मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगी ची भागीदारी

या धोरणात्मक भागीदारीमुळे स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे आता दैनंदिन जीवनातही मिळणार Mumbai, 10th March…

ॲमेझॉन इंडिया ने केला आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर सहकार्य करार, सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलां मध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत

बंगळुरु, ६ मार्च २०२६– आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ चे औचित्य साधून ॲमेझॉन इंडिया तर्फे आज आर्मी विमेन्स वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए)  बरोबर सहकार्य करार (एमओयू) करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून या कराराअंतर्गत सैन्यदलातील कुटुंबिय असलेल्या महिला सदस्यांमधील व्यावसायिकतेची संधी देण्यात येणार आहे. या सहकार्य कराराची घोषणा त्यांच्या एलिव्हेटही कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आली असून या अंतर्गत एडब्ल्यूडब्ल्यूए च्या नोंदणीकृत महिलांना मदत करण्यात येणार असून यामध्ये सैन्यदलातील व्यक्तींच्या पत्नी, माजी सैनिकांच्या पत्नी, वरी नारी आणि विधवांचा समावेश आहे. या अंतर्गत ॲमेझॉन.इन तर्फे २०२९ पर्यंत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी ‍दिली जाणार आहे. या सहकार्य करारा अंतर्गत ॲमेझॉन च्या स्तरीय ऑन बोर्डिंग आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ईकॉमर्स आणि मार्केटप्लेसच्या सर्वोत्कृष्ट गोष्टींचा परिचय करुन दिला जाणार आहे.  एचडब्ल्यूडब्ल्यूए च्या व्यावसायिकांना आता ॲमेझॉन फुलफिलमेंट आणि वाहतूक नेटवर्क सह त्यांची उत्पादने ही ॲमेझॉन सहेली  स्टोअरफ्रंटवर दिसणार आहेत.  त्याच बरोबर सैन्यदलाच्या परिवारातील महिलांना आता शाश्वत व्यवसाय वृध्दी सह देशभरांतील कोट्यावधी ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळणार आहे. ॲमेझॉन सहेली प्रोग्राम अंतर्गत जे व्यावसायिक जोडले जातात अशा व्यावसायिकांना संरचनात्मक ऑनबोर्डींग आणि सातत्यपूर्ण सहकार्य मिळते, ज्यामुळे ते ॲमेझॉन.इन वर त्यांचा व्यवसाय निर्माण करु शकतील.  ऑनलाईन विक्रीसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये मालाचे व्यवस्थापन आणि ग्राहकांना समृध्द अनुभव देणे इत्यादींचा समावेश आहे.  त्याच बरोबर या कार्यक्रमाअंतर्गत उत्पादनाची फोटोग्राफी आणि कॅटलॉगिंगसाठी सहकार्य, ॲनेलिटीकल टुल्स आणि बिझनेस रिपोर्ट्स तयार करण्यापर्यंत सहकार्य केले जाते, ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील.  एकत्रितपणे या क्षमतांमुळे महिला व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनातील नाविन्य आणि त्यांचा ब्रॅन्ड सक्षम करण्यावर लक्ष देणे सोपे जाते. एडब्ल्यूडबल्यूए च्या अध्यक्षा श्रीमती सुनिता द्विवेदी यांनी सांगितले “ ॲमेझॉन बरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत आणि आमच्या सदस्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासात शाश्वत आणि योग्य प्रमाणात व्यवसाय करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल.  आमच्या या सहकार्य करारामुळे सैनिकांच्या परिवारातील महिला सदस्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील.  आंम्हाला आशा आहे की या भागीदारी मुळे त्यांचा व्यावसायिक प्रवास त्या अधिक आत्मविश्वासाने सुरु करुन संपूर्ण देशभरांतील ग्राहकांबरोबर त्या जोडल्या जातील.” दिप्ती वर्मा, व्हाईस प्रेसिडेंट, पीएक्सटी, ॲमेझॉन स्टोअर्स इंडिया, जपान ॲन्ड इमर्जिंग मार्केटस, यांच्या मते एडब्ल्यूडब्ल्यूए बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे, यामुळे व्यवसाय करु इच्छिणार्‍या सैनिकांच्या कुटुंबातील महिलांना संधी मिळू शकेल.  ॲमेझॉन मध्ये आम्ही नेहमीच बाजारपेठांची उपलब्धता करुन देणे आणि शाश्वत ऑनलाईन व्यवसायाची बांधणी करुन देण्यासाठी वचनबध्द आहोत.  या भागीदारीमुळे महिला व्यावसायिकांना ॲमेझॉन.इन चा वापर करु शकतील आणि त्यासह संरचनात्मक ऑनबोर्डींग सह ॲमेझॉन.इन वर त्यांचा व्यवसाय स्थापन करुन वाढण्यास मदत होईल.”  एलिव्हेटहर २०२६ विषयी अधिक माहिती :  एलिव्हेटहर २०२६ च्या माध्यमातून महिला व्यावसायिकांसह नेत्यांना त्यांच्या करियर वाढीविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहीत केले जाते.  ॲमेझॉन लीडर्स कडून १५० हून अधिक सहभागी होणार्‍या छोट्या ग्रुप्स ना एआय,फिनटेक आणि नवीन तंत्रज्ञाना विषयी प्रत्यक्ष ज्ञान देऊन वाढीच्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.   या उपक्रमामध्ये फायरसाईड चॅट चा समावेश असून ‘नेव्हिगेटिंग करियर रिझेलियन्स’ या विषयावर प्रसिध्द पटकथा लेखिका आणि कलाकार कल्की कोलेचिन आणि दिप्ती वर्मा यांच्यासह फिनटेक व्यावसायिक अली हाजिआनी (दॅड क्रेडिटकार्डगाय) यांच्या कार्यशाळांचा समावेश आहे.

