मुंबई, २६ मे २०२६: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ही महारत्न ऑइल मार्केटिंग कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी…
Category: Marathi
माझा® ची ५० वर्षे: बाटलीमधील फ्लेवरच्या माध्यमातून भारतातील व्यक्तींच्या आंब्यावरील अतूट प्रेमाचा सन्मान
राष्ट्रीय, मे २०, २०२६: कोका-कोला इंडिया भारतातील व्यक्तींना आंब्याची अस्सल चव देणाऱ्या माझा® च्या ५० वर्षांचा…
कोक स्टुडिओ भारतने ‘कचौडी गली’मधून पत्नीच्या नजरेतून मांडली एका विस्मरणात गेलेल्या युद्धाची कथा
राष्ट्रीय, मे २०, २०२६: कोक स्टुडिओ भारत आपल्या सीझन ४ मधील तिसऱ्या गाण्यासह परत आला आहे.…
टाटा मोटर्स फाउंडेशनचा इंटीग्रेटेड व्हिलेज डेव्हलमेंट प्रोग्राम देशभरातील जवळपास २०० गावांपर्यंत पोहोचला
सरकारी भागीदारी आणि कल्याणकारी योजनांच्या समन्वयातून स्वायत्त ग्रामीण मॉडेलचा विस्तार करण्यात आला आहे मुंबई, मे 20,…
लिंक्डइनने २०२६ मध्ये करिअरच्या वाढीसाठी जाहीर केल्या मुंबईतील टॉप कंपन्या
या यादीमध्ये वित्त, उत्पादन आणि मनोरंजन या क्षेत्रांमधील कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामधून या शहराचे वैविध्यपूर्ण प्रोफेशनल…
जीई एरोस्पेसकडून पुणे प्लांटमध्ये १०० कोटींची गुंतवणूक
भारतातील उत्पादन क्षमतेचा विस्तार वेगवान करणार पुणे, भारत, मे १८, २०२६: जीई एरोस्पेसने आज आपल्या पुणे…
एआयमुळे ‘पोर्टफोलिओ करिअर’मध्ये वाढ होत असल्याने भारतात ‘फाउंडर’ (संस्थापक) प्रोफाइलमध्ये १०४ टक्के वाढ
भारत, १२ मे २०२६: जागतिक स्तरावर उद्योजकता बदलत आहे, याचे भारत एक प्रमुख उदाहरण म्हणून समोर…
इंडियन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडस्ट्रीने आर्थिक वर्ष २६ मध्ये स्थिरता दाखवली
निर्यातीत ३१.५ टक्के वाढ, पायाभूत सुविधांच्या कामातील संथ गतीमुळे देशांतर्गत मागणीत ७ टक्के घट नवी दिल्ली,…
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्रामची २२००विद्यार्थ्यांपर्यंत वाढ, कम्प्युटर सायन्स मधील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ५०० नवीन शिष्यवृत्तींची घोषणा
बंगळुरु, भारत, २९ एप्रिल २०२६– आज ॲमेझॉन तर्फे २०२६ साठी ५०० नवीन शिष्यवृत्तींची घोषणा त्यांच्या भारतातील ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर (एएफइ) कार्यक्रमा अंतर्गत सुरु करत असल्याची घोषणा केली. या अंतर्गत इंजिनियरींग क्षेत्रात शिक्षण घेणार्या अल्प उत्पन्न गटातील महिला विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करियरच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर (एएफई) हा ॲमेझॉनचा जागतिक शिक्षण कार्यकम असून याचे डिझाईन तंत्रज्ञान शिक्षणासह करियरच्या क्षेत्राची उपलब्धता वाढवण्यासाठी करण्यात आले आहे. या वाढी मुळे सध्या हा उपक्रम २००० कार्यरत अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहे. एएफई शिष्यवृत्ती ही अल्प उत्पन्न गटातील महिला विद्यार्थिनींना कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित शाखांमध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी घेत असताना चार वर्षांमध्ये २ लाख रुपयांची ची आर्थिक मदत प्रदान करते. आर्थिक सहाय्या सह, शिष्यवृत्तीधारकांना लॅपटॉप, बूटकॅम्पद्वारे तांत्रिक प्रशिक्षण, ॲमेझॉन विमेन ऑफ दी वर्ल्ड (डब्ल्यूओडब्ल्यू) कडून वेबिनार, ॲमेझॉन इंजिनियर्स कडून वन ऑन वन मार्गदर्शन, आणि दुसऱ्या वर्षानंतर ॲमेझॉन मध्ये आठ आठवड्यांच्या सशुल्क इंटर्नशिपच्या संधी मिळतात. “प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी मिळायला हवी. ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर शिष्यवृत्तीद्वारे आम्ही त्या नेत्यांमध्ये गुंतवणूक करत आहोत, हेच भारतातील विविध स्तरांवरील कुशाग्र आणि उत्तम विद्यार्थी इंजिनियर्स भविष्यातील कामकाजाची दिशा ठरवतील.” ॲमेझॉन ईएक्सपिरियन्सेस आणि अपस्किलिंग च्या उपाध्यक्षा/उपाध्यक्ष कँडी कॅसलबेरी म्हणाले. “ २०२६ च्या शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांनी दाखवून दिले आहे की जेव्हा आपण एकत्र येऊन कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करतो आणि तरुणाच्या स्वप्नांमधील अडथळे दूर करतो, तेव्हा अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.” पहिल्या टुगेदर इंडिया समिट मध्ये घोषणा केल्यानंतर असे दिसून आले की ॲमेझॉन ने नेहमीच भविष्यासाठी तयार तंत्रज्ञानामध्ये करियर निर्माण करण्याच्या दिशेने शिक्षण देण्याचे मार्ग खुले केले आहेत. इंटर्नल समिटचा एक भाग म्हणून ॲमेझॉन तर्फे कर्मचार्यांना वाढ करणे, सातत्याने जोडणी ही कौशल्य विकास, कामाच्या ठिकाणचे सहमार्य आणि समाजाभिमुखता यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या फ्रेमवर्कचा एक भाग म्हणून या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, ग्राहक, समाज, भागीदार आणि व्यावसायिकांना ॲमेझॉन करता नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळत आहे. पहिल्या तुकडीच्या पदवी सह ८९ टक्के प्लेसमेंटचा दर २०२२ मध्ये २०० विद्यार्थ्यांसह सुरू झालेला हा कार्यक्रम दरवर्षी लक्षणीयरीत्या विस्तारला आहे, २०२३ पासून दरवर्षी ५०० शिष्यवृत्तींपर्यंत वाढला आहे. विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक गरज आणि नेतृत्व क्षमता यांचे मूल्यमापन करणाऱ्या कठोर प्रक्रियेद्वारे केली जाते. २०२५ मधील कार्यक्रमाच्या पहिल्या पदवीधर गटाने ८९% प्लेसमेंट दर साध्य केला आहे, ज्यामध्ये पदवीधरांनी ॲमेझॉन सह फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. आजपर्यंत सुमारे ४०० शिष्यांनी ॲमेझॉन मध्ये विविध तंत्रज्ञानाशी संबंधित भूमिकांमध्ये इंटर्नशिप पूर्ण केल्या आहेत आणि नवीन गट पात्र होत असताना येत्या काही महिन्यांत शेकडो इतर विद्यार्थी इंटर्नशिप सुरू करण्यास सज्ज आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील प्रथमच पदवी घेतलेले असल्यामुळे यांतून या कार्यक्रमाची भारतातील अतिथय दुर्गम भागातील पोहोच अधोरेखित होते. तेलंगाणाची श्रेया मुला आता सॉफ्टेवेअर डेव्हलमेंट इंजिनियर, आंध्र प्रदेशची किर्ती संकारा, क्लाऊड सपोर्ट असोसिएट तर महाराष्ट्रातील नागपूरची अंजली अष्टके ही डॉईश बँक मध्ये ग्रॅज्युएट ॲनेलिस्ट म्हणून कार्यरत आहेत, या काही उदाहरणांमधून ज्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात करियर केल्याचे दिसून येते व या कार्यक्रमाचा दीर्घकालीन संधींसाठी कसा उपायोग होतो हे अधोरेखित होते. सरकारी शाळांमधील ४.८ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच ॲमेझॉन ने २०२२ पासून एएफई कार्यक्रमात अंदाजे ५० कोटी रुपये (अंदाजे ६ दशलक्ष यूएसडी)ची गुंतवणूक केली आहे, यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण मुलींसाठी शिष्यवृत्तीपासून करिअरपर्यंतचा सुयोग्य मार्ग तयार करण्यात आला आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम फाऊन्डेशन फॉर एक्सेलन्स यांच्या भागीदारीत राबवला जातो, तर नवगुरुकूल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यास आणि इंटर्नशिपसाठी तयार होण्यास मदत करते. इंजिनियरींग शिष्यवृत्तीं बरोबरच , हा कार्यक्रम २०२१ ते २०२५ दरम्यान भारतातील ५०,००० पेक्षा जास्त शासकीय शाळांमधील ४.८ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, आणि त्यांना कम्प्युटर सायन्स आणि एआयचे शिक्षण प्रदान केले आहे.
