टाटा मोटर्सने ईव्‍ही परिसंस्‍था दृढ केली: आता इलेक्ट्रिक एससीव्हीसाठी २५,००० पब्लिक चार्जर्स उपलब्‍ध

मुंबई, १५ सप्‍टेंबर २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज शून्‍य-उत्‍सर्जन गतीशीलेला चालना देण्‍यामध्‍ये मोठ्या टप्‍प्‍याची घोषणा केली, जेथे आता २५,००० हून अधिक पब्लिक चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करण्‍यात आले आहेत आणि इलेक्ट्रिक स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स (एससीव्‍ही)च्‍या ग्राहकांसाठी उपलब्‍ध आहेत. दिल्‍ली-एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, चेन्‍नई आणि हैदराबाद यासह १५० हून अधिक शहरांमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित हे चार्जर्स प्रमुख लॉजिस्टिक्‍स हब्‍समध्‍ये पसरलेले आहेत, तसेच सुधारित रेंज, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि अधिक उत्‍पन्‍नासह लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी ऑपरेटर्सना सक्षम करत आहेत.  चार्जिंग पायाभूत सुविधा विस्‍तारीकरणाला अधिक गती देण्‍यासाठी टाटा मोटर्सने १३ आघाडीच्‍या चार्जिंग पॉइण्‍ट ऑपरेटर्ससोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये आणखी २५,००० पब्लिक चार्जर्स स्‍थापित करण्‍यासोबत ऑपरेट करण्‍यात येतील. सर्व विद्यमान व आगामी चार्जर गंतव्‍य टाटा मोटर्सचे अत्‍याधुनिक कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजवर एकीकृत असण्‍यासह पाहायला मिळतील, ज्‍यामुळे ग्राहकांना रिअल-टाइम नेव्हिगेशन मिळेल आणि विनासायासपणे गंतव्‍य उपलब्‍ध होतील. ए प्‍लस चार्ज, अॅम्‍पव्‍होल्‍ट्स, चार्जएमओडी, चार्ज झोन, इलेक्ट्रिक फ्यूईल, एन्‍व्‍हो द सस्‍टेनर, ईव्‍ही स्‍पॉट चार्ज, काझम, निकोल ईव्‍ही, सोनिक मोबिलिटी, थंडरप्‍लस सोल्‍यूशन्‍स, वोल्‍टीक आणि झिऑन इलेक्ट्रिक यांच्‍यासोबत सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍यात आली आहे. याबाबत घोषणा करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या एससीव्‍हीपीयूचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हल्‍डर म्‍हणाले, “२५,००० पब्लिक चार्जिंग स्‍टेशनचा टप्‍पा पार करणे इलेक्ट्रिक कार्गो गतीशीलता आणि त्‍यांच्‍या सक्षम परिसंस्‍थेला गती देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे. आधीच १०,००० हून अधिक ऐस ईव्‍ही तैनात करण्‍यासोबत एकूण ६ कोटी किमीहून अधिक अंतर पार केले असल्‍याने आम्‍हाला ग्राहक व वाहतूकदारांचा चार-चाकी इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍सचा वापर करण्‍याच्‍या फायद्यांमध्‍ये वाढता आत्‍मविश्वास दिसून येत आहे. आमच्‍या नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या ऐस प्रो ईव्‍हीला प्रगत क्षमतांसाठी पसंती मिळत आहे, जी शहरी व अर्ध-शहरी कार्गो उपयोजनांमध्‍ये ग्राहकांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.”  “आम्‍ही नाविन्‍यता आणण्‍यासोबत विश्वसनीय, उच्‍च-कार्यक्षम ई-कार्गो वेईकल्‍स वितरित करत असताना धोरणात्‍मक सहयोगांच्‍या माध्‍यमातून पायाभूत सुविधा उपलब्‍धता वाढवण्‍यावर तितकेच लक्ष केंद्रित करत आहोत. भारतातील आघाडीच्‍या चार्जिंग पॉइण्‍ट ऑपरेटर्ससोबतच्‍या या सहयोगामधून प्रबळ सपोर्ट नेटवर्क निर्माण करण्‍याप्रती आणि देशभरातील उद्योजक व वाहतूकदारांसाठी लाभदायी, शून्‍य-उत्‍सर्जन लॉजिस्टिक्‍स सक्षम करण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते.”   टाटा मोटर्सच्‍या ई-एससीव्‍ही लाइनअपमध्‍ये सध्‍या ऐस प्रो ईव्‍ही, ऐस ईव्‍ही आणि ऐस ईव्‍ही १००० चा समावेश आहे. प्रत्‍येक वेईकल विविध शहरी व अर्ध-शहरी भागांमधील कार्गो आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. सर्व टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहने विविध लोड डेक कन्फिग्‍युरेशन्‍स व पेलोड पर्यायांसह येतात, ज्‍यामधून विविध व्‍यवसाय उपयोजनांसाठी स्थिरतेची खात्री मिळते. विश्वसनीयता व कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या वेईकल्‍सची आव्‍हानात्‍मक प्रदेशांमध्‍ये आणि ऑपरेटिंग स्थितींमध्‍ये प्रखरपणे चाचणी करण्‍यात आली आहे.  उच्‍च अपटाइम व जलद टर्नअराऊंडसाठी टाटा मोटर्सने संपूर्ण भारतात २०० हून अधिक समर्पित ईव्‍ही सपोर्ट केंद्रे देखील स्‍थापित केली आहेत, ज्‍यामधून त्‍यांच्‍या वाढत्‍या ग्राहकवर्गाला विश्वासार्ह सेवा आणि टेक्निकल साह्य मिळते.   

