कमी व्होल्टेज तुमच्या खिशावर कसा भार टाकते

News Service

व्ही-गार्डचे संशोधन विजेची निकृष्ट गुणवत्ता तुमचे वीज बिल का वाढवते याचे स्‍पष्टीकरण देते:

·       स्लोमोशन‘ कूलिंग ट्रॅप: व्होल्टेज कमी असतो, तेव्हा एसीचा कॉम्प्रेसर पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. रेफ्रिजरंट गॅस पूर्ण वेगाने फिरवण्यासाठी त्याला पुरेशी विद्युत ऊर्जा मिळत नाही. परिणामी, स्थिर व्होल्टेजवर रूममध्‍ये कूलिंग निर्माण करण्‍यासाठी एसीला दुप्पट किंवा त्याहूनही अधिक वेळ लागतो.

·       वीज बिलाचा ५० टक्‍के अतिरिक्त दंड: एसीचा वाढलेला कार्यान्वित काळ प्रत्‍यक्ष तुमच्या वीज मीटरवर परिणाम करतो. कमी व्होल्टेजवर चालणारा एसी तुमचे सेट केलेले तापमान गाठण्यासाठी दोन ते तीन पट जास्त वेळ घेऊ शकतो आणि प्रत्येक अतिरिक्त मिनिटाचा खर्च तुमच्या खिशातून जातो. या अकार्यक्षमतेमुळे तुमच्या मासिक एसी बिलात जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होऊ शकते.

·       महाड्या उपकरणाचे छुपे नुकसान: कमी व्होल्टेजशी संघर्ष करताना एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते. कॉम्प्रेसर हा एसीमधील सर्वात महागडा भाग असून त्याची दुरुस्ती किंवा तो बदलणे अत्यंत खर्चिक असते. सातत्याने असे घडल्यामुळे मशिन आतून कमकुवत होते आणि मशिनचे आयुष्य अकाली संपते.

आधुनिक घरांसाठी विजेच्या गुणवत्तेची नवी व्याख्या

विद्युत पुरवठ्यातील या पद्धतशीर आव्हानांना तोंड देण्यासाठी व्ही-गार्डचे व्‍हीडब्‍ल्‍यूआर ४०० प्‍लस आणि व्‍हीडब्‍ल्‍यूआय ४०० सारखे उच्‍च-कार्यक्षमता असलेले स्टेबलायझर्स ग्रीड आणि अप्‍लायन्‍स यांच्यातील एक बौद्धिक दुवा म्हणून काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. अस्थिर वीज फिल्टर करून आणि सातत्यपूर्ण व्होल्टेज पुरवून ही यंत्रणा खालील गोष्टींची खात्री देते:

  1. कमी वीज बिल: मशिनला अधिक कष्ट करण्याऐवजी अधिक वेगाने आणि हुशारीने काम करण्यास मदत करून तुम्ही तुमच्या एसीच्या वीज खर्चात जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करू शकता.
  2. जलद कूलिंग: स्थानिक विद्युत पुरवठा कमकुवत असतो, अशा कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांतही रूममध्‍ये लवकर कूलिंग निर्माण होते.
  3. उपकरणाचे दीर्घ आयुष्य: कमी व्होल्टेजमुळे मशिनवर येणारा ताण टाळून तुम्ही तुमच्या एसीला बर्नआउट (जळणे किंवा बिघडणे) पासून वाचवता, ज्‍यामधून एसी अनेक वर्षे टिकण्‍याची खात्री मिळते.

ऊर्जा कार्यक्षमता हा शाश्वत जीवनशैलीचा मुख्य आधारस्तंभ बनत असताना व्ही-गार्डच्या या निष्कर्षांवरून स्पष्ट होते की, व्होल्टेज स्टेबलायझर आता फक्त दुय्यम साधन (अॅक्‍सेसरी) राहिलेले नाही, तर आर्थिक बचत आणि उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक साधन बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button