आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाकडून महाराष्ट्रात विस्तार करत ठाणे येथे पहिले स्टोअर सुरू

News Service

ठाणे पश्चिम येथील लेक शोअर मॉलमध्‍ये स्थित नवीन इंद्रिया स्टोअरमध्‍ये वधू, सण-उत्सव, समकालीन आणि रोजच्या वापराच्या कलेक्शनमधील ३२,००० हून अधिक दागिन्यांचे डिझाइन्स उपलब्ध

मुंबई, १० जुलै २०२६: आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने ठाणे येथे आपले पहिले स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील वाढती उपस्थिती अधिक दृढ केली आहे. या लाँचसह दागिन्यांची विशेष आवड असलेल्या, सण-उत्सवांच्या खरेदीला प्राधान्य देणाऱ्या आणि डिझाइन-आधारित रिटेल अनुभवांकडे आकर्षित होणाऱ्या उच्च-विकसित शहरी बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे इंद्रियाचे धोरण अधिक दृढ झाले आहे.

ठाणे पश्चिमेतील प्रमुख रिटेल केंद्र लेक शोअर मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोक्याच्या ठिकाणी हे स्टोअर सुरू करण्यात आले आहे. हे स्टोअर ग्राहकांना दागिन्यांचा विलोभनीय आणि ग्राहक-केंद्रित अनुभव मिळावा यासाठी अत्यंत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. समृद्ध महाराष्ट्रीयन वारसा आणि आधुनिक शहरी आकांक्षा यांचा सुरेख संगम साधणारे शहर म्हणून ठाण्याची ओळख बऱ्याच काळापासून आहे आणि येथे चोखंदळ व वैविध्यपूर्ण ग्राहक वर्ग राहतो. प्रिमियम लाईफस्टाईल आणि रिटेल केंद्र म्हणून नावारूपास येत असलेला लेक शोअर मॉल इंद्रियाचा हा खास अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी योग्य जागा आहे. या मॉलचे मोक्याचे ठिकाण, आसपास राहणारी कुटुंबे, व्यावसायिक व उद्योजक यांचा मोठा वर्ग आणि प्रमुख निवासी भागांशी असलेली जवळीक यामुळे दर्जेदार खरेदीचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

या स्टोअरच्या माध्यमातून इंद्रियाचे उद्दिष्ट शहरातील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी पूर्ण करण्याचे आहे. यासाठी येथे सण-उत्सव, जीवनातील महत्त्वाचे टप्पे आणि दैनंदिन फॅशनसाठी खास डिझाइन केलेले सोने, हिरे आणि पोल्की दागिन्यांचे ३२,००० पेक्षा जास्त डिझाइन्सचे उत्कृष्ट कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. इंद्रियाचे डिझाइनला प्रथम प्राधान्य देण्याचे तत्त्वज्ञान अधोरेखित करत हे स्टोअर पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक सौंदर्यशास्त्र यांचा सुरेख संगम घडवून आणते. तसेच, स्टोअरमधील कारागिरी रूम सारख्या खास जागा व्यक्ती व कुटुंबीयांना खरेदीचा आगळावेगळा आणि संस्मरणीय अनुभव देतात.

या नव्या स्टोअरच्या लाँचसह इंद्रियाने पश्चिम भारतात आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे, जिथे दागिन्यांचा व्‍यापक पोर्टफोलिओ आणि वैशिष्ट्यपूर्ण इन-स्टोअर अनुभव शहरामधील ग्राहकांच्या जवळ आणला आहे.

या प्रसंगी मत व्‍यक्त करत इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्हणाले, “वेगाने वाढणारी शहरी लोकसंख्या, वाढत्या आकांक्षा आणि डिझाइन-आधारित, प्रीमियम रिटेल अनुभवांबद्दलची प्रचंड ओढ यांमुळे ठाणे महाराष्ट्रातील सर्वात गतिमान आणि वेगाने वाढणारी ज्वेलरी बाजारपेठ आहे. याच कारणामुळे ठाणे केवळ मुंबईचा विस्तार न राहता स्वतःच्या बळावर परिपक्व रिटेल बाजारपेठबनले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्र म्हणून या शहराचा वेगाने विकास होत असताना उत्कृष्ट कारागिरी, डिझाइनचे व्‍यापक पर्याय आणि दागिन्यांच्या खरेदीचा उच्च दर्जाचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांची सेवा करण्याची मोठी क्षमता आम्हाला येथे दिसते. ठाण्यातील आमच्‍या या पहिल्‍या स्‍टोअरमधून उच्च विकास क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याचे आणि विचारपूर्वक डिझाइन केलेल्या रिटेल केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक दागिन्यांचा अनुभव जवळ आणण्याचे इंद्रियाचे धोरणात्मक उद्दिष्ट दिसून येते.”

इंद्रिया संपूर्ण भारतात आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार करत असताना विचारपूर्वक तयार केलेल्या जागा, आधुनिक कारागिरी आणि दागिन्यांच्या उत्कृष्ट अनुभवांच्या माध्यमातून ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते जोडण्याच्या ब्रँडच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र हे नेहमी केंद्रस्थानी राहिले आहे. ठाणे पश्चिम येथील हे नवीन स्टोअर प्रत्येक खरेदीमध्ये डिझाइन, भावना आणि स्वतःची स्वतंत्र ओळख शोधणाऱ्या भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी हक्‍काचे ज्वेलरी डेस्टिनेशन बनण्याच्या इंद्रियाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button