क्लीअरट्रिपकडून बिग बिलियन डे २०२५ पूर्वी उद्योगामधील पहिले व्हिसा डिनायल कव्‍हर लाँच

अतिरिक्‍त फायद्यांमध्‍ये ८०,००० हून अधिक मालमत्तांच्‍या हॉटेल पोर्टफोलिओची उपलब्‍धता, फ्लाइट्ससाठी फ्लॅश सेल्‍स आणि ‘चाइल्‍ड फ्लाइज फ्री’…

टाटा मोटर्सकडून स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप्‍सवर सर्वात मोठ्या बोनान्‍झाची घोषणा

जीएसटी कपातीसोबत ब्‍लॉकबस्‍टर मोहिम ‘इस त्‍योहार पे उपहार’ लाँचएस प्रोची किंमत आता फक्‍त Rs. 3.67 लाख…

खलासीला मिळालेल्‍या अद्भुत यशानंतर आदित्‍य गढवी यंदा सणासुदीच्‍या काळात कोक स्‍टुडिओ भारतमध्‍ये घेऊन येत आहे ‘मीठा खारा’

‘मीठा खारा’ गुजरातमधील आगरिया समुदायाला संगीतमय मानवंदना आहे राष्‍ट्रीय, सप्‍टेंबर 2025: कोक स्‍टुडिओ भारत या भारताच्‍या…

भारतातील महिलांच्‍या हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्‍या

कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी) हा आजार बहुतेकदा पुरुषांना प्रामुख्याने प्रभावित करणारा आजार मानला जातो. प्रत्यक्षात, महिलांना…

यामाहा ग्राहकांना दुचाकी श्रेणीवर संपूर्ण जीएसटी दर कपातीचे फायदे देणार

चेन्‍नई, 10 सप्‍टेंबर 2025: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांसाठी…

सॅमसंगकडून रिडिझाइन केलेला एस पेन आणि गॅलेक्‍सी टॅब एस११ सिरीज लॉंच

गुरूग्राम, भारत – सप्‍टेंबर ८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलेक्‍सी…

कोटक कन्या शिष्यवृत्तीसह सामील व्हा ब्रेन लीग मध्ये – जिथे NIRF च्या उत्कृष्ट विद्वानांना मिळतात असीम शक्यता

9 सप्टेंबर 2025: कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), जो कोटक महिंद्रा ग्रुपचा सीएसआर अंमलबजावणी करणारा विभाग आहे,…

नोकरी घोटाळ्यांमध्ये वाढ रोखण्यासाठी लिंक्डइनने नवीन पडताळणी वैशिष्ट्ये सादर केली

भारत, सप्‍टेंबर ८, २०२५: भारतातील रोजगार बाजारपेठ जगातील सर्वात झपाट्याने विकसित होणारी आणि सर्वात डिजिटल आहे.…

अॅजिलेंट टेक्‍नॉलॉजीज आणि आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्‍स यांनी भारतातील अन्‍न सुरक्षा परिसंस्‍था मजबूत करण्‍यासाठी धोरणात्‍मक सहयोग