क्लीअरट्रिपचा आयआरसीटीसीसोबत सहयोगासह रेल्वे बुकिंग क्षेत्रात विस्तार
या लाँचसह, फ्लिपकार्ट ग्रुपमधील या कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार केला आहे, तसेच आता यात विमान, हॉटेल्स, रेल्वे, बसेस आणि हॉलिडे पॅकेजेसचा समावेश झाला आहे राष्ट्रीय, एप्रिल, २०२६: क्लीअरट्रिप या फ्लिपकार्ट ग्रुपमधील कंपनी आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आज भारतीय रेल्वेची अधिकृत तिकीट संस्था इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सोबत सहयोगाने रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली. आयआरसीटीसीच्या प्रबळ पायाभूत सुविधांचा लाभ घेत हे एकत्रीकरण मोठ्या प्रमाणावर विश्वासार्हता आणि सुलभ, वापरकर्ता-अनुकूल अनुभव प्रदान करते. क्लीअरट्रिप आता वापरकर्त्यांना त्यांच्या रेल्वे प्रवासाचा शोध घेणे, बुकिंग करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे या सर्व गोष्टी अॅपमध्येच सहजपणे करण्याची सुविधा देईल. एकीकृत, मल्टी–मोडल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या लाँचसह, प्रवासी रेल्वे मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जनरल आणि तत्काळ कोट्यासह भारतातील सर्व मार्गांवरील रेल्वे तिकिटे बुक करू शकतील. तसेच रिअल–टाइम सीट उपलब्धता, भाड्याची माहिती, पीएनआर स्टेटस ट्रॅकिंग, बर्थ पसंती आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट यांसारख्या आवश्यक सेवा एकाच सहज सोप्या इंटरफेसमध्ये उपलब्ध होतील. क्लीअरट्रिपच्या चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर मंजरी सिंघाल म्हणाल्या, “रेल्वे प्रवास हा भारताच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे आणि हे लाँच आमच्या एकीकृत, मल्टी-मोडल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म बनण्याच्या दृष्टीकोनाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आयआरसीटीसीसोबत सहयोगाने आम्ही बुकिंगचा अनुभव सोपा करण्यावर आणि लाखो प्रवाशांसाठी अधिक सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.” क्लीअरट्रिपच्या एअर विभागाचे चीफ बिझनेस ऑफिसर गौरव पटवारी म्हणाले, “दरवर्षी ८० कोटींहून अधिक आरक्षित प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे ही संधी फक्त विकासाबद्दल नाही तर एक वेगळा आणि दर्जेदार अनुभव देण्याबद्दल आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर सुलभ बुकिंग अनुभव, भविष्यातील कल ओळखणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तिकृत सेवांचा समावेश करून आम्ही खात्री घेत आहोत की, तिकीट शोधण्यापासून ते बुकिंगनंतरच्या पाठिंब्यापर्यंत प्रत्येक पायरी जलद, विश्वसनीय आणि तणावमुक्त असेल.” भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात गुंतागुंतीची यंत्रणा आहे, जी दररोज २३ दशलक्ष आणि वर्षाला ७ बिलियन प्रवाशांना सेवा देते, ज्यामुळे हे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या परिवहन यंत्रणांपैकी एक बनले आहे. रेल्वे बुकिंगचा आपल्या सेवांमध्ये समावेश करून या व्यापक मागणीचा लाभ घेण्याचे क्लीअरट्रिपचे उद्दिष्ट आहे. कंपनी लवकर ही सेवा आपल्या वेब प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मोबाईल आणि वेब दोन्हीवर विनासायास अनुभव मिळेल.