपास ९०० ट्रक्स आणि जवळपास ५०० बसेसचा समावेश आहे. या वेईकल्सचा वापर ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी व एफएमसीडी वितरण, शहरांतर्गत वाहतूक यांसारख्या विविध कामांसाठी, तसेच सिमेंट, स्टील, खाणकाम आणि विमानतळावरील टार्मक ऑपरेशन्स यांसारख्या कठीण क्षेत्रांसह आंतरराज्यीय व शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी केला जाणार आहे. या व्यापक प्रमाणावरील वापरामधून प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सवरील ग्राहकांचा वाढता विश्वास दिसून येतो आणि भारताच्या शून्य-उत्सर्जन व्यावसायिक गतीशीलतेच्या उद्दिष्टाला पुढे नेण्यात टाटा मोटर्सचे अग्रस्थान प्रबळ करतो. तसेच यामधून प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमांकडून विविध क्षेत्रांमध्ये ईव्हीच्या मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक वापराकडे होणारे बदल देखील निदर्शनास येतात.
भारतात कमर्शियल वेईकल्समधील इलेक्ट्रिक मोबिलिटी आता सुरुवातीच्या टप्प्याकडून मोठ्या प्रमाणावरील वापराकडे सरकत आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष परिस्थितीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वेईकल्सचा वापर वाढला आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्सच्या सर्वात विस्तृत पोर्टफोलिओसह या बदलाचे नेतृत्व करत आहे, ज्याला अनुकूल परिसंस्थेचे पाठबळ लाभले आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिफिकेशन हे व्यावहारिक आणि फायदेशीर ठरते. वेईकल्सच्या पलीकडे जाऊन, कंपनी फ्लीट मालक आणि ग्राहकांशी जवळून भागीदारी करत आहे, ज्यामुळे वेईकल्स संपूर्ण कार्यक्षमता, अपटाईम, चार्जिंग आणि फायनान्सिंग यांमध्ये सुधारणा करता येईल. कमर्शियल इलेक्ट्रिक वेईकल्सचा वापर वाढत आहे, तसतसे टाटा मोटर्स ग्राहकांना अनुकूल आणि एंड-टू-एंड सोल्यूशन्स देण्यावर लक्ष केंद्रित ठेवत आहे, ज्यामुळे ग्राहक कोणत्याही अडचणीशिवाय शून्य-उत्सर्जन गतीशीलतेकडे वाटचाल करू शकतील.
गेल्या १२ महिन्यांत, टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. कंपनीने विविध कामांच्या स्वरूपानुसार आणि कामकाजाच्या परिस्थितीनुसार तयार केलेली नेक्स्ट-जनरेशन ईसीव्ही बाजारपेठेत आणली आहे. स्मॉल कमर्शिलय वेईकल आणि पिक-अप्स क्षेत्रात एस प्रो ईव्ही, एस ईव्ही आणि इंट्रा ईव्ही कार्यक्षम व शाश्वत लास्ट-माईल आणि शहरांतर्गत वितरणास सक्षम करत आहेत. अल्ट्रा ईव्ही श्रेणी (७ ते १२ टन), तसेच प्राइमा ईव्ही ५५टी ट्रॅक्टर आणि प्राइमा ईव्ही २८टी टिपर यांसारख्या जड वाहनांच्या साहाय्याने मध्यम आणि अवजड मालवाहतुकीच्या क्षेत्रात विस्तार करण्यात आला आहे. प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात स्टारबस ईव्ही आणि अल्ट्रा ईव्ही बसेस शहरांतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीला मोठे पाठबळ देत आहेत.
ही प्रगती इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील सखोल व्यावसायिक अनुभव आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर आधारित आहे. कंपनीचा मोठा इलेक्ट्रिक ताफा आधीच कार्यरत आहे, ज्यामध्ये विविध शहरांमधील ३,८०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. या बसेसनी एकूण ५५ कोटी किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास पूर्ण केला आहे. यातून वेईकल्सची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि लाइफसायकल कामगिरी आणखी सुधारण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीतील अत्यंत मौल्यवान माहिती व अनुभव मिळाला आहे. तसेच, स्मॉल कमर्शियल वेईकल्स क्षेत्रातही ईव्हीचा वापर वेगाने वाढत आहे. सध्या १७,००० हून अधिक टाटा ईएससीव्ही रस्त्यांवर धावत आहेत, ज्यासह विविध प्रकारच्या भूप्रदेशांवर आणि वेगवेगळ्या कामांसाठी इलेक्ट्रिक सोल्यूशन्सच्या सज्जतेची पुष्टी मिळते.
उत्पादन विकासासोबत टाटा मोटर्सने मोठ्या प्रमाणावर ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी परिसंस्था-आधारित दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. यामध्ये १४ पेक्षा जास्त चार्ज पॉइंट ऑपरेटर्ससोबत भागीदारीतून विस्तारणारे चार्जिंग नेटवर्क, आघाडीच्या बँका व एनबीएफसीसोबत मिळून ईव्ही-केंद्रित फायनान्सिंग सोल्यूशन्स, फ्लीट एजच्या माध्यमातून प्रगत फ्लीट मॅनेजमेंट आणि सर्वसमावेशक अपटाईम अॅश्युरन्स प्रोग्राम्सचा समावेश आहे. हे सर्व घटक मिळून आजच्या व्यवसायांसाठी इलेक्ट्रिक व्यावसायिक गतीशीलतेला व्यावहारिक आणि फायदेशीर पर्याय बनवण्यास मदत करत आहेत.