यंदाची होळी व्हॉट्सॲपसोबत: अधिक रंगीत, अधिक जवळची!

News Service

होळी आली की सोबत येते ती रंगांची उधळण, अचानक ठरलेले प्लॅन्स, ग्रुप चॅट्सचा कल्ला आणि रंगात न्हाऊन निघालेल्या आठवणी. पार्टीचं प्लॅनिंग असो किंवा रंगात माखलेले सेल्फी शेअर करणं, या होळीच्या प्रत्येक क्षणात व्हॉट्सॲप तुम्हाला मित्र-परिवाराच्या अधिक जवळ ठेवेल.

व्हॉट्सॲपच्या मदतीने तुमची होळी अशी करा अधिक खास:

व्हॉईस चॅट (Voice Chat): मेसेजचा कटकट सोडागप्पांतून प्लॅनिंग करा!

होळीचं प्लॅनिंग करताना ग्रुपवर मेसेजचा पाऊस पडतोय? आता सारखं टाईप करण्याची गरज नाही. ग्रुपमध्ये Voice Chat सुरू करा आणि जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकजण त्यात सामील होऊ शकेल. जागा ठरवणं असो, गुजिया कोण आणणार हे ठरवणं असो किंवा गाण्यांची लिस्ट — कोणताही व्यत्यय न येता झटपट निर्णय घ्या.

म्युझिकसह स्टेटस (Status with Music): रंगांना देऊया सुरांची साथ

होळी फक्त डोळ्यांनी बघायची नसते, ती मनापासून अनुभवायची असते. तुमच्या लाडक्या रंगांच्या फोटोंना किंवा स्लो-मोशन व्हिडीओला Music Icon वापरून तुमच्या आवडत्या सणासुदीच्या गाण्याची जोड द्या. आता तुमचे मित्र तुमचं स्टेटस फक्त पाहणार नाहीत, तर त्या गाण्यावर तुमच्यासोबत थिरकतीलही!

शेड्युल कॉल्स (Schedule Calls): रंगांची उधळण होण्याआधीच भेटा!

होळीच्या दिवशी सगळे मित्र एकत्र येणार असतील, तर त्याचं नियोजन आधीच करा. व्हॉट्सॲपच्या Calls tab मध्ये जाऊन ‘+’ वर टॅप करा आणि Scheduled Call सेट करा. यामुळे वेळेवर सगळ्यांना नोटिफिकेशन मिळेल. जे लांब आहेत त्यांनाही या व्हिडीओ कॉलद्वारे उत्सवात सामील करून घेता येईल.

ग्रुप चॅट्स (Group Chats): सेलिब्रेशनची नवी पद्धत

आता तुमचे ग्रुप चॅट्स अधिक ‘स्मार्ट’ झाले आहेत. Member Tags वापरून ग्रुपमध्ये तुमची भूमिका ठरवा (उदा. होस्ट, डीजे किंवा स्नॅक्स-इन-चार्ज). एखाद्या मेसेजचा झटपट Text Sticker बनवा आणि Event Reminders सेट करा, जेणेकरून कोणीही पार्टी किंवा कॉल विसरणार नाही.

स्टेटसचे नवे अवतारप्रत्येक रंगाची वेगळी गोष्ट

तुमच्या होळीच्या आठवणी आता एका फोटोत मावणार नाहीत. Layout फीचर वापरून ६ फोटोंचा कोलाज बनवा किंवा आपल्या आवडत्या फोटोचा Photo Sticker तयार करा. इतकंच नाही, तर ‘Add Yours वापरून एक साखळी सुरू करा आणि तुमचे मित्र होळी कशी साजरी करत आहेत हे एकाच ठिकाणी पहा.

गल्लीतल्या सेलिब्रेशनपासून ते सातासमुद्रापार असलेल्या कुटुंबापर्यंत, होळी म्हणजे एकत्र येण्याचा सण. तुम्ही प्रत्यक्ष रंगात खेळत असाल किंवा स्क्रीनवरून शुभेच्छा देत असाल, व्हॉट्सॲप तुमच्या मदतीला सदैव आहे.

यंदाची होळीव्हॉट्सॲपच्या सोबतीने करा अधिक उजळअधिक बोलकी आणि अधिक रंगतदार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button