पुणे, भारत – सप्‍टेंबर ८, २०२५ – अॅजिलेंट टेक्‍नॉलॉजीज इंडिया आणि आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्‍स (एनआरसीजी), पुणे यांनी त्‍यांच्‍या सहयोगाच्‍या पुढील टप्‍प्‍याची घोषणा केली आहे, ज्‍याचा प्रगत विश्‍लेषणात्‍मक विज्ञान आणि नियामक सहभागाच्‍या माध्‍यमातून भारतताील अन्‍न सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमामुळे द्राक्षांचा विश्वासार्ह जागतिक निर्यातदार म्हणून भारताचे स्थान अधिक दृढ होईल आणि गुणवत्ता हमीमध्ये पारदर्शकता व विश्वास वाढवून नवीन बाजारपेठेत संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. भारतातून कृषी निर्यात वाढत असताना विश्वासार्ह, विकासात्‍मक आणि नियमन पालन करणाऱ्या अन्‍न चाचणी उपायांची मागणी वाढली आहे. अॅजिलेंट व एनआरसीजी सहयोगाने कीटकनाशकांचे अवशेष आणि धुराच्या विश्‍लेषणासाठी लक्ष्यित कार्यप्रवाह विकसित करून प्रतिसाद देत आहेत, ज्यामध्ये शाश्वतता, अचूकता आणि जागतिक नियामक संरेखन यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रयोगशाळा व भागधारकांना विकसित होत असलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यास आणि भारतातील अन्‍न पुरवठा साखळीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास पाठिंबा देण्‍यासाठी हे प्रयत्‍न करण्‍यात आले आहेत.  हा सहयोग वैज्ञानिक आणि नियामक समुदायासोबत दृढ संबंध निर्माण करण्यासाठी व्यासपीठ म्हणून देखील काम करेल. संयुक्‍त कार्यशाळा, वेबिनार व तांत्रिक प्रकाशनांच्‍या माध्‍यमातून अॅजिलेंट आणि एनआरसीजी यांचा माहितीची देवाणघेवाण वाढवण्‍याचा, तसेच विश्‍लेषणात्‍मक चाचणीमध्‍ये सर्वोत्तम पद्धतींना चालना देण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमांमुळे अन्‍न सुरक्षा व्यावसायिकांमध्ये क्षमता निर्माण होण्यास मदत होईल आणि सरकारी व व्यावसायिक प्रयोगशाळांमध्ये प्रमाणित पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळेल. भारतातील कंट्री जनरल मॅनेजर, अॅजिलेंट टेक्‍नॉलॉजीज नंदकुमार कलाथिल म्‍हणाले, “आम्‍हाला एनआरसीजीसोबत आमचा सहयोग वाढवण्‍याचा आणि स्थिर, भविष्‍यासाठी सुसज्‍ज अन्‍न सुरक्षा यंत्रणांच्‍या विकासाप्रती योगदान देण्‍याचा अभिमान वाटतो. हा सहयोग फक्‍त तंत्रज्ञानासाठी नाही तर विश्वास निर्माण करण्‍यासाठी आहे, ज्‍यामुळे परिवर्तनाला गती मिळेल आणि सुरक्षित अन्‍न उत्‍पादनामध्‍ये जागतिक प्रमुख म्‍हणून भारताच्‍या भूमिकेला पाठिंबा मिळेल.”  आयसीएआर-एनआरसीजीचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी म्‍हणाले, “या सहयोगामधून भारतात अन्‍न सुरक्षा मानक वाढवण्‍याप्रती आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो. अॅजिलेंटच्‍या तंत्रज्ञान क्षमता आणि एनआरसीजीच्‍या संशोधन नेतृत्‍वाला एकत्र करत आम्‍ही आराखडा तयार करत आहोत, जो नाविन्‍यता, नियामक अनुपालन आणि भागधारक सक्षमीकरणाला पाठिंबा देतो.”  पूर्वी मिळालेल्‍या यशाच्‍या आधारावर हा नवीन सहयोग करण्‍यात आला आहे आणि अन्‍न चाचणीमध्‍ये मोठ्या प्रभावाला चालना देण्‍याप्रती समान कटिबद्धता अधिक दृढ करतो. धोरणावरून अंमलबजावणीकडे वाटचाल करत अॅजिलेंट आणि एनआरसीजी यांनी निष्‍पत्ती वितरित करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्‍यामधून खाद्य उद्योग, नियामक व ग्राहकांना फायदा होईल. वैज्ञानिक दृढता व व्‍यावहारिक अंमलब‍जबावणीला एकत्र करत या सहयोगाचा भारतातील अन्‍न सुरक्षेच्‍या भविष्‍याला आकार देण्‍याचा मनसुबा आहे.

error: Content is protected !!
Call Now Button