भारतातील १० पैकी ९ कामकाजी महिला आत्‍मविश्वासाने कामाच्‍या ठिकाणी एआयचा वापर करत आहेत, पुरूषांच्‍या तुलनेत महिला आघाडीवर: लिंक्‍डइन

भारत, ६ मार्च २०२६: एआयमुळे कामाच्‍या स्‍वरूपामध्‍ये बदल होत असताना जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन…

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया; ४४% ब्रँड बदलण्यास तयार: सर्विसनाऊ अहवाल

भारत, मार्च ५, २०२६: ग्राहकांच्‍या वाढत्‍या अपेक्षा, विखुरलेले सेवा प्‍लॅटफॉर्म्‍स आणि सहानुभूतीचा अभाव हे भारतातील ग्राहक…

महाराष्ट्र स्ट्रोक समिट ने स्ट्रोक केयर को मजबूत करने और मरीज़ों के नतीजों को बेहतर बनाने के लिए रोडमैप तैयार किया

मुंबई, 6 मार्च,2026: महाराष्ट्र में बढ़ते स्ट्रोक के मामलों को देखते हुए राज्य में बेहतर और…

विम्यासंदर्भातील सर्व कामे आता व्हॉट्सॲपवर: मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवण्याइतकंच सोपं!

विमा (Insurance) काढणं किंवा त्याचं नूतनीकरण करणं म्हटलं की डोळ्यांसमोर कागदपत्रांचे ढीग आणि चकरा मारणं येतं.…

यंदाची होळी व्हॉट्सॲपसोबत: अधिक रंगीत, अधिक जवळची!

