थम्स अपने जसप्रीत बुमराहचा समावेश असलेल्या थंडरव्हिल्स®च्या पुनरागमनासह भारतातील बाइकिंग संस्कृतीला चालना दिली

News Service

थम्स अप नेक्स्ट-जनरेशन राइडर्सना थंडरव्हिल्स® च्या माध्यमातून बाइकिंगच्या (राइडिंग) तुफानी विश्वाचा अनुभव घेण्‍याचे आवाहन करत आहे

राष्ट्रीयजुलै २२, २०२६: थम्स अप हा कोका-कोला इंडियाचा बिलियन-डॉलर स्वदेशी ब्रँड आपल्या थंडरव्हिल्स® या प्रमुख राइडिंग प्लॅटफॉर्मच्या पुनरागमनासह भारतातील राइडिंग संस्कृतीला चालना देत आहे. क्रिकेट जगतातील आयकॉन जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील ही मोहीम भारतातील राइडिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नव कटिबद्धता दर्शवते, ज्याद्वारे नेक्स्ट-जनरेशन राइडर्सना मोकळ्या रस्त्यांवर मिळणाऱ्या थरार आणि स्वातंत्र्याचा स्वीकार करण्याचे आवाहन केले जात आहे.

या मोहिमेला पुढे नेणारी व बुमराहचा सहभाग असलेली अॅक्शनने भरलेली ब्रँड जाहिरात थंडरव्हिल्सच्या तुफानी जगाला जिवंत करते. ही जाहिरात प्रत्येक नवोदित राइडरला धाडसी, थरारक आणि अत्यंत तुफानी अनुभवांचा पाठलाग करण्याचे आव्हान देते. थंडरव्हिल्स ही केवळ एक मोहीम नसून राइडिंगच्या जगात प्रवेश करण्याचे माध्यम आहे, जे भारतातील वाढत्या राइडिंग संस्कृतीचा उत्सव साजरा करणाऱ्या नाविन्यपूर्ण अनुभवांद्वारे, समुदाय सहभागाद्वारे आणि संधींच्या माध्यमातून राइडिंग प्रेमींना, क्रिएटर्सना आणि नवोदित राइडर्सना एकत्र आणण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून, विशेष खूण असलेली थम्स अपची पाकिटे तुफानी राइडिंगचा अनुभव मिळवण्याचे माध्यम बनली आहेत. ग्राहक थंडरव्हिल्सच्या जगात प्रवेश करण्यासाठी पाकीट स्कॅन करू शकतात आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून थंडरव्हिल्स बाईक जिंकण्यासह इतर विशेष राइडिंग बक्षीसे जिंकण्याची संधी मिळवू शकतात, ज्यामुळे प्रत्येक पाकीट राइडिंगच्या जगात पाऊल ठेवण्याचे आमंत्रण ठरते.

कोका-कोला इंडिया आणि साऊथ-वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेव्हर्सच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, ”थम्स अपमध्ये आमची खास चव आणि जास्त फिझ एका धाडसी, साहसी वृत्तीचे प्रतिनिधित्व करते, ज्याने अनेक पिढ्यांपासून ब्रँडला ओळख मिळवून दिली आहे. राइडिंग हा आमच्यासाठी आवडीचा विषय असण्‍यासोबत आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रेरणा देणाऱ्या तुफानी वृत्तीची एक नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. आपल्या तिसऱ्या वर्षात थंडरव्हिल्स ३.० राइडर्सना अविस्मरणीय अनुभव, अधिक प्रबळ समुदाय आणि राइडिंगच्या थराराच्या जवळ घेऊन येत आहे. आम्हाला आशा आहे की, यामधून भारतातील नेक्स्ट-जनरेशन तरूणांना राइडिंगचा आनंद शोधण्यासाठी आणि प्रत्येक प्रवासासोबत तुफानी वृत्ती जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.”

या जाहिरात व्‍‍यतिरिक्त थंडरव्हिल्स देशभरातील राइडिंग प्रेमींना त्यांच्या स्वतःच्या प्रवासाच्या कथा, साहस आणि आवड शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करून डिजिटल व सोशल प्लॅटफॉर्मवर संवादाला सुरुवात करेल, ज्यामुळे भारतात राइडिंग संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जाईल.

थंडरव्हिल्सच्या माध्यमातून थम्स अप आपला तुफानी वारसा पुढे नेणे सुरू ठेवत आहे, आणि एका वेळी एका राइडसह राइडिंगच्या थरारक जगाचा उत्सव साजरा करत त्याचा अनुभव दर्शवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button