१०० हून अधिक उत्साही XSR155 रायडर्सचा सहभाग
स्वातंत्र्य, शोध आणि मोटरसायकल रायडिंगची आवड साजरी करत यामाहाची एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर मोहीम २,६०० किलोमीटरहून अधिक अंतर आणि वाटेतील प्रमुख ठिकाणे पार करून मुंबईत पोहोचली आहे.

इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि. ने आज आपल्या ऑल इंडिया ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचे मुंबईत आगमन झाल्याची घोषणा केली. देशभरातील शोध घेण्याची वृत्ती, एकता आणि मोटरसायकल रायडिंगच्या आवडीचा उत्सव साजरा करणाऱ्या या सातत्यपूर्ण ग्राहक-प्रवास उपक्रमातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. २ जून २०२६ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून सुरू झालेल्या या मोहिमेत रायडर्सनी २,६०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. आपल्या २१ दिवसांच्या आणि ६,००० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान त्यांनी श्रीनगर, अमृतसर, अत्तारी, लुधियाना, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद आणि दमण या प्रमुख ठिकाणांना भेट दिली आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी अशा एका प्रतीकात्मक प्रवासाच्या स्वरूपात आखण्यात आलेल्या या उपक्रमाचा देशातील रायडर्सना एकत्र आणण्याचा आणि भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यचा मनसुबा आहे. हा उपक्रम प्रदेश, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन मोटरसायकल रायडिंगमुळे निर्माण होणारा सामायिक बंध अधोरेखित करतो. साहसाची भावना अंगीकारून उत्साही रायडर्सद्वारे हा प्रवास केला जात आहे, ज्यामध्ये यामाहाची मॉडर्न-रेट्रो स्पोर्ट्स बाईक XSR155 त्यांच्या सोबतीला आहे. ही मोटरसायकल अभिजात (टाइमलेस) डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मेळ साधते.