होळी आली की सोबत येते ती रंगांची उधळण, अचानक ठरलेले प्लॅन्स, ग्रुप चॅट्सचा कल्ला आणि रंगात न्हाऊन निघालेल्या आठवणी. पार्टीचं प्लॅनिंग असो किंवा रंगात माखलेले सेल्फी शेअर करणं, या होळीच्या प्रत्येक क्षणात व्हॉट्सॲप तुम्हाला मित्र-परिवाराच्या अधिक जवळ ठेवेल. व्हॉट्सॲपच्या मदतीने तुमची होळी अशी करा अधिक खास: व्हॉईस चॅट (Voice Chat): मेसेजचा कटकट सोडा, गप्पांतून प्लॅनिंग करा! होळीचं प्लॅनिंग करताना ग्रुपवर मेसेजचा पाऊस पडतोय? आता सारखं टाईप करण्याची गरज नाही. ग्रुपमध्ये Voice Chat सुरू करा आणि जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकजण त्यात सामील होऊ शकेल. जागा ठरवणं असो, गुजिया कोण आणणार हे ठरवणं असो किंवा गाण्यांची लिस्ट — कोणताही व्यत्यय न येता झटपट निर्णय घ्या. म्युझिकसह स्टेटस (Status with Music): रंगांना देऊया सुरांची साथ होळी फक्त डोळ्यांनी बघायची नसते, ती मनापासून अनुभवायची असते. तुमच्या लाडक्या रंगांच्या फोटोंना किंवा स्लो-मोशन व्हिडीओला Music Icon वापरून तुमच्या आवडत्या सणासुदीच्या गाण्याची जोड द्या. आता तुमचे मित्र तुमचं स्टेटस फक्त पाहणार नाहीत, तर त्या गाण्यावर तुमच्यासोबत थिरकतीलही! शेड्युल कॉल्स (Schedule Calls): रंगांची उधळण होण्याआधीच भेटा! होळीच्या दिवशी सगळे मित्र एकत्र येणार असतील, तर त्याचं नियोजन आधीच करा. व्हॉट्सॲपच्या Calls tab मध्ये जाऊन ‘+’ वर टॅप करा आणि Scheduled Call सेट करा. यामुळे वेळेवर सगळ्यांना नोटिफिकेशन मिळेल. जे लांब आहेत त्यांनाही या व्हिडीओ कॉलद्वारे उत्सवात सामील करून घेता येईल.…

ग्‍लेनेगल्‍स हॉस्पिटलने रेनल डिनर्व्‍हेशन थेरपीसाठी विशेषीकृत प्रगत उच्‍चरक्तदाब व्‍यवस्‍थापन केंद्र स्‍थापन करण्‍यासाठी मेडट्रॉनिक इंडियासोबत सहयोग केला

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२६: मेडट्रॉनिक या आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनीने आज ग्‍लेनेगल्‍स हॉस्पिटल, मुंबईसोबत सहयोगाची…

उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली ५ कौशल्‍ये: लिंक्‍डइन

लिंक्‍डइन स्किल्‍स ऑन द राइज २०२६ च्‍या मते, एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्‍स, आयटी अँड…

अॅमेझॉनचे बेंगळुरूमध्‍ये आशियामधील दुसऱ्या सर्वात मोठ्या कार्यालयाचे उद्घाटन

बेंगळुरू, भारत, २३ फेब्रुवारी, २०२६ – अॅमेझॉनने आज बेंगळुरूमध्‍ये आशियामधील आपल्‍या दुसऱ्या सर्वात मोठ्या कार्यालयाच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. १.१ दशलक्ष चौरस फूट जागेवर पसरलेल्‍या या १२-मजली कॅम्‍पसमध्‍ये भारतातील ईकॉमर्स, ऑपरेशन्‍स, पेमेंट्स, तंत्रज्ञान व सेलर सर्विसेसमधील ७,००० हून अधिक कर्मचारी असतील. केम्‍पेगौडा आंतरराष्‍ट्रीय विमानतळापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्‍या पाच एकर जागेवर उभारण्‍यात आलेल्‍या या कॉर्पोरेट इमारतीचे कर्नाटक सरकारचे अवजड व मध्‍यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्‍या हस्‍ते अधिकृतरित्‍या उद्घाटन करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणात टीम्‍सना एकत्र आणण्‍यासाठी आणि सहयोग, स्थिरता, माहिती व आरोग्‍याला चालना देण्‍यासाठी नवीन कॉर्पोरेट इमारत विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आली आहे. या नवीन कॅम्‍पसचे लाँच अॅमेझॉनच्‍या भारतातील सातत्‍यपूर्ण गुंतवणूकीचा भाग आहे. कंपनीने आधीच भारतात ४० बिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि २०३० पर्यंत भारतात आणखी ३५ बिलियन डॉलर्स गुंतवणूक करणार आहे.   कर्नाटक सरकारचे अवजड व मध्‍यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री डॉ. एम. बी. पाटील म्‍हणाले, ”अॅमेझॉनच्‍या बेंगळुरूमधील सातत्‍यपूर्ण गुंतवणूकीमधून जागतिक तंत्रज्ञान व नाविन्‍यता केंद्र म्‍हणून भारताची वाढती भूमिका दिसून येते. अॅमेझॉनच्‍या या नवीन कॅम्‍पस सारखे मोठे कॅम्‍पस उच्‍च दर्जाचे रोजगार निर्माण करतात, स्‍थानिक परिसंस्‍था प्रबळ करतात आणि भारताच्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेला पाठिंबा देतात. आम्‍ही गुंतवणूकीचे स्‍वागत करतो, ज्‍यामुळे दीर्घकालीन क्षमता निर्माण होईल, तसेच आमच्‍या कर्मचारीवर्गासाठी संधी निर्माण होईल.”   अॅमेझॉन इंडियाचे कंट्री मॅनेजर समीर कुमार म्‍हणाले, ”भारत अॅमेझॉनसाठी दीर्घकाळापासून प्राधान्‍य बाजारपेठ आहे आणि बेंगळुरूने देशातील आमच्‍या प्रवासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये हे शहर आमच्‍या काही सुरूवातीच्‍या तंत्रज्ञान व व्‍यवसाय टीम्‍ससाठी आश्रयस्‍थान राहिले आहे, तसेच आज नाविन्‍यता व टॅलेंटसाठी प्रमुख केंद्र बनले आहे. आम्‍ही या कॅम्‍पसच्‍या उद्घाटनासाठी आमच्‍यासह सामील झालेले डॉ. एम. बी. पाटील यांचे आभार व्‍यक्‍त करतो, तसेच सतत पाठिंबा देण्‍यासाठी कर्नाटक सरकारचे देखील आभार व्‍यक्‍त करतो. आम्‍ही भारतातील व जगभरातील ग्राहकांसाठी सेवा बजावत असताना दीर्घकाळापर्यंत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.” या कॅम्‍पसमध्‍ये अनुकूल कार्यस्‍थळ आणि एकत्र काम करण्‍यासाठी सहयोगात्‍मक झोन्‍स आहेत, तसेच मीटिंग रूम्‍स, हडल स्‍पेसेस्, ब्रेकआऊट क्षेत्रे आणि २०० हून अधिक लोक सामावू शकणारी विशेष सभागृहे आहेत. कर्मचाऱ्यांच्‍या मनोरंजनासाठी बास्‍केटबॉल व पिकलबॉल कोर्ट्स, अॅम्पिथिएटर, सुरेख उद्याने आणि आऊटडोअर सामुदायिक जागा आहेत. दोन मजल्‍यांवर असलेले कॅफेटेरिया जगभरातील विविध पाककलांचा आस्‍वाद देतात. अॅमेझॉनच्‍या नवीन कॅम्‍पसमधून आमच्‍या कॉर्पोरेट ऑफिस पोर्टफोलिओमध्‍ये कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नामधील प्रगती दिसून येते. हा प्रयत्‍न द क्‍लायमेट प्‍लेज (The Climate Pledge) अंतर्गत २०४० पर्यंत निव्‍वळ-शून्‍य कार्बन संपादित करण्‍याच्‍या अॅमेझॉनच्‍या ध्‍येयाशी संलग्‍न आहे. प्रकल्‍पामध्‍ये साहित्‍याची जबाबदार स्रोतांकडून खरेदी, कार्यालयामधील मालमत्तांचा पुनर्वापर आणि उच्‍च-कार्यक्षम यंत्रणा अशा धोरणांचा समावेश आहे. या धोरणांचा प्रकल्‍प उभारणीत व दैनंदिन कार्यसंचालनामध्‍ये कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याचा मनसुबा आहे.

error: Content is protected !!
Call